Kojagiri Purnima Information: कोजागिरी पौर्णिमा माहिती.
Kojagiri Purnima Information: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा बद्दल, तस तर कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर रात्री गच्ची वर जाऊन मोज मजा करीत मसाला दूध आटून त्यात चंद्र पाहून ते आनंदाने पिणे हि आपली सर्वांची च कोजागिरी बद्दल कल्पना.
अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती पहाण्यासाठी
कोजागिरी पौर्णिमा माहिती
भारत हा असा देश आहे की प्रत्येक महिना सणांनी भरलेला आहे..असे म्हणणे अतिशियोक्ती नाही ठरणार की भारतात आठवडयाला कोणता तरी सण असतोच..
या दिवशी आपण लहानपणापासून रात्री जागरण करतो..काही जण झोपले असतील तर त्याला उठवतो १२ वाजले की..आणि सूरू होतो आपला कार्यक्रम ..दूधामध्ये चंद्र दिसला की आपण त्या दूधाचा आस्वाद घेतो..पण कोजागिरी पौर्णिमा ने आपण का साजरी करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
या दिवशी चंद्र मंडळातून पृथ्वी वर महालक्ष्मी येते आणि प्रश्न विचारते ,कोण जागर्ति..म्हणजे कोण जागृत आहे..कोण आपल्या कर्तव्याबाबत जागृत आहे,कोण निसर्गातील नियम पाळत आहे,कोण राष्टहितामध्ये कोण जागृत आहे,जे लोग या सर्व गोष्टी साठी जागृत असतात त्या लोकांना महालक्ष्मी वरदान देउन जाते..
आता आपण कोजागिरी च्या दिवशी करणाऱ्या व्रत बदल माहिती घेऊया
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व म्हशीवर बसलेल्या बळी राजा ची पूजा करतात या रात्री मंदिरे ,उद्याने , घरे ,रस्ते इत्यादी ठिकाणी दिवे लावतात.या रात्री जितके दिवे लावावे तितके कल्प मानवाला सूर्य लोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते , लक्ष्मी व बळीराजाची पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी , देव पितरांना समर्पून व आप्तेष्टाना देऊन स्वतः सेवन करतात , चंद्राला आटीव दुधाचा नैवेध दाखवतात, आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजा आणि बळीराजाची पूजा करून सर्वाना भोजन घालून प्रार्थना करतात.या पूर्वी सांगितल्या प्रमाणे अशी आख्यायिका आहे कि उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को जागृती करते , म्हणजे च कोण जागत आहे.
भ्रमपुराणानुसार कोजागिरीला रस्ते झाडावे घरे सुशोबित करावीत , दिवसा उपवास करावा आपल्या दारासमोर दिवा लावून पूजा करावी चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नवेध दाखवा. ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गायी ची पूजा करावी. अश्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.