झोप आपल्या जीवना मधील सर्वात महत्वाचा भाग, आपण अर्धे आयुष्य झोप घेत असतो, जरा विचार करा जर आपण २४ तास जागेच असतो तर काय झले असते. आपण रात्री झोप पुरेशी झोप घेतल्यानंतर फ्रेश होतो व नवीन दिवसाला सुरवात करतो. मात्र आपल्याकडे झोपेचे महत्व या विषयावर आपण जास्त चर्चा करत नाही, प्रत्येक मानवाला त्याच्या वयानुसार झोप हवी असते. शहरीकरणामुळे आज आपण आपला खूप वेळ फोन व टीवी मध्ये घालवत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे काही लोक झोप येण्यासाठी औषधे घेत असतात परंतु हा काही योग्य मार्ग नाही. शहरामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, टीवी व इतर इलेक्ट्रोनिक मीडीया चा भडीमार तसेच फेसबुक व इतर समाज मध्यमा मुळे लहान मुलापासून ते जेष्ट पर्यंत सर्वजन समाज माध्यमावर बिझी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झोपेचे खोबरे होत आहे.

रात्रीच्या झोपेसाठी अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या शिफारसी नऊ वयोगटात मोडल्या आहेत. त्या खालील प्रमाणात आहेत.
वय | झोपेचे शिफारस केलेले तास |
0-3 महिने | 14-17 तास |
4-11 महिने | 12-15 तास |
1-2 वर्ष | 11-14 तास |
3-5 वर्ष | 10-13 तास |
6-13 वर्ष | 9-11 तास |
14-17 वर्ष | 8-10 तास |
18-25 वर्ष | 7-9 तास |
26-64 वर्ष | 7-9 तास |
65 किंवा पुढील वर्ष | 7-8 तास |

निद्रानाश म्हणजे काय?
निद्रानाश (Insomnia) म्हणजे झोपी जाण्याची किंवा झोपी जाण्या साठी असमर्थ असणे,त्याचबरोबर निकृष्ट दर्जाची झोपे लागणे. निद्रानाश खूप सामान्य आहे आणि अंदाजे 30% सामान्य लोक ह्या आजाराने ग्रस्त आहेत. त्याचबरोबर इतर आजारामुळे सुद्धा पूर्ण झोप लागत नाही.
आपण आपल्या कामाचे रोज नियोजन करत असतो परंतु झोपेचे करतो का ? शांत व चिंतामुक्त झोपण्यासाठी खालील नियम पाळणे आवश्यक आहे
1.सकाळी व्यायाम करणे
2. रोज मेडीटेशन करणे
3.रात्रीचे जेवण झोपेच्या अगोदर २ तास घेणे
4.आरामदायक असलेले एक गद्दा किंवा अंथरूण निवडणे आणि त्यास दर्जेदार उशा असणे गरजेचे आहे.
5.मोबाइल फोन आणि लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून बेडच्या आधी अर्धा तास बंद करून ठेवणे
6.आपल्या चहा कॉफी किंवा अल्कोहोलचे चे सेवन करणे टाळावे.
जर आपण किंवा कुटूंबातील सदस्याला दिवसा खूप जास्त झोप लागत असेल, तीव्र मुंग्या येणे, झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यात अडचण येणे, तीव्र निद्रानाश असे लक्षण दिसत असेल तर तुम्ही आपल्या डॉक्टर यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.