गड किल्लेजागतिक

Forts will become heritage sites

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची गाथा देशभरातच नव्हे तर परदेशातही पोहोचली आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी नौदल उभा करण्याचे पाऊल उचलणारे ते पहिलेच. शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करताना अनेक गड किल्ले बांधले, आणि किल्ल्यांची पुनर्बांधणी केली. आता शिवरायांच्या काळातील गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त 2024-25 या वर्षासाठी मराठा लष्कराचे निवडक गड किल्ले व व्युहात्मक लष्करी संरचनाचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी नामांकने पाठवण्यात येणार आहे. त्यात एकूण 12 किल्ल्यांचा (forts will become heritage sites)समावेश आहे.

महाराजांचे जन्मस्थान..!

शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. पुण्यापासून 90 किलोमीटरवर असलेल्या जुन्नर शहरात हा किल्ला असून या किल्ल्याची रचनात्मक शैली अभ्यासण्यासारखी आहे. किल्ल्याची वास्तुकला आणि येथील पाण्याची सोय इ.स. पहिल्या शतकापासून या ठिकाणी मानवी वस्ती असल्याचे दाखले देते. शिवनेरीवर शिवाई मंदिर आहे शिवाय मातेच्या गडावर जन्म झाला म्हणून राजांचे नाव शिवाजी ठेवले गेले.
स्थळ :जुन्नरनजीक ,जिल्हा पुणे पुण्यापासून 90 किलोमीटर.

मराठा साम्राज्याची राजधानी..!

रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागदुजी करून त्याला १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केले. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटांमध्ये किल्ल्यावर पोहोचता येते. रायगड किल्ल्यावर एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव गंगासागर तलाव असे आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग महादरवाजा मधून जातो.
स्थळ: महाड पासून 25 किलोमीटर

मजबूत तटबंदीची जोडगळ..!


जलदुर्गाची जोडगड म्हणजे खांदेरी उंदेरी हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पश्चिम कोकण डोंगर रांगेत आहे. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभ्या असलेल्या खांदेरी उंदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी आणि १५ वर तोफा. खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असताना खांदेरीचे मजबूत तटबंदी बुलंद बुरुज आणि त्यावर असणारे मुंबई पोर्ट ट्रस्टचे दीपगृह लक्षवेधून घेतात.
स्थळ थळीची किनारपट्टी अलिबाग पासून जवळ

खजिना ठेवण्याचे स्थान..!


लोहगड किल्ला हा नावाप्रमाणेच मजबूत गड आहे राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याकडे पाहिले जाते हा ऐतिहासिक किल्ला पुण्यापासून 52 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की या किल्ल्यात महाराज आपला खजिना ठेवत असत तो बहुतेक काळ महाराजांनी वापरला आणि विदर्भातील अनेक राजवटी आणि मराठा साम्राज्याचे निवासस्थान म्हणून किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
स्थळ: लोणावळा हिल स्टेशन पासून 20 किलोमीटर अंतरावर

मराठ्यांचे आरमारी केंद्र..!


मराठ्यांच्या आरमारी केंद्र म्हणून ओळख असलेला आणि ज्याच्या तटबंदीवर तत्कालीन तोफ गोळ्यांचे व्रण आजही दृष्टीपथास पडतात असा घेरिया अर्थात विजयदुर्ग किल्ला. अष्टशताब्दी महोत्सवामुळे किल्ल्याच्या शौर्याची गाथा विविध पारमार माध्यमांच्या मदतीने संपूर्ण जगासमोर आले या अभेद्य किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखले जायचे अतिशय भक्कम असलेल्या या किल्ल्याने ब्रिटिशांसह इतर परकीय आक्रमणांची आक्रमणे झालेली आहे.
स्थळ: देवगड पासून 29 किलोमीटर अंतरावर जिल्हा सिंधुदुर्ग.

कल्पक बांधकाम, शिल्पाकृती..!

सुवर्णदुर्ग हा राज्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग आहे शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात हा किल्ला बांधला आणि मराठा साम्राज्याने त्याचा एक महत्त्वाचा नौदल तळ म्हणून वापर केला जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजापासून शंभर मीटर अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एका दरवाजाचे अवशेष दिसतात या दरवाजातून आत डावीकडे दोन तोफा अर्ध्या गाडलेल्या सिरीज आहेत तसेच पुढे सात फूट लांबीची एक तोफ आहे.
स्थळ : हरणे बंदरा जवळ तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी.

मराठा नौदलाचे मुख्यालय..!

महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हे अरबी समुद्रातील खुर्च्या बेटावर मालवण किनाऱ्याजवळ स्थित थक्क करणारे वास्तुशिल्प आहे किल्ल्याचे भव्य बांधकाम सोळाशे 64 मध्ये हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखी काली सुरू झाले होते हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शंभर वास्तु विद्या विशारद आणि तीनशे लोकांचे मनुष्यबळ लागल्याची नोंद आहे सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा नौदलाचे मुख्यालय होता. छत्रपतींची रणनीती आणि असामान्य बुद्धीचे दर्शन हा किल्ला घडवतो.
स्थळ :मालवण तालुक्यातील समुद्र तट जिल्हा सिंधुदुर्ग.

गडांचा राजा , राजांचा गड..!

राजगड हा महत्त्वाचा डोंगरी किल्ला पूर्ण पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आहे. गडांचा राजा तसेच राजांचा गड असा बहुमान राजगडाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्याच्या बहुमान या किल्ल्याला मिळाला हा किल्ला समुद्रामधील मुरुंबदेवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे पुरंदराच्या दहा मध्ये 23 किल्ले महाराजांनी मुघलांकडे सोपवले होते पण बारा किल्ल्यांमध्ये राजगड किल्ला स्वराज्यामध्ये ठेवला होता
स्थळ: बोर गावापासून 24 किलोमीटर तालुका वेल्हे जिल्हा पुणे.

साम्राज्याचा सूत्रधार..!

भारताच्या लष्करी इतिहासामध्ये पन्हाळा किल्ल्याला विशेष महत्त्व आहे मोक्याच्या जागेमुळे किल्ला काबीज करण्यासाठी अनेक लढाया झाल्या किल्ल्यासाठी मराठी मोगल ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्या त्यात पावनखिंड ची लढाई अजरामर झाली द्वितीय राजा भोज याने हा किल्ला बांधल्याचे बोलले जाते भक्कम तटबंदी उंचावरील स्थान पाण्याचा साठा विपुल जागा आक्रमण झाल्यास पावनगडासारख्या जोड किल्ला ही किल्ल्याची जमेची बाजू होती.
स्थळ :कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर.

अफजल खानचा वध

इतिहासाच्या जीताजागता साक्षीदार म्हणजे किल्ले प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार आदिलशाही विरुद्ध च्या युद्धाच्या वेळी निरा व कोयना या नद्यांच्या किनारी आणि सभोवतालचा भूभाग यांच्या रक्षणासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते तीन वर्षानंतर प्रतापगडची प्रसिद्ध लढाई याच किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली घडली अफजलखानाचा वध ही प्रतापगडावरील ऐतिहासिक घटना मानली जाते.
स्थळ: महाबळेश्वरजवळ जिल्हा सातारा.

एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi

सर्वात अभेद्य किल्ला..!

सर्वात अभेद्य असे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची केले होते इंग्रजांनी त्याला पूर्वेचा ट्राय म्हणले होते नवव्या शतकात चोल साम्राज्यात या किल्ल्याची उभारणी झाल्याचा अंदाज आहे हा किल्ला सात टेकड्यांवर आहे महाराजांनी किल्ल्याची पूर्ण बांधणी केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी येथूनच स्वराज्याचा कारभार सांभाळला होता हा किल्ला काबीज करण्याचे औरंगजेब चे स्वप्न अखेरपर्यंत अपूर्ण राहिले
स्थळ :चेन्नईपासून १५० किलोमीटर अंतरावर तमिळनाडू.

कर्नाळा किल्याची प्राथमिक माहिती, Basic information of Fort Karnala

कळसुबाईच्या खालोखाल उंची..!

साल्हेर हा डोंगर रांगेवर समुद्र सपाटीपासून 1567 मिटर म्हणजेच 5 141 फूट उंचीवर आहे या किल्ल्याला कळसुबाईच्या खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला याबद्दल इतिहासात ठोस पुरावे नाहीत इसवीसन चौथ्या शतकात येथे गवळी राजांची सत्ता होती याच राज्यकर्त्यांनी हा किल्ला बांधला असावा असे सांगितले जाते छत्रपतींच्या बागलाण मोहिमेत किल्ला(forts will become heritage sites) स्वराज्यात दाखल झाला.
स्थळ :डोलाबारी डोंगररांग तालुका सटाणा जिल्हा नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button