गड किल्ले

जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती (Information about Janjira Fort)

नमस्कार मित्रांनो,

शिवाजी महाराजांचे गिरीदुर्ग व व जलदुर्ग ही शिवकालीन मराठा साम्राज्याची खरी संपत्ती आहे. या संपत्तीमध्ये महाराजांनी एकेक गडकोट जिंकून भर टाकलेली आहे. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंजिरा किल्ल्याबद्दल मा माहिती पाहणार आहोत.

जंजिरा किल्ल्याविषयीची प्राथमिक माहिती  (Brief information of Janjira Fort)

 जंजिरा हा किल्ला पाचशे वर्ष जुना असून हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे.कित्येक वर्ष समुद्राच्या लाटा झेलत हा अभेद्य किल्ला समुद्रात उभा आहे.

मुख्यत्वे करून हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यात असून जंजिरा   हा किल्ला राजापुरी या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.

जंजिरा किल्ल्याच्या पुढे अवघ्या काही अंतरावर छत्रपती संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा एक आणखी जलदुर्ग उभारला आहे. हा जलदुर्ग महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला असल्याचे इतिहासकार सांगतात.

जंजिऱ्याचा इतिहास (History of Fort Janjira)

 तर मित्रांनो जंजिरा या नावाचा उगम एका अरबी शब्दावरून झाला असल्याचे मानले जाते. “जझीरा” या शब्दावरून जंजिरा हे नाव पडल्याचे दिसून येते.जझीरा या शब्दाचा अर्थ होतो एक बेट. म्हणजेच ज्या ठिकाणी जंजिरा किल्ला उभा आहे ते समुद्रातील एक बेट मानले जाते. म्हणजेच अरबी समुद्रामध्ये हा किल्ला मध्यभागी उभा असून त्याच्या चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिलेला आहे.

जंजिरा किल्याची रचना (Structure of Janjira Fort)

साधारणपणे जंजिरा किल्ल्याचा आकार हा अंडाकृती आहे व किल्ल्याच्या प्रवेशद्वारा बद्दल बोलायचे झाले तर ते राजापुरी या गावाकडे तोंड केलेले पाहावयास मिळते. जंजिरा किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर शारबाची शिल्प बघावयास मिळतात. ही शिल्पे म्हणजेच सागरी शक्तीचे किंवा समुद्रावर राज्य करणाऱ्या सत्तांचे प्रतीक होय. या शिल्पांमध्ये बलशाली वाघ दाखवले असून त्या वाघाच्या तोंडामध्ये व पायामध्ये हत्ती पकडलेले दिसतात. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे 22 एकर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे व जंजिरा किल्ल्यावर 19 बुरुज आहेत. या किल्ल्यावर ज्यांनी अनेक वर्ष आपली सत्ता गाजवली ते म्हणजे अंबर सिद्धी.

जंजिरा किल्ल्याची स्थापना (Establishment of Fort Janjira)

 पूर्वी म्हणजेच 1912 च्या उत्तरार्धामध्ये राजापूर या गावांमध्ये काही कोळी बांधव राहत होते. ज्यांनी मासेमारीसाठी या बेटावर म्हणजेच जझीरा या बेटावर वस्ती स्थापली होती. पण त्यावेळी समुद्री लुटारूंनी या कोळी लोकांना खूप त्रास दिला यांच्या गटातील प्रमुख म्हणजे रामभाऊ पाटील, यांनी या लुटारुंपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी निजामबादशहाची परवानगी घेऊन “मेढेकोट”नामक किल्ल्याचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. हा किल्ला काही दगड गोट्यांनी बनलेला नव्हता तर लाकडाच्या ओंढक्यांनी हा किल्ला बनवला होता.

या किल्ल्यामुळे कोळी बांधवांचे  लुटारुंपासून संरक्षण झाले. तसे पाहायचे झाले तर सन 1490 पर्यंत या किल्ल्यावर कोणताच बादशहा किंवा राजा राज्य करत नव्हता. सन 1400 मध्ये मलिक अहमद नामक सरदार यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु रामभाऊ पाटील यांनी कडवी झुंज देऊन किल्ल्याचे संरक्षण केले.

निजामांना रामभाऊ पाटलांचे हेच वर्चस्व खटकू लागले म्हणून हा किल्ला परत मिळवण्याकरिता निर्मल खान या सैनिकाची रवानगी केली. निर्मल खान हा अतिशय दगाबाज होता. त्यांनी रामभाऊ पाटील यांच्यासोबत कनिष्ठ संबंध निर्माण करून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला आणि घात करून इसवी सन 1511 मध्ये किल्ल्यावर ताबा मिळविला.

मात्र पिरमल खान याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी बुरा खान यास नेमण्यात आले. त्याने निजामाच्या परवानगीने जुन्या किल्ल्याचे बांधकाम काढून त्या जागी नवीन दगडी किल्ला बांधला मात्र बादशहाने या किल्ल्याची जहागिरी अंबर सिद्धी यास 1617 मध्ये दिली.

सिद्धीने जंजिरा किल्ला आपल्या प्राणाची बाजी लावून शेवटपर्यंत राखला. अनेकांनी या किल्ल्यावर चढाई करण्याची प्रयत्न केली मात्र प्रत्येक जण यात अयशस्वीच झाला. म्हणूनच अंबर सिद्धीला जंजिरा संस्थानाचा मूळ पुरुष म्हणून ओळखले जाते.

स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ,त्यांचे पुत्र स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांनीही जंजिरा ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल 330 वर्षे जंजिरा हा अभेद्य आणि अजिंक्यच राहिला. 1947 पर्यंत या किल्ल्यावर कोणीही ताबा मिळू शकले नाही. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिराचे संस्थान भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट केले गेले.

किल्ल्याच्या रचनेबद्दल सांगायचे झाल्यास किल्ल्याच्या अगदी मधोमध शिरूरखान याचा वाडा असून आज मात्र तो पडक्या अवस्थेत आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर संरक्षणार्थ चोहूबाजूने तोफा असत. या किल्ल्यात एकूण 19 बुरुज असून दोन बुरुजांमधील अंतर दहा ते अकरा फूट आहे.

गडाच्या पश्चिम बाजूस एक दरवाजा बघावयास मिळतो, जो थेट समुद्रामध्ये उघडतो त्यास दर्या दरवाजा म्हणून ओळखले जाते. संकट काळात बचाव करता यावा यासाठी या दरवाजाची निर्मिती करण्यात आलेली असून समुद्रा घालून भुयारी मार्गे हा राजापुरी गावात उघडतो.

जंजिरा किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे (Places to visit on Fort Janjira)

मित्रांनो कुठलेही प्रेक्षणीय स्थळ बघावयास गेल्यानंतर तेथील काही गोष्टी आपले खास लक्ष वेधून घेत असतात.अशा अनेक ठिकाणांची रेलचल आपल्याला बघावयास मिळते.

किल्ल्यावर कलाल बांगडी तोफा सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. या तोफा किल्ल्याच्या तटबंदीवर असणाऱ्या कमानीवर ठेवण्यात आलेल्या असून त्यांची संख्या 572 असल्याचे सांगितले जाते. त्यातील कलाल बांगडी तोफ म्हणजे जणू आगीचा डोंबच. या तोफेचे  वजन तब्बल 21 ते 22 टन असून उन्हामध्येही वापरल्यास ही तोफ गरम होत नाही असे सांगितले जाते.

गायमुख तोफ नावाची आणखी एक तोफ देखील कलाल बांगडी तोफेच्याच बाजूला आहे. या तोफेची समोरील बाजू गायीच्या तोंडा सारखी असल्याने तिला गायमुख तोफ नाव पडले असल्याचे सांगितले जाते,जी आठ टन इतकी आहे.

मित्रांनो वर पाहिल्याप्रमाणे दर्या दरवाजा हा जंजिऱ्याचा जणू प्राणच. संकटात साथ देणारा हा दरवाजा गडाच्या पश्चिम दिशेस बघावयास मिळतो. याच्याच समोर 50 ते 60 फूट खोल समुद्राखालून भुयारी मार्ग आहे.

आज पडक्या अवस्थेत असणारा शिरूर खानाचा वाडा देखील किल्ल्याच्या मधोमध पर्यटकांचे लक्ष वेधण्यात मागे राहत नाही. याला स्थानिक लोक सात माजील महाल म्हणूनही ओळखतात.

मित्रांनो किल्ल्यावर भटकंती करत असताना चोहोबाजूनी निळाशार मात्र खारट समुद्र असताना या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय कशी होत असेल? असा प्रश्न आपल्यासारख्या पर्यटकांना नेहमीच पडतो. गडावर तब्बल साठ फूट खोलीचा गोड्या पाण्याचा एक तलाव असून, त्यास शाही तलाव म्हणूनही ओळखले जाते. चोहोबाजूने सागराचे खारट पाणी असताना देखील या तलावामध्ये मात्र गोड पाणी बघावयास मिळते.

जंजिराबद्दलची काही रोचक तथ्य (Interesting Facts about fort Janjira)

1. मित्रांनो आज आपण जंजिरा नावाने ज्याला ओळखतो तो किल्ला सिद्धींच्या काळात महारूब म्हणून ओळखला जाई.

2. जंजिरा हा अजिंक्य असा किल्ला आहे. हे आपण सर्वच जाणतो. या गडावर संरक्षणासाठी तब्बल 19 बुरुज आणि 572 तोफांची व्यवस्था करण्यात आली होती. याच जोरावर जंजिरा सुमारे 330 वर्ष कोणालाही सर करता आला नाही.

3. सर्वकाळ अभेद्य राहिलेला हा किल्ला स्वातंत्र्यानंतर मात्र भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आला.

4. असे म्हटले जाते की गोड्या पाण्याच्या तलावाच्या शेजारीच राणीचा शीश महाल होता. ज्यास वेगवेगळ्या सात रंगांच्या काचा लावलेल्या होत्या, आणि उन्हात त्यांचे प्रतिबिंब गोड्या पाण्याच्या तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबित होत असे. जे एका इंद्रधनुष्याप्रमाणे दिसत असे.

5. जंजिरा हा किल्ला चहुबाजूने सुपारी आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे.

जंजिराच्या पर्यटनाला कसे जाल (How to reach fort Janjira)

मित्रांनो आपण जंजिरापासून किती लांब आहात यानुसार आपण विमान, रेल्वे, बस, अथवा स्वतःच्या वाहनाने जंजिऱ्याच्या सहलीवर जाऊ शकता. मुंबई या शहरापासून जंजिरा हा 165 किलोमीटर आहे. आपण सर्वप्रथम मुंबई अथवा पुणे मार्गाने अलिबाग अथवा रोह्यापर्यंत पोहोचावे. अलिबाग ते जंजिरा अंतर 54 किलोमीटर आहे. आपल्याला जंजिरा किल्यावर जाताना बोटीनेच जावे लागते, बोटीने जाताना मांजरी, श्रीवर्धनम, दिघी, दिवेआगर किंवा राजापुरी या ठिकाणावरून बोट पकडू शकता. मात्र राजापुरी गावापासून जंजिराचे अंतर केवळ पाच ते सहा किलोमीटर इतकेच असल्याने तेथून बोटीने जाणे सोयीस्कर ठरते.

जंजिरा किल्यावर जाणारी पहिली बोट साडेआठ वाजता आहे, मात्र आपल्याला किल्ला बघण्यासाठी केवळ पाऊण तास अर्थात 45 मिनिटेच मिळतात. त्यामुळे किल्ला बघाताना वेळेचे भान देखील राखावे लागते…

तर मित्रांनो आजचा जंजिरा या विषयावरील हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button