नवीन पोस्ट्स

कुक्कुटपालन व्यवसाय: poultry farming business

नमस्कार मित्रांनो, आज-काल तरुणाईला सतत भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे रोजगार होय .सध्याची वास्तव परिस्थिती पाहता असे म्हटले जाते की स्वयंरोजगारापेक्षा इतरत्र कुठलीही चांगली नोकरी नाही. आज काल अनेक तरुण-तरुणी स्वयंरोजगाराच्या दिशेने वळताना दिसत आहेत. आजच्या लेखात आम्ही तु

च्यासाठी एक अशीच स्वयंरोजगाराची कल्पना घेऊन आलो आहोत जी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यास मदत करेल.

तर मित्रांनो आजच्या लेखात आपण कुक्कुटपालन या स्वयंरोजगारीत व्यवसायाबद्दल माहिती पाहूयात

अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती पहाण्यासाठी

येथे क्लिक करा

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती. Brief information about poultry farming

शेतकऱ्याचे घर म्हटले की पशु संगोपन हे आलेच. अगदी गाई, म्हशी ,बकरी ,शेळी, कोंबड्या इत्यादी. पशुपालनामध्ये सर्वात परवडणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन होय.
सध्याच्या सर्वेक्षणानुसार ब्रॉयलर कोंबडी पेक्षा गावरान कोंबडी पाळणे हा विषय पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवडीचा विषय ठरला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मागणीवरून आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

कुक्कुटपालनासाठी जागेची रचना Area requirement for poultry farming

तर मित्रांनो कुक्कुटपालन म्हणजे जमिनीवर कोंबड्यांचे पालन करणे. कोंबड्यांचे पालन हे मांसासाठी व अंड्यांसाठी मुख्य करून केले जाते .
मित्रांनो जमिनीची व्यवस्था ही शेतकऱ्याला किती कोंबड्या पाळायच्या आहेत यावर निर्भर असते. साधारणपणे एका कोंबडी साठी सुमारे 1 ते 2.5 चौरस फूट एवढी जागा आवश्यक असते. जर यापेक्षा कमी जागा तुम्ही वापरलीत तर कोंबड्यांना शारीरिक अडचणी येऊ शकतात. आता आपण 150 कोंबड्यांसाठीचा अंदाज पाहुयात. जर तुम्ही 150 कोंबडी पालनासाठी ठेवत असाल तर साधारणपणे तुम्हाला 150 ते 200 फूट एवढ्या जागेची आवश्यकता असेल.

एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी अशी की ज्या ठिकाणी तुम्ही कुकूटपालन करू इच्छिता ती जागा स्वच्छ ,मोकळी, व हवेशीर असावी व ती जंगली प्राण्यांपासून सुरक्षित असावी. त्या जागेमध्ये जास्त दमटपणा नसावा. जर जागेमध्ये दमटपणा जास्त असेल तर ते रोगराईसाठी आमंत्रण ठरेल.

कुक्कुटपालनासाठी योग्य कोंबड्यांच्या जाती Important breeds for poultry farming

मित्रांनो जर तुम्ही कुकूटपालन व्यवसाय करू इच्छिता तर तुम्ही कोणत्या उद्देशासाठी कुक्कुटपालन करत आहात हे आधी ठरवून घ्या. सर्वसाधारणपणे कोंबड्यांचे तीन प्रकार पाहावयास मिळतात .जर तुम्हाला अंड्यांसाठी कुक्कुटपालन करायचं असेल तर लेयर कोंबडीचा तुम्ही वापर करावा. या कोंबड्या वयाच्या 4 ते 5 महिन्यानंतर अंडी घालायला सुरुवात करतात व वयाच्या 1 वर्षापर्यंत या कोंबड्यांपासून तुम्हाला अंडी मिळतील .यानंतर जेव्हा या कोंबड्यांचे वय 16 महिने इतके होईल तेव्हा तुम्ही या कोंबड्यांची विक्री मांसासाठी करू शकता .

कुक्कुटपालनासाठी दुसरा प्रकार म्हणजे ब्रॉयलर चिकन होय. याचा सर्वसाधारणपणे उपयोग मांस म्हणून केला जातो. इतर कोंबड्यांच्या जातीच्या तुलनेत यांची मागणी ही सध्या जास्त आहे.

पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी येणारा खर्च Expenditure for raising poultry farm

जर तुम्हाला अगदी लहान प्रमाणात पोल्ट्री फार्म उभारायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो. सुरुवातीला लहान पातळीवर व्यवसाय सुरू करून त्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करू शकता. मध्यम स्वरूपाचे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी 1.5 ते 3 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. अनेक शासकीय योजना देखील उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी कर्ज व प्रशिक्षण उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर तुम्ही जिल्हा सरकारी बँकेकडून कर्ज उभारणी देखील करू शकता.

कुक्कुटपालनाचे फायदे Benefits of poultry farming

सर्वसाधारणