बँकिंग लोकपाल (Banking ombudsman Scheme) म्हणजे काय ?
आज आपण एका महत्व पूर्ण अश्या विषया संबधी चर्चा करणार आहोत,आपल्याला लोकपाल हा शब्द्द आठवतो काय ?अण्णा हजारे यांनी लोकपाल आंदोलनाची सुरवात केली होती. भारतामध्ये अजून तरी त्या आंदोलनाला यश मिळाले नसले तरी. आपल्याकडे बँकिग लोकपाल आहे.

Source: www.ndtv.com
बँकिग लोकपाल ( Banking ombudsman scheme )
बंकिंग प्रणाली संदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी भारतीय रिजर्व बँकेच्या ( RBI )मार्फत १९९५ (under section 35 A of the Banking Regulation Act 1949) साली सुरु केले गेले आहे. भारतीय रिजर्व बँकेच्या (Reserve bank of India) च्या मार्फत देशातील सर्व बँकिग प्रणाली निंयंत्रीत केली जाते. बँकेच्या मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा व उत्पादने (Product and Services) या संदर्भात जर आपण समाधान कारक नसून आपली जर एखादी तक्रार (Grievance) असल्यास आपण बँक लोकपाल यांच्या कडे दाद मागू शकता.

Source: blogipleaders.in
तक्रारींचे प्रकार काय आहेत?
तुम्ही खालील प्रकारांतर्गत तक्रार नोंदवण्यासाठी आरबीआय बँकिंग लोकपालाकडे संपर्क साधू शकता:
- देयके (Payment) न मिळाल्यास किंवा धनादेश, मसुदे, बिले इत्यादींचा संग्रह ( Deposit ) करण्यास बँक मार्फत उशीर
- पुरेसे कारण नसताना मान्यता (Approval) आणि त्यासंबंधी अधिक कमिशन (Commission) आकारण्यासाठी.
- बँकेच्या खात्यामधील पैसे न दिल्यास किंवा पैसे देण्यास उशीर केल्यास.
- Demand draft किंवा Pay order issue न करणे किवा उशीर करणे
- बँकेच्या कार्यालयीन वेळेत काम न करणे किंवा सेवा देण्यास नकार देणे.
- बँकिग सुविधा देण्यास नकार देणे.
- परदेशातून पाठवलेले पैसे, ठेवी आणि बँक-संबंधी इतर बाबींबाबत भारतात रहिवासी नसलेल्या ( NRI ) भारतीयांकडील तक्रारी.
- कोणत्याही वैध कारणाशिवाय ठेव खाती उघडण्यास नकार.
- ग्राहकाला पुरेशी पूर्वसूचना न देता शुल्क (Charges) आकारणे.
- एटीएम (ATM) / डेबिट कार्ड ( Debit Card) ऑपरेशन्स किंवा क्रेडिट कार्ड( Credit card) ऑपरेशन्सवरील रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे बँक किंवा त्याच्या सहाय्यक कंपन्यांचे पालन न करणे.
- नोटीस बजावल्याशिवाय किंवा पुरेशी कारणाशिवाय बँक खाती जबरदस्तीने बंद करणे.
- खाती ( Bank account ) बंद करण्यास किंवा विलंब करण्यास नकार.
- बँकेने दत्तक घेतलेल्या उचित प्रॅक्टिस कोडचे पालन न करणे किंवा बँकिंग कोड्स आणि भारतीय मानक मंडळाने जारी केलेल्या ग्राहकांना बँकाच्या वचनबद्धतेच्या संहितेच्या तरतुदींचे पालन केले नाही.
- बँकांकडून वसुली एजंट्सच्या गुंतवणूकीबाबत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणे.
वरील काही उदाहरणे आपल्या माहिती साठी दिली आहेत, आता आपण तक्रार करण्याची प्रक्रिया समजून घेऊ.

तक्रार करण्याची प्रक्रिया :
एखाद्या बँकेचा ग्राहक (Bank customer) बँकेच्या सेवा व उत्पादने संदर्भात त्याला जर एखादी तक्रार असेल तर सर्व प्रथम ज्या बँकेची तक्रार असेल त्या बँकेच्या अंतर्गत बँक लोकपाल (Internal Banking ombudsman) यांच्या कडे पत्र, इमेल (EMAIL), Online complaint management system च्या web portal मार्फत दाद मागणे आवश्यक आहे.
तुमच्या बँकेच्या मार्फत अंतर्गत लोकपाल ची माहिती तुम्हाला बँकेतील कर्मचारी किंवा बँकेच्या संकेतस्थळ यावरून मिळू शकेल.तुमच्या तक्रारीची नोंदे नंतर बँकेच्या अंतर्गत बँक लोकपाल कडून ((Internal Banking ombudsman) एका महिन्याच्या आत उत्तर येणे अपेक्षित आहे. जर उत्तर आले नाही किंवा उत्तर समाधान कारक नसेल तर एक महिन्यानंतर व १२ महिन्याच्या आत रिजर्व बँकने नियुक्त केलेले अधिकारी यांच्या कडे पत्र, इमेल (EMAIL), Online complaint management system च्या web portal च्या मार्फत दाद मागावी लागते.
भारतात आतापर्यंत २२ ठिकाणी बँकिंग लोकपाल चे प्रादेशिक कार्यालय आहे. बहुधा ही कार्यालये राज्याच्या राजधनी मध्ये आहेत. महाराष्ट्रा व गोवा या राज्याची बँक लोकपाल चे कार्यालय मुंबई भायखळा येथे आहे.
मुंबई मध्ये दोन लोकपाल कार्यालये आहेत. त्यातील १ बँक लोकपाल मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्य साठी आहे व दुसरे लोकपाल गोवा व महाराष्ट्र राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे सोडून उर्वरीत सर्व जिल्ह्य साठी आहेत. त्यांचा पत्ता खाली दिला गेला आहे.
मुंबई ( १ ) : (मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे) या जिल्ह्यासाठी
C/ O Reserve Bank of India
4th Floor, RBI Byculla office Building
Opp. Mumbai central Railway station,
Byculla, Mumbai 400008,
STD Code : 022 Tel No : 23022028, Fax : 230022024
Email : cms.bomumbai1@rbi.org.in
Online complaint link : https://cms.rbi.org.in/cms/IndexPage.aspx?aspxerrorpath=/cms/cms/indexpage.aspx
मुंबई (२) गोवा महाराष्ट्र राज्यातील (मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे सोडून ) उर्वरीत सर्व जिल्हासांठी
C/ O Reserve Bank of India
4th Floor, RBI Byculla office Building
Opp. Mumbai central Railway station,
Byculla, Mumbai 400008,
STD Code : 022 Tel No : 23001280, Fax : 230022024
Email : cms.bomumbai2@rbi.org.in
Online complaint link : https://cms.rbi.org.in/cms/IndexPage.aspx?aspxerrorpath=/cms/cms/indexpage.aspx
बँकिग लोकपाल भारतामधील सर्व बँकांना तसेच NBFC व Digital payment transaction ला लागू आहे. आपल्या माहितीसाठी बँकाच्या काही प्रकार आपल्या माहिती साठी खाली प्रमाणे आहेत.
Public Sector Banks: उदा, भारतीय स्टेट बँक (State Bank of India) बँक ऑफ इंडिया(Bank of India) बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) , बँक ऑफ बडोदा ( Bank of India )
Private Sector Banks: उदा, आय सी आय सी आय बँक (ICICI Bank) (HDFC Bank ) एक्सिस बँक(AXIS Bank) रत्नाकर बँक ( Ratnakar Bank) इत्यादी
ग्रामीण बँक (Regional Rural Banks) : आपल्या महाराष्ट्र दोन ग्रामीण बँक आहेत जसे की महाराष्ट्र ग्रामीण बँक ( Maharashtra Gramin Bank) व विदर्भ कोकण ग्रामीण बँक ( Vidarbh Kokan Gramin Bank) इत्यादी
परदेशी बँक (Foreign Banks) : HSBC, CITI Bank,Deutsche Bank,DBS Bank Ltd. Standard Chartered Bank etc.

THE OMBUDSMAN SCHEME FOR NON-BANKING FINANCIAL COMPANIES, 2018
एनबीएफसी बँकिंग संदर्भात ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सदर लोकपालची निर्मित्ती केली आहे.
NBFC (Non-banking finance company) :-
एनबीएफसी बँकिंग सुविधा आणि वित्तीय सेवा प्रदान करतात परंतु त्यांचे कार्य आणि उद्देश बँकेच्या कायदेशीर भाषेपेक्षा खूप वेगळे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या बँकिंग नियमांत एनबीएफसींचा समावेश आहे.ते क्रेडिट सुविधा, सेवानिवृत्तीचे नियोजन, कर्ज, आणि बाजारात गुंतवणूक यासारख्या बँकिंग सेवा प्रदान करतात. तथापि, ते लोकांकडून कोणत्याही प्रकारचे ठेवी घेऊ शकत नाहीत.
भारतामधील काही प्रमुख NBFC खालील प्रमाणे आहेत.
- Axis Finance Limited
- Bajaj Finance Limited
- Muthoot Finance Ltd
- Mahindra & Mahindra Financial Services Limited
- HDB Finance Services
- Cholamandalam Finance
- Tata Capital Financial Services Ltd
- L&T Financial Limited
- Aditya Birla Finance Limited
आम्हाला आशा आहे कि वरील लेख आपल्याला सदर लेख आवडला असेल, आपण आमच्या लेखा संदर्भात आपली प्रतिकिया देऊ शकता तसेच मी मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.
सदर लेख परवानगी शिवाय पुनर्मुद्रण केल्यास किंवा copy paste केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.