भारतातील 68 कोटी अर्थात देशाची अर्धी लोकसंख्या इंटरनेट वापरते. पाच वर्षापूर्वी हेच प्रमाण 35 कोटींवर होतं. 68 कोटींपैकी 63 कोटी भारतीय मोबाईल इंटरनेट वापरतात. त्यात प्रत्येक जण दर महिन्याला तब्बल 11 जीबीचा डाटा वापरतो. म्हणूनच भारत ही जगातील सर्वात मोठी इंटरनेट व्यवसायाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेचा विचार करूनच 50 लाख मोबाईल अँप्लिकेशन जगभरात तयार करण्यात आले आहेत. अँप्लिकेशन शर्यतीत आघाडीवर आहेत व्हाँट्सअप, फेसबुकसारखी समाज माध्यमं. 31 कोटी भारतीय व्हाँट्सअप, फेसबुकसारखे अँप्लिकेशन डाऊनलोड वापरतात. सध्या त्यात आणखी एक अँप्लिकेशन सामील झालं होतं, टीकटाँक. अल्पावधीत या मेड इन चायना टीकटाँकने दीग्गज फेसबुकच्या तोंडाला फेस आणला. फेसबुकचा जागतिक इंटरनेट व्यवसायातील शेअर 85 टक्के आहे. पण हे नवे अँप्लिकेशन त्यांच्यासाठी आलार्मिंग ठरले होते. पण आता आता त्यावर बंदी आणून हा चायनीज अश्वमेध भारताने रोखलाच जणू.

पण मुळात हेच टीकटाँक एकेकाळी विकायला काढलेले अँप्लिकेशन होतं हे अनेकांना माहीत नसेल.
चीनमधल्या अँलेक्स झू आणि लुयू यांग यांनी हे अँप्लिकेशन 2014 मध्ये तयार केले होते. त्याआधी या दोघांनी अशाच प्रकारचे शैक्षणिक अँप्लिकेशन बनवले होते. पण लोकांनी ते नाकारल्यानंतर या दोन मित्रांनी त्याला मनोरंजनाची जोड दिली आणि तयार झाले मुझिकली हे अँप्लिकेशन. 2014 ला लाँन्च झाल्यानंतर 2016 पर्यंत जगभरातील 7 कोटी लोकांनी हे डाऊनलोड केले होते. तर रोजच्या रोज एक कोटी व्हिडीओ त्यावर अपलोड होत होते. 30 देशांत सर्वाधिक डाऊनलोड होणारं अँप्लिकेशन म्हणूनही त्याचा नावलौकीक झाला. पण काही कारणातव झू आणि यांग यांनी हा मुझिकली ब्रांड विकायला काढला. त्यावेळी फेसबुकचचे तो विकत घेण्यासाठी महिनाभर प्रयत्न सुरू होते. पण चायनीज कंपनी बाइट डान्सने 2017 च्या अखेरीस तब्बल 80 कोटी अमेरिकन डाँलर अर्थात जवळपास 56 अब्ज रूपयांना ते विकत घेतले. फेसबुकला हा ब्रांड विकत घेता आला असता तर आज चित्र वेगळे झाले असते. बाईटडान्सने म्युझिकलीबरोबर टीकटाँक हे एक नवे अँप्लिकेशन एकत्र केले आणि जगभरातले म्युझिकलीचे वापरकर्ते आँगस्ट 2018 मध्ये एकाच दिवशी टीकटाँकचे ग्राहक झाले.

फेसबुक आणि व्हा्ँट्सअपने लोकांना इंटरनेट वापरायला शिकवले, पण म्युझिकली अर्थात आताच्या टीकटाँकने व्हिडीयो क्रिएटीव्हिटी आणि एडीटींगला चालना दिली. ही समाज माध्यमं सर्वाधिक तरूण वर्गाकडून वापरली जातात. त्यामुळे इंटरनेद्वारे राज्यक्रांती होण्याच्या काळात देशातील तरूणांच्या हाती अशी दुसऱ्या देशाची अँप्लिकेशन असणं खरंच धोकादायक ठरू शकतं. दुसऱ्या बाजूला टीकटाँकनेही व्यवसायिकतेच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांच्यावर वापरकर्त्यांचा डाटा चीनी प्रशासनाशी शेअर केल्याचा आरोप आहे. एवढा मोठा आरोप होऊनही त्यांनी ती प्रतिमा सुधारण्यासाठी तसूभरही प्रयत्न केलेले नसल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच भारतानंतर आता अमेरिकेतही त्यावर बंदी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. पर्सनल व्हिडीओ, लाईव्ह व्हिडीयोची तरूणांतील क्रेझ नैतिकतेला पायदळी तुडवू लागल्याचे चित्र आहे. टीकटाँकच्या काळात वैयक्तिक काही राहिलेच नाही. फेसबुकने ज्याप्रमाणे वापरकरकर्त्यांना वेगवेगळे फिल्टर देऊन ही मर्यादा राखली, त्या तुलनेत टीकटाँक मागे पडला. आज फेसबुककडे टीकटाँक असता तर बंदीची कुऱ्हाड त्यांच्यावर आली नसती, असे आता बोलले जात आहे. त्यामुळेच चायनीज बाईटडान्सने टीकटाँक विकायला काढणार की हे मायाजालातील युद्ध जोमाने लढणार, याकडे सर्वांचे.लक्ष आहे.