जिल्ह्यात सुविधा नाहीत मग कर तर का भरायचा ?
ज्या जिल्ह्यामध्ये तूम्ही लहानपणापासून राहता, तेथेच तूमचे बालपण गेले आहे.
सर्व आठवणी त्याच जिल्ह्यातल्या मग साहजिकच तूम्हाला त्या जिल्ह्याबद्दल आपुलकी वाटणारच..
पण तूमच्या जिल्ह्यात कित्येक वर्ष विकासच होत नाही, दुसऱ्या जिल्ह्यात गेलात की सगळया गोष्टीचे कौतूक करावेसे वाटते.
रस्त्याची रूंदी असो किंवा त्यांच्या मार्केटमधील गर्दी असो, मोठमोठ्या इमारती असो, लोकल बस असो,पायी चालण्यासाठी केलेला रस्ता असो, किंवा स्वच्छता असो.
अशा अनेक मोठ्या गोष्टी असो त्यांच्या कडे बघितले की आपला जिल्हा किती मागास आहे हे कळते.
मुलभूत गोष्टी सुध्दा इतके वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र भेटून तरी आमच्या जिल्ह्यात नसतील तर काय उपयोग.
नगरपालिकेचा काय उपयोग आहे आमदार, खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तींचा ,या सर्वांनी मिळून आपल्याला साध्या मूलभूत गोष्टी पुरवल्या नाहीत..
काल परवा यांनी काय काम केले तर उजनी घरणातून आपल्याला पाणी पुरवले आणि येणाऱ्या ३० वर्षापर्यंत पाण्यांची चिंता नाही असे बॅनर सगळीकडे लावले..
एवढया वर्षात एक काम करता आणि ते पण काही वर्षासाठीच.
पून्हा काय करायचे लोकांनी ,तात्पूरती मलमपट्टी कशाला करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय केला असता तर म्हंटले असते.
की यांनी काही तरी मोठे काम केले..तरी या निर्णयाचे स्वागतच..
सामान्य माणूस काय अपेक्षा ठेवते तूमच्या कडून , ज्या भागात आपण राहतो त्या भागात काही मूलभूत गोष्टींची गरज मागत असतो सामान्य माणूस.
यायला जायला चांगला रस्ता असावा, एवढा वर्षात साधा शहरातला रस्ता सुध्दा चांगला करता आला नाही त्यात ही भ्रष्टाचार.
जर शहरातील रस्ते चांगले असतील तर मार्केटला सुध्दा चालना मिळते.
दुसरी गोष्ट स्व्च्छता ,किती साधी गोष्ट आहे तरी याचे आमलबजावणी तूम्ही करताना दिसत नाही..
आपल शहर स्वच्छ असेल तर आपल्या शहरात येणारे जाणारे आपल्याला कडे अभिमानाने बघतिल पण नाही ते सुध्दा तूम्ही करू शकत नाही..
रस्त्याच्या कडेने गरीब लोकांना चालण्यासाठी पाउलवाट सुध्दा तूम्ही साधी करू शकत नाही..का सगळेच आपल्या शहरातले श्रीमंत असतात का की गाडी घेउनच फिरणार.
हाताला रोजगार देणे, युवकांना नौकरी देणे ,उद्योगासाठी निधी देणे, वृध्द लोकांसाठी वेगवेगळया योजना चालू करणे.
या तर गोष्टी लाबंच असु दयात ,साध आम्हाला मुलभूत गोष्टीचा तर स्वाद घेण्यापूरते तरी वातावरण तूम्ही तयार करायला पाहिजे ..
बर असे ही नाही की तूम्ही दुसऱ्या शहरात राहून येथे शासन करत आहात, अरे तूम्ही पण येथेच राहता ,याच वातावरणात राहता, याच रस्त्यांनी जाता.
तूम्हाला वाटत नाही का की आपण चांगल्या गोष्टी करायला पाहिजे,एवढी तटस्थ भूमिका का घेता.
मग जर तूम्ही आम्हाला मूलभूत गोष्टी देत नसाल तर आम्ही कर का भरायचा.
प्रत्येक गोष्टी वर आम्ही कर भरतो ,साधारण सकाळी दात घासणारा ब्रश पासून ते चैनीच्या वस्तूपर्यंत सगळया वस्तूवर आम्ही कर भरतो, का म्हणून आम्ही कर भरायचा.
घरपट्टी का आम्ही भरायची, नळपटृटी का आम्ही भरायची तर वेळेवर पाणी येत नसेल तर.
येथे नमूद पण करत आहे की गेल्या वर्षापासून पाण्याची टंचाई नाही जाणवत शहरात.
पण खेडयागावातील लोकांचे काय ?
- घरपटृटी मध्ये आपल्या आजूबाजूला जर झाडे असतील तर त्याचा पण कर हे घेतात,का आम्ही कर भरायचा ,साधे तूम्हाला रस्त्याच्या कडेने झाडे सुध्दा लावता येत नाहीत.
का आम्ही कर भरायचा ?
- साधी तूम्हाला नाल्याचे बांधकाम सुध्दा नीट करता येत नाही अर्धवट उघडया नाली करता.
- तूम्ही वीज पूरवठा करता आणि तूमच्या मर्जीने किती वेळ पण लाईट घालवता..
- आमच्या मुलांसाठी जिल्ह्या परिषद शाळा मध्ये तूम्हाला साध्या सुविधा देता येत नाहीत..
- का कर आम्ही भरायचा तूम्ही आमच्या कसल्याच कामाला येत नाहीत…
म्हणून सर्वांनी निषेध केला पाहिजे ,आणि जिल्ह्यात सुविधा नाहीत तर मग कर पण भरला जाणार नाही.
लेखक : राक ढेकणे