शेती

शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती (Goat Farming Business )शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती (Goat Farming Business )शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती (Goat Farming Business )

नमस्कार मित्रांनो,

       मित्रांनो आजकाल नोकऱ्यांची वाणवा बघता स्वतःचा व्यवसाय असणे किती आवश्यक आहे हे आपण सर्वांनीच कोरोना काळात अनुभवले आहे. कोरोना काळात सर्व नोकरदार वर्गांचे आयुष्य अगदीच जिकरीचे बनले होते.

व्यवसाय म्हटलं की प्रत्येकाला शेठजी सारखे बसून उत्पन्न हवे असते. मात्र ऐशोरामाकडे लक्ष न देता केवळ उत्पन्न कमावणे हा उद्देश ठेवून केलेला व्यवसाय पिढ्यानुपिढ्या नफा देत राहतो.

शेती क्षेत्रामध्ये देखील अनेक असे व्यवसाय आहेत जे तुम्हाला वर्षाचे बाराही महिने चांगले उत्पन्न मिळवून देतात. यामध्ये शेळीपालन हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा विषय ठरतो. वर्षभर मांसाला असणारी मागणी आणि परिणामी निर्माण झालेली शेळीपालनाची गरज या दोनच गोष्टी शेळीपालनाच्या व्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहेत.

 आजच्या या भागामध्ये आपण शेळीपालन या विषयावर माहिती बघणार आहोत…

शेळीपालनासाठी शेळीची निवड कशी कराल? (How to choose breed of goat for goat Farming business?)

     मित्रांनो शेळीपालन करताना शेळी ही नेहमीच उत्तम प्रजातीची असावी. जर आपण दूध उत्पादन करण्यासाठी शेळी निवडत असाल तर या प्रकारच्या शेळीमध्ये नाकपुड्या  मोठ्या व लांबट तसेच शेळीची शरीरचना ही मजबूत असावी. तसेच शेळीचे डोळे हे तेजस्वी आणि पाणीदार असावेत. पायाची ठेवण नेहमीच सरळ असावी. आणि शरीर हे त्रिकोणी असावे. तसेच शेळीची कास ही मोठी असावी, मात्र दूध काढल्यानंतर ती लगेचच लहान होईल अशी असावी. दोन दात केलेली आणि शक्यतो गाभण असणारीच शेळी निवडण्यास प्राधान्य द्यावे.

आपण जर मांस म्हणून विकण्यासाठी शेळीची निवड करत असाल तर शेळी ही जास्त पिले देणारी आणि सदृढ असावी. जेणेकरून तिची पिल्ले देखील सुदृढ होतील. यामध्ये देखील शेळी मजबूत बांध्याची आणि भक्कम पाय असणारीच निवडावी. शेळीस पिले झाल्यानंतर यातील बोकड मोठे करून मांस उत्पादनासाठी विक्री करू शकता तसेच यातील शेळ्या पुन्हा नवीन करडे जन्माला घालण्यासाठी वापरता येतात.

शेळीपालनाची पूर्वतयारी काय असावी? (what should be the preparation for goat Farming business?)

मित्रांनो शेळीपालनापूर्वी शेळ्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे असते. शेळीपालनाचा निवारा तयार करताना सूर्यप्रकाशाचा विचार करणं गरजेचे ठरते. निवारा हा भरपूर सूर्यप्रकाश असणारा तसेच उंच जागेवर आणि हवा खेळती असणारा असावा. यामध्ये बोकड, शेळी, आणि लहान पिले यांच्यासाठी वेगवेगळी सोय असावी. निवाऱ्यास चारही बाजूंनी जाळी असावी. तसेच शेळ्यांच्या खाद्य देण्यासाठी तसेच चारा टाकण्यासाठी गव्हाण असावी. सोबतच ऊन, पाऊस, वारा यांच्यापासून संरक्षण होईल या पद्धतीने निवाऱ्याची रचना केली जावी.

