काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला की आता विवाहित असो किंवा अविवाहित असो ,कोणत्याही स्त्रीला २४ आठवडयाच्या आत गर्भपात करता येणार..या निर्णयांचे अभिनंदन केलेच पाहिजे पण याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या न वाढू नये याची काळजी सरकार कशा प्रकारे घेणार हे खरे चिंतेचे कारण असू शकते.
एखादा गर्भ खाली करणे योग्य असेल जेव्हा त्या मध्ये काही अडचणी असतील ,या साठी स्त्रीचा त्यांच्या शरीरावर पूर्णपणे अधिकार असेल की तो गर्भ खाली करण्याचा ..
समाजामध्ये अशे पण काही जण आहेत त्यांना मूल हवे असते पण जर मूलगा असेल तर ठिक नसेल तर मूलगी नको म्हणून गर्भपात करण्याला जर या कायदानुसार वाव भेटेत असेल तर ,हे खूप चिंतेची बाब आहे.
स्त्री चा अधिकारावर गदा नको म्हणून सरकारने २४ आठवडया पर्यंत ही मर्यादा केली हे करणे योग्यच .. तसेच काही स्त्रीयांवर अत्याचार वगैरे होतात ,त्यांच्या परवानगी शिवाय जर गर्भ तयार होत असेल तर यासाठी २४ आठवडयाची मुभा खरच त्यांच्यासाठी लाभदायक असेल यात काय शंका नाही..
एक स्त्री आणि एक पूरूष याचा फक्त विचार सरकारने केला आहे..पण आपल्या लग्नव्यवस्थेला अशा कायदयाने थोडासा तडा गेला असे मला वाटत आहे..पहिले कसे होते की जर स्त्री विवाहित असेल तरच तिला या गर्भपात करण्यास परवानगी होती..पण आता एखादी स्त्री अविवाहित आहे ,त्यांना जर गर्भपात करायचा असेल तर पहिल्या नियमानुसार करता येत नसे ,आता ते करता येणार आहे..
ज्या स्त्रीया अनैतिक संबंध निर्माण करतात अशा स्त्रीयांची संख्या जर वाढली आणि लग्न व्यवस्था फक्त नावापूरती शिल्लक राहिल..कारण कोणतेही स्वातंत्र्य जास्त प्रमाणात जर मिळत असेल त्याचा गैरफायदा घेणारे तयार होत असतात..याच्या नियंत्रण आणणे सरकारला कठीण जाईल असे मला वाटते..
असो पण मूलाला जन्म दयायचा का नाही हे स्त्रीचा अधिकार आहे या निर्णयातून जगाच्या समोर आले आहे.एखादया घरी असते की काही वर्ष झाली की लग्नाला की मूल झालेच पाहिजे,पण काही जणांना करिअर महत्वाचे असते अशा मूलींना या निर्णयांचा फायदा होणार..काही जणांना आपले करिअर स्थिर झाल्यावर या गोष्टीवर काम करायचे असते.पण सासू सासऱ्यांच्या विचारामूळे त्या मूलांना जन्म दयायला तयार होतात पण त्या मनाने तयार नसतात आताच त्यांना जबाबदारी घ्यायची नसते त्यांच्या साठी हा निर्णय खूपच लाभदायक आहे.
पण या निकालातून हे पण अधोरेखित होत आहे की समूह,कुटुंब यांपेक्षाही व्यक्तीला महत्व प्राप्त झाले आहे..पुरषप्रधान संस्कृतीला या निर्णयाने जरा कुठेतरी चाप बसेल..
जसे याचे फायदे आहेत तसेच याचे दुष्परिणाम आपल्याला समजून घ्यावेच लागतील,गर्भपात करायला आपल्याला परवानगी आहे हे सगळयांच्या लक्षात आल्यावर त्यांचे नैतिक तसेच अनैतिक संबंध जास्त प्रमाणात वाढतील..भारतीया कुंटुंब व्यवस्थेला थोडासा धोका निर्माण होउ शकतो..
या उलट अमेरिकेमध्ये स्त्रीयांना गर्भपाताचा निर्णय नाकारण्यात आला आहे..म्हणजे ज्या समाजाकडे बघून आपण मोठे होते ,त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करतो बघा त्या देशामध्ये स्त्रीयांचे अधिकार काढून टाकण्यात येत आहे..जरी भारत जून्या विचारांना चिकटून असेल तरीही आपल्या न्यायालयात सर्वांना न्याय मिळतो ,भेदभाव होत नाही हेच या निर्णयातून सिध्द होत आहे..
पुरुषांचा अधिकार स्त्रीच्या शरीरावर नसतो हेच या निर्णयातून आपल्या समोर सिध्द झाले आहे..
पण हे पण मान्य आपल्याला करावे लागेल की संरक्षण साहित्य वापरण्याचे प्रमाण कमी होईल,तरूण पिढी बिनधास्त शारिरिक संबंध निर्माण करण्यास पूढे येतील,तसेच अनैतिक संबंध जास्त प्रमाणात वाढतील आणि आपल्या संस्कृतीला कुठेतरी धोका होउ शकेल असे माझे वैयक्तिक मत आहे..
या लेखातून कोणाचे मत दुखावले गेले असेल तर मला माफ करावे ..चूकीची माहिती ही असेल तर तसे मला कळवावे.
Ho ekdum brobr ahe fayda kmi n gairfayda ghenare khup jn hotil