शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती (Brief information about Shivneri Fort)
नमस्कार मित्रांनो, या महाराष्ट्राला नेहमीच संघर्षाचा वारसा लाभलेला आहे. या संघर्षाचा जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. यांनी अतोनात संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली व अनेक गडकोट जिंकून स्वराज्य विस्तार करण्यास महाराजांनी सुरुवात केली. हे गडकोट जणू स्वराज्याची खरी संपत्ती म्हणावी लागेल. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण महाराजांच्या जन्मभूमी विषयी अर्थातच शिवनेरी या गडाविषयी माहिती पाहणार आहोत.
शिवनेरी किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती ( Brief information about Shivneri Fort )
महाराष्ट्रातील एक जुना किल्ला म्हणून शिवनेरी किल्ल्याला ओळखलं जातं.
हा किल्ला पुणे परिसरामध्ये स्थित असून जुन्नर या तालुक्यात आहे. पुण्यापासून अवघ्या 105 किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी हा किल्ला 300 मीटर एका उंच टेकडीवर वसलेला असून गडावर पोहोचण्यासाठी अवघे सात दरवाजे आहेत. या सात दरवाजांवरून असे लक्षात येते की त्याकाळी किल्ल्याला किती सुरक्षा असेल.
या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यामुळे हा किल्ला महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळखला जातो.
शिवनेरी किल्ल्याची रचना ( Structure of Shivneri Fort )
शिवनेरी किल्ल्याच्या चारही बाजूंना उतार आहे. व शिवनेरी किल्ल्याचा आकार हा उलट्या जहाजाप्रमाणे दुरून पहावयास मिळतो. या किल्ल्याला शिवपिंडीचा आकार प्राप्त झालेला आहे. जुन्नर मध्ये प्रवेश करताच शिवनेरी किल्ला आपल्याला पहावयास मिळतो. शिवनेरी किल्ल्याच्या विशालतेचा व सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भारतीयांसोबतच परदेशी प्रवासी देखील जुन्नर मध्ये येत असतात. शिवनेरी किल्ला हा दुरून त्रिकोणी अशा डोंगरांमध्ये पहावयास मिळतो. शिवनेरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हे नैऋत्य दिशेस मुख करणारे आहे. या किल्ल्यामध्ये मकबरा, मशीद, व प्रार्थना मंडळ अशी प्रमुख स्थळे आहेत. शिवनेरी किल्ल्यामध्ये मध्यभागी असणारे बदामी तलाव हे तळे अतिशय प्रसिद्ध आहे. या किल्ल्यामध्ये गंगा आणि यमुना हे दोन धबधबे पाहावयास मिळतात.
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास (History of fort Shivneri )
शिवनेरी किल्ला हा गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. शिवनेरी किल्ल्याची स्थापना इसवीसन 1780 मध्ये झाल्याची नोंद इतिहासात आढळते. शहाजी महाराजांचे पिता मालोजीराजे भोसले यांनी इसवी सन १५९५ मध्ये शिवनेरी किल्ला व त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यावेळी मालोजीराजे भोसले हे निजामशाहीत चाकरी करत होते. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच किल्ल्यावर झाला. 1667 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य विस्ताराचे कार्य हाती घेतले तेव्हा त्यांनी 1673 मध्ये शिवनेरी किल्ला स्वराज्यात आणण्यास खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. अवघ्या चाळीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर शिवनेरी हा किल्ला राजांनी स्वराज्यात आणला. हाच किल्ला शाहू महाराजांच्या काळात म्हणजेच इसवी सन 1716 मध्ये पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला.
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी आकारला जाणारा शुल्क (Fees to see fort Shivneri )
मित्रांनो किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. परंतु पर्यटकांसाठी हा किल्ला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत पर्यटनासाठी खुला असतो.
शिवनेरी किल्ल्यावरील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ( Popular spots on fort Shivneri )
शिवनेरी किल्ल्यावर प्रसिद्ध शिवाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर मुख्य मार्गापासून डावीकडे वळाल्यावर पाचव्या दरवाजातून आत जाऊन पुढे शिवाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. हे मंदिर म्हणजे मोठ्या खडकामध्ये खोदलेल्या सहा ते सात मोठ्या गुहाच आहेत. या मंदिरामध्ये शिवाई देवीची मूर्ती पाहावयास मिळते. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर जर तुम्ही मागच्या दाराने प्रवेश केला तर तुम्हाला अंबरखाना पाहावयास मिळतो. त्याकाळी अंबर खाण्याचा उपयोग अन्नधान्य साठवणुकीसाठी केला जात असे. त्याचबरोबर किल्ल्यावर बदामी तलाव पहावयास मिळतो. व गंगा यमुना या धबधबा पासून जो झरा तयार होतो तो सतत प्रवाही असतो. शिवनेरी किल्ल्यावर ती शिवकुंज पहावयास मिळते. हे शिवाजी महाराजांचे किल्ल्यावरील अप्रतिम स्मारक आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होऊन गेले यांनी या शिवकुंज स्मारकाची स्थापना केली. या वास्तूचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले.
मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल जी काही माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद…