गड किल्ले

लाल किल्ल्याविषयी माहिती

नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्र हे किल्ल्यांची जरी भूमी असली तरी संपूर्ण भारतभर विविध स्थापत्यशैलीतील किल्ले बघावयास मिळतात. भारताच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा किल्ला कोणता असेल तर तो म्हणजे लाल किल्ला होय. या लाल किल्ल्यावर अनेक राजे राजवाड्यांनी राज्य केलेले आहे. आज भारत सरकारने या किल्ल्याची उत्तम अशी बडदास्त ठेवलेली असून, भारताच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये लाल किल्ल्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजच्या या भागामध्ये आपण लाल किल्ला या विषयीची माहिती बघणार आहोत…

भारताचे  राजधानी क्षेत्र असणाऱ्या दिल्ली या शहरात लाल किल्ला स्थित असून, सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहल या भव्य इमारतीपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे. लाल किल्ल्यालाच आग्रा किल्ला असे देखील म्हटले जाते.

लाल किल्ला ही अतिशय सुबक, भव्य आणि विस्तीर्ण वास्तू असून, त्यावरील नक्षीकामावरून या किल्ल्याच्या सुंदरतेची प्रचिती येते. असे सांगितले जाते की मोगलांनी दिल्लीवर वर्चस्व असताना या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. लाल दगडापासून बांधला म्हणून या किल्ल्याचे नाव लाल किल्ला असे ठेवण्यात आले. १४ एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा किल्ला यमुना नदी काठावर बांधण्यात आलेला आहे.

ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार हा किल्ला उस्ताद अहमद लाहोरी या प्रतीतयश वास्तुकारांनी बांधलेला असून, 13 मे 1648 मध्ये बांधून पूर्ण झाला. हे बांधकाम इंडो इस्लामिक शैली या प्रकारातील असल्याचे सांगण्यात येते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अमर सिंग गेट या नावाच्या एकाच दरवाजाने आपण जाऊ शकतो. असा हा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

मुघल कालावधीत इसवी सन 1526 या साली पानिपतचे पहिले युद्ध समाप्त झाल्यानंतर इब्राहिम लोदीने या किल्ल्यांवर आक्रमण करून मुघल शासक बाबर पहिला याच्यावर हल्ला केला, आणि किल्ल्यावर आपला ताबा मिळवला. त्यांनी या किल्ल्यामध्ये काही बांधकाम देखील केले. नंतर मात्र हा किल्ला अकबराने आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याला आपल्या राज्याची राजधानी बनविले. तसेच किल्ल्याचे बांधकाम मोडकळीस आल्याने लाल रंगाच्या दगडाचा वापर करून त्यांनी किल्ल्याचे नवीन बांधकाम केले जे तब्बल आठ वर्षे चालले.

आज बघावयास मिळणारे लाल किल्ल्याचे बांधकाम हे अकबर बादशहाने केलेलेच बांधकाम आहे. पुढे 1658 मध्ये शहाजहान चा मुलगा औरंगजेब याच्या ताब्यात हा किल्ला गेल्यानंतर त्याने स्वतःच्या वडिलांनाच या किल्ल्यामध्ये तब्बल आठ वर्षांपर्यंत कैद ठेवले. शहाजहानचा मृत्यू झाल्यानंतर मात्र हा किल्ला अनेक साम्राज्याकडे फिरत राहिला. इसवी सन 1803 मध्ये इंग्रज आणि मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. जो भारत सरकारच्या ताब्यात थेट स्वतंत्र्यानंतरच सोपविण्यात आला.

आज मितीस हा किल्ला भारत सरकारच्या मालकीचा असून, येथे पर्यटकांची प्रचंड रेलचेल असते. तसेच 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या दोन राष्ट्रीय सणांच्या दिवशी लाल किल्ल्यावर परेड होते. तसेच भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून संपूर्ण भारताच्या जनतेला संबोधित करत असतात. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा असल्याने भारत सरकारने या किल्ल्याची उत्तम निगा ठेवलेली आहे.

लाल किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे आणि वास्तू (Popular places and buildings on Lal fort)

किल्ल्यावर पर्यटनासाठी गेल्यानंतर अनेक विविध छोट्या मोठ्या वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. ज्यामध्ये अमर सिंह दरवाजा, शीश महल, खास महल, मुसम्मान बुरुज, दिवान ए खास, जहांगीर महल आणि दिवान ए आम इत्यादी वास्तू मुख्य आहेत.

अमर सिंह दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असून, केवळ या एकाच दरवाज्याद्वारे किल्ल्यामध्ये ये-जा करता येते. यावरून किल्ल्याच्या सुरक्षिततेची प्रचिती येते.

किल्ल्यावर अष्टकोनी मंडपासारखा दिसणारा बुरुज म्हणजे मुसम्मान बुरुज होय. याच बुरुजावरून ताजमहल व यमुना नदी बघता येते.

किल्ल्यावरील दोन छोटे छोटे महल अर्थात दिवान ए खास आणि दिवान ए आम पर्यटकांच्या नजरा खेळून ठेवतात. यातील दिवान ए खास हा महल शहाजहाने बांधलेला असून, याचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केला जात असे. तर दिवाण ए आम यास सार्वजनिक सभागृह म्हणून वापरण्यात येत असे.

किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शीश महाल होय. वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांनी सजविलेला असल्याने यास शीश महाल असे नाव पडले आहे.

लाल किल्ल्यावर कसे जावे (How  to reach Lal Fort)

मित्रांनो वर बघितल्याप्रमाणे लाल किल्ला हा राजधानी क्षेत्र दिल्ली येथे आहे. त्यासाठी आपण विमान, रेल्वे अथवा इतरही सार्वजनिक तसेच खाजगी वाहतूक व्यवस्थेमार्फत जाऊ शकता. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर आपण टॅक्सीच्या सहाय्याने लाल किल्ल्यावर थेट पोहोचू शकता. तसेच मेट्रोच्या माध्यमातूनही आपण लाल किल्ल्यावर पोहोचू शकता. येथील चांदणी चौक मेट्रो स्टेशनवर उतरून अवघ्या दहा मिनिटात आपण लाल किल्ल्यावर पोहोचू शकता, मात्र चांदणी चौक बाजार हा अतिशय गजबजलेला बाजार असून येथे गर्दीमुळे आपल्याला वेळ लागू शकतो.

लाल किल्ल्यास भेट देण्याची सर्वोत्तम वेळ (Best time to visit Lal Fort)

मित्रांनो ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत लाल किल्ला बघण्यासाठी अतिशय योग्य वेळ समजली जाते. मात्र मार्चनंतर येथील प्रचंड उकाड्याने आपण पर्यटनाचा आनंद घेण्यास मुकाल. मार्चनंतर 40°c पेक्षाही वर जाणारे तापमान आणि जून जुलैमध्ये सुरू होणारा पावसाळा दोन्हीही गोष्टी लाल किल्ल्याच्या पर्यटनाचा आनंद घालवतात.

लाल किल्ला बघण्यासाठी शुल्क (Fees to see Lal Fort)

मित्रांनो पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेता भारत सरकारने लाल किल्ल्यावर पर्यटन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किल्ल्यात प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय व्यक्तीला 35 रुपये तर परदेशी व्यक्तीला 500 रुपये द्यावे लागतात. तसेच किल्ल्यातील “लाईट आणि साऊंड शो” बघण्यासाठी प्रौढ व्यक्तीस साठ रुपये तर लहान मुलांना वीस रुपये लागतात. जे आठवड्याच्या शेवटी वाढून प्रौढांसाठी ऐंशी रुपये तर लहान मुलांसाठी तीस रुपये होतात.

मित्रांनो भारताच्या ऐतिहासिक गौरवाचा प्रतीक असणारा हा लाल किल्ला प्रत्येक भारतीय व्यक्तीला एकदा तरी बघावयासच हवा. तत्पूर्वी आम्ही लाल किल्ल्याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच लाल किल्ल्यास भेट देताना या लेखात नमूद केलेल्या ठिकाणांना बारकाईने बघण्यास विसरू नका. आणि पर्यटनास उत्सुक असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख नक्कीच शेअर करा.

 धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button