COVID19 (करोना) ने जानेवारी २०२० चीन पासून सुरवात करत जगाच्या एकूण २१५ देशात थैमान घातले आहे, आज करोना संसर्गाचा आकडा १ करोड पेक्षा जास्त आहे आणि अजून त्याची वाढ होताना दिसत आहे. जानेवारी २०२० पूर्वी डॉक्टर व काही रुग्णच मास्क वापरत असत मात्र आज संपूर्ण जग मास्क लावून फिरताना दिसत आहेत. आपल्या भारत देशात सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात मास्क चा वापर करत आहेत. मास्क चा वापर योग्य रित्या वापरल्यामुळे आपण कित्येक संसर्गजन्य आजार पासून आपला बचाव करू शकतो. भारतात एप्रिल महिन्यापर्यंत मास्क चा काही प्रमाणात तुटवटा जाणवत होता. मात्र आता मागणी व पूरवठा योग्य प्रमाणात होत आहे.
आपल्या सरकार मार्फत सुद्धा मास्क वापरण्या संदर्भात आदेश काढण्यात आले आहे. तसेच मास्क न वापरल्यास रुपये १००० चा दंड आकारण्यात येत आहे.
(WHO) जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा मास्क चा वापर कसा करावा या संदर्भात सूचना केली आहे. तसेच Social Distance चे पालन करावे म्हणून वेळोवेळी सूचना सुद्धा केल्या आहेत. शिंकताना तसेच खोकताना योग्य ती काळजी म्हणजे मास्क व रुमाल यांचा वापर करणे महत्वाचे आहे.

मास्क चे प्रकार
- N 95 रेस्पीरेटर मास्क (N 95 Respirator Mask )चा उपयोग – हवेतील सूक्ष्म कणांपासून संरक्षण करतो, हवेतील किमान 95 % सूक्ष्म कणांना फिल्टर करून संरक्षण करतो.
- सर्जिकल मास्क किंवा मेडीकल मास्क ( Surgical Mask or Medical Mask ) : मास्क सुद्धा हवेतील सुष्म कणांपासून आपले संरक्षण करत आहेत. COVID १९ च्या बचाव करण्यासाठी कापडी मास्क मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. असा मास्क आपण हॉस्पिटल ( Hospital ) मध्ये पहिला असेल तसेच अश्या मास्क चा वापर आता सर्व सामान्य नागरिक सुद्धा करताना आपण पहिले असेल.

मास्क वापरण्याची दशसूत्री :-
- एखादा बाहेरून आल्यानंतर Mask (मास्क) घरात कुठेही ठेऊ नका, त्याला लगेच गरम पाण्यात धुणे साठी टाकावा, तसेच लहान मुले त्याला हात लावणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
- मास्क लावताना घट्ट घालावा, जर सैल लावला तर आजू बाजूने हवेचा शिरकाव होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते ,तसेच संपूर्ण नाकपुडी व हनुवटी वर लावणे गरजेचे आहे.
- मास्कच्या वापरानंतर तो लगेच साबणा ने धुणे आवश्यक आहे.
- मास्क ला हात लावण्या अगोदर हात २० सेकंदा पेक्षा जास्त वेळ साबण वापरून हात धुणे आवश्यक आहे.
- मास्क वापरत असताना गर्मी मुळे भिजून ओला होतो अश्या स्थिती मध्ये आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अधिकचा मास्क सोबत ठेवावा.
- मास्क तोंडाला लावण्याच्या अगोदर मास्क कुठे फाटला किंवा त्याला कुठे फट तर तर नाही ना यांची खात्री करूनच वापरा.
- काही जन मास्क ची उलटी बाजू वापरत आहेत, तरी आपण मास्क ची योग्य बाजू कोणती याची शहानिशा करूनच मास्क परिधान करावा.
- मास्क काळजीपूर्वक काढा, सर्वसाधारणपणे, फक्त कडा, पट्टे, टाय किंवा बँडला स्पर्श करून मास्क काढा. मास्कच्या पुढच्या भागाला विषाणू असू शकतात.
- शिंकताना किंवा खोखताना नेहमी मास्क तोंडावर असावा, मास्क काढू नये, तसेच मास्क एका कानाला लटकवू नये.
- ज्या ठिकाणी मास्क दूषित होऊ शकतो अशा ठिकाणी मास्क प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. प्लास्टिकची पिशवी बंद करा आणि मग कचराकुंडीत प्लास्टिकची पिशवी फेकून द्या.
आम्हाला अशी आहे कि आपल्याला हा लेख आवडला असेल, भविष्यातील आणखी लेख वाचण्यासाठी आपण मी मराठी हे फेसबुक पेज लाइक करा व आमच्या www.mimarathi.in या वेबसाईट ला भेट द्या.
मी मराठी टीम कडून आपण सर्वजण सुरक्षित राहो हीच मंगल कामना.