शेळीपालनाच्या पद्धती (Methods for Goat Farming Business)

शेळीपालन विविध पद्धतीने केले जाऊ शकते. यामध्ये परंपरागत पद्धत, ठाणबंद पद्धत, आणि अंशतः ठाणबंद पद्धत इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना दिवसभर मोकळ्या शेतामध्ये करावयास सोडले जाते, आणि संध्याकाळच्या वेळी पुन्हा घरी आणून मोकळ्या वातावरणात केवळ जाळीमध्ये एकत्र केले जाते. या पद्धतीमध्ये शेळ्या सांभाळण्यासाठी एक व्यक्ती देखील पुरतो, जो दिवसभर या शेळ्यांची काळजी घेऊन त्यांस चारून आणेल. ही शेळीपालनाची सर्वात उपयुक्त व उत्तम पद्धत समजली जाते.

ठाणबंद पद्धतीत शेळ्यांना जागेवरच बांधून ठेवले जाते, आणि त्यांना आयता चारा पुरविला जातो. ही पद्धत शेळीपालनासाठी फारशी उपयुक्त ठरत नाही. यामध्ये शेळ्यांची फारशी हालचाल न झाल्यामुळे शेळ्यांची पिले जन्माला घालण्याची क्षमता घटते, तसेच दूध उत्पादन देखील घटते. सोबतच चारा कापून आणणे, त्यांना खाऊ घालणे, आणि शेळ्यांच्या निवाऱ्याची निगा राखणे (झाडलोट करणे, केर-कचरा काढणे इ.) यासाठी एक व्यक्ती पुरत नाही.

अंशतः ठाणबंद पद्धतीमध्ये शेळ्यांना काही काळ मोकळे चरण्यासाठी सोडले जाते, तर काही काळ त्यास बांधून ठेवले जाते. अशा पद्धतीत साधारणतः दिवसभर चरायला सोडलेल्या शेळ्या संध्याकाळी दोराच्या साह्याने बांधून ठेवल्या जातात. तसेच कधी कधी शेळ्या चरावयाला नेण्यास व्यक्ती उपलब्ध नसेल तर ठाणबंद पद्धतीप्रमाणेच यांनाही जागेवर चारा पुरविला जातो. ही पद्धत ठाणबंद पद्धतीपेक्षा सोयस्कर ठरते.

शेळ्यांमधील प्रजननाबाबत महत्वाच्या बाबी  (Points to be noted on Reproduction of Goats)

    मित्रांनो आठ ते बारा महिने वयाच्या शेळ्या प्रजानासाठी उपयुक्त समजल्या जातात, आणि त्या सहा महिन्यांमध्ये करडे जन्माला घालतात. शेळ्या या पहिल्या वेतापासून आठ वर्षापर्यंत नियमितपणे करडे देत असतात.

शेळीपालनातील उत्पन्नाचा मार्ग (Income Source in Goat Farming Business)

मित्रांनो शेळीपालन प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी केले जाते, एक म्हणजे दुग्धउत्पादन आणि दुसरे म्हणजे मांस उत्पादन. साधारणतः दुग्ध उत्पादनासाठी शेळीपालन सहसा केल्याचे आढळून येत नाही, मात्र मांस उत्पादनासाठी नेहमीच शेळीपालन केले जाते. शेळीच्या वेतानंतर जन्माला आलेली करडे मोठी केली जातात, आणि त्यातील बोकड मांस उत्पादनासाठी विकला जातो.

मांस उत्पादनासाठी बोकड सांभाळताना (While Farming bucks for meat production)

मित्रांनो आपण मांस उत्पादनासाठी बोकड मोठा करत असताना त्याचे वजन वाढविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असते. यासाठी त्या बोकडास लहानपणापासून त्याच्या आईचे दूध पूर्णपणे पाजावे. तसेच त्यांनी बाहेरील चारा खाण्यास सुरुवात केल्यानंतर त्या चाऱ्यांबरोबरच शेंगदाणा पेंड हे भर खाद्य द्यावे. जेणेकरून बोकड अधिक वजनदार होण्यास मदत होईल. आणि त्याच्यामध्ये चरबीचे प्रमाण देखील योग्य तयार होईल.

मित्रानो शेळीपालन या विषयावरील हा लेख आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहेच, तुम्हालाही शेळीपालनाविषयी अजून काही मुद्दे महिती असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या प्रियजनांना देखील नक्की शेअर करा.

धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button