सामाजिकपैशाविषयी

Money or People | पैसा महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची

आजचा विषय असा आहे की पैसा महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची (Money or People )?समजा आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला काही आरोग्याचा त्रास असेल आणि आणि आपली त्या दवाखान्यात ओळख असेल तर ट्रीटमेंटचा पैसा कमी लागेल बरोबर ना ?

जेव्हा मी शाळेत होतो किंवा तू शाळेत होतो तुला कोणी विचारलं की भाऊ पैसा महत्वाचा की माणसं ? काहीच माहित नव्हतं की पैसा काय करतो कारण आई-वडिलांनी पण आपल्याला ते एक्सपोजर आपल्याला दिलं नव्हतं, सगळ्या शाळेच्या निबंधामध्ये माणसं लिहिलेत आपण अकरावी बारावी गेल्यावर कळलं की वडिलांकडून थोडेसे पैसे खोटे बोलून काढावे लागतात तेव्हा आपण म्हणू शकतो की पैसा महत्त्वाचा. त्यात ते लोकांनी लेबल्स फेमस केले जसं की यंगेस्ट बिलीनिअर वगैरे.

हळू हळू माणसाला कळतं की माणसात राहणं खूप गरजेचे आहे पण हेही तितकच खरं आहे की पैसा खूप सारा पैसा प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी वाढवतो आणि कोणी याला अपोज करू शकत नाही. पैशाचा सदुपयोग केला तर माणसं कमवता येतात. जे पैसा तुमच्या आयुष्यात जे काय तुम्हाला देऊ शकतो ते माणूस देऊ शकत नाही

Money or People
Money or People

माणसांची गर्दी काहीच कामाची नाही गर्दी काहीच कामाची नाही कारण मी बघितला आहे की गर्दीतली माणसं एकटी असतात ज्याने गर्दी कमवलेले असते ना त्यांनी प्रत्येकाला  त्याचा एक पार्ट दिलेला असतो , आणि त्याला तो पार्ट वापस मिळत नाही हाच माणूस रात्री एकटा बसतो आणि विचार करतो की माझ्यासाठी कोण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गर्दीमध्ये हसतो. पैसा हा माणसाला स्वतंत्र निर्णय घ्यायला साहस देतो, पैशाने तुम्ही माणसं कमवू शकता पण माणसाने पैसे कमावणं अवघड आहे

माणसाची जागा पैसे घेऊ शकत नाही आणि पैशाची जागा माणूस घेऊ शकत नाही. माझ्या मित्राचा किस्सा सांगतो मी की त्याचे वडील जेव्हा हॉस्पिटलला होते ना तेव्हा तो जॉब वगैरे करत होता आणि नुकताच बिझनेस टाकला वॉलपेपरचा त्याला नाही काही वडिलांसाठी जास्त करता आलं आणि वडील वारले त्याचे त्यांनी सावकाराकडून सुद्धा जेवढे पैसे जमतील तेवढे घेतले पैसे लावले पण शेवटी वडील वाचले नाहीत.

 वडील वारल्यानंतर त्यांनी एका वर्षात ग्रोथ केली वडील आणि आई दोघं नव्हते तर त्याने दुसऱ्या शहरात राहून खूप मेहनत केली एक वर्ष बिल्डर्स टायप करून खूप मेहनत घेऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांनी पैसा कमावला नंतर त्यांनी वडिलांचे वर्षश्राद्ध मोठं केलं पण शेवटी लोक त्याला बोलले की तुझे वडील होते तेव्हा तू त्यांना पैसे लावले नाही आणि आता वर्षश्राद्ध मोठं घातलं , माणसाने बघितलं की त्याच्या वडिलांना बरं नव्हतं तेव्हा त्यांनी नुकताच बिझनेस चालू केला होता आणि पंधरा हजारावर काम करत होता त्यामुळे नाही त्याला बाप वाचवता  आला त्याचा. माणसांना प्रत्येक गोष्टीशी प्रॉब्लेम आयुष्यभर राहणार आहे

Money or People
Money or People

सर्व गोष्टी बघता आपल्या आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की काही ठिकाणी पैसा महत्वाचा असतो आणि काही ठिकाणी माणसं महत्त्वाचे असतात तर आपण दोघांना( Money or People ) वेळ दिला पाहिजे आणि पैसा आणि माणसं दोन्ही जपलं पाहिजे. पैसा आणि माणसं दोन्ही महत्त्वाचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button