Shivneri Fort Information : शिवनेरी किल्ल्याविषयी माहीती

Shivneri Fort Information : शिवनेरी हा महाराष्ट् राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर ह्या शहरात आहे.हा किल्ला नाणेघाटाच्या डोंगररांगां मध्ये वसलेले असल्याचे आपणास दिसून येते.शिवनेरी हा किल्ला पुणे शहरापासून साधारणतः सुमारे १०५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता व किती खर्च लागेल बघण्यासाठी

येथे क्लिक करा

भारत सरकारच्या वतीने शिवनेरी ह्या किल्ल्यास २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ह्या बहुमानाने घोषित देखील करण्यात आले आहे.शिवनेरी हा किल्ला समुद्र सपाटीपासुन सुमारे ३ हजार ६०० फुट इतक्या उंचीवर स्थित आहे.जुन्नर मध्ये शिरतानाच आपणास ह्या किल्ल्याचे दर्शन होते.शिवनेरी हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.हया किल्ल्याची चढाईची श्रेणी ही मध्यम स्वरुपाची आहे ह्या शिवनेरी किल्ल्याची स्थापणा इसवी सन ११७० मध्ये करण्यात आली होती.हया किल्ल्याचा आकार भगवान शंकराच्या पिंडीसारखा आहे.सातवाहन काळानंतर शिवनेरी हा किल्ला चालुक्य आणि राष्ट्रकूट या दोन्ही सत्तांच्या राजवटीत होता.

११७० ते १३०८ मध्ये शिवनेरी ह्या किल्ल्यावर यादवाननी त्यांचे राज्य स्थापित केले होते.याच काळात शिवनेरीस गडाचे स्वरूप प्राप्त झाले.शिवनेरी हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे.ह्याच किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.हेच कारण आहे की ह्या शिवनेरी किल्ल्याला आज एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास –

पुणे जिल्ह्यावर सर्वप्रथम शिवनेरी चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी आपले राज्य स्थापित केले होते.११७० ते १३०८ दरम्यान यादवांनी देखील येथे आपले राज्य केले.यानंतर १४४३ मध्ये मालकांनी यादवांना पराभुत केले अणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.मग दिल्लीची सुलतानशाही कमजोर झाली अणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला अहमदनगर येथील सुलतानाला दिला गेला.यानंतर अहमदनगरच्या सुलतानाने हा शिवनेरी किल्ला मालोजी भोसले यांना भेट म्हणून दिला.मालोजी भोसले हे शिवाजी भोसले यांचे आजोबा होते.

Dwarkadhish Temple | द्वारकाधीश मंदिर

माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मग १६३० मध्ये १९ फेब्रुवारी रोजी हयाच शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपुर्ण बालपण ह्याच किल्ल्यावर गेले.दहा वर्षांचे होईपर्यंत शिवराय ह्याच किल्ल्यावर वास्तव्यास होते.यानंतर १६७३ साली एका इंग्रज पर्यटकाने ह्या किल्ल्याला भेट दिली आणि त्यानंतर त्याने ह्या शिवनेरी किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.पुढे १८२० मध्ये इंग्रज अणि मराठा यांच्यात युद्ध झाले त्यानंतर हा किल्ला ब्रिटीश सत्तेच्या ताब्यात गेला होता.

शिवनेरी गडावर पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणे आहेत?

शिवनेरी गडावर पाहण्यासारखी अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. Shivneri Fort

इथे बदामी पाण्याचा तलाव आहे, कडेलोट बुरूज,शिवाई मंदिर,कमानी मशीद,गंगा जमुना पाण्याची टाकी, अंबरखाना, हमामखाना, शिवरायांच्या जन्म स्थळाची इमारत,बाल शिवाजी अणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा महादरवाजा बाले किल्ला इत्यादी अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे इथे आहेत.

Mysore Palace | म्हैसूर राजवाडा

माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button