जागतिकसामाजिक

चला तर आज बघूया आपण कसा आहे वनतारा

गुजरातच्या जामनगर मध्ये जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभे राहते तिथे जगभरातून रेस्क्यू केलेला प्राण्यांना एकत्र ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवल्या जातेसह जगाच्या कानाकोपऱ्यातून वाघ सिंह यांसारखे हिंस्र पशु सुद्धा एकत्र ठेवून त्यांचा संगोपन केले जाते मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून 3000 एकर परिसरात हे सग्रहालय उभारण्यात आले. हा पूर्ण कन्सेप्ट अनंत अंबानी यांचा असून तो जामनगर गुजरात मध्ये आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे वनतारा , चला तर आज बघूया आपण कसा आहे वनतारा.

जामनगर मध्ये 3000 एकरामध्ये वन ताराची निर्मिती, येथे जे काही केले जातात ते सेवाभावानुसार केलं जातं. जे प्राणी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. त्यांच्या सेवेसाठी अनंत अंबानी यांनी कष्टातून वन तारा प्राणी संग्रहालय बनवले आहे. काही दुर्लभ प्रजातीय जगात टिकून राहाव्यात हे पण एक महत्त्वाचे कारण आहे.

महाराष्ट्राच्या आशीर्वादाने अब की बार चार सो पार

अनंत अंबानी यांना त्यांचे वडील आणि आई यांनी या प्रोजेक्टसाठी प्रेरित केले. आई नीता अंबानी अनंतला लहानपणीपासूनच सांगत आली की मुक्या जनावरांची सेवा केल्यास खूप पुण्य लाभते. सनातन धर्मावर माझी खूप श्रद्धा आहे, श्रीराम सुद्धा जटायूची सेवा करत होते असे अनंत अंबानी म्हणाले. मुक्या जनावरांची सेवा हा एक मोठा धर्म आहे.

मुक्या जनावर यांच्यात देव बघून त्यांची सेवा करतो. देवाने मला ही सेवा करण्याचा वेळ दिला त्याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे. भारताच्या विविध भागातून जवळपास दोनशे हत्तींचे प्राण वाचवून त्यांना वन तारा येथे आणले गेले व त्यांची सेवा चालू आहे, त्यांच्यासाठी विदेशातून डॉक्टर बोलवण्यात आले या मुक्या जनावरांना जो काही त्रास आहे त्याबद्दल डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देत आहे. विदेशातून औषध, पशु चिकित्सक बोलवण्यात आले.

ई श्रम कार्ड योजनेविषयी माहीती E Shram Card Scheme Information In Marathi

भारतातील अनेक ठिकाणांवरून ज्या विद्यार्थ्यांनी बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्राविण्य मिळवले आहे त्यांना येथे बोलण्यात आले व विदेशातून काही पशु चिकित्सक व डॉक्टर्स बोलवण्यात आले हे डॉक्टर्स आता या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. अनंता अंबानी यांनी(चला तर आज बघूया आपण कसा आहे वनतारा) तीन हजार जणांची टीम बनवली आहे त्यात 80 पशुचिकित्सक आहेत 50 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आहेत. अजून या प्रोजेक्टवर काम चालू आहे आणि ही फक्त एक झाकी आहे अजून खूप काम बाकी आहे असं अनंत अंबानी बोलत होते.

नवीन पिढीने जंगल वाचवावे, खूप सारे प्रजाती या दुर्लभ होत चालले आहेत यावर नवीन पिढीने काम केले पाहिजे. मी फक्त एक पाण्याचा थेंब आहे अजून खूप काम आपल्याला करायचे बाकी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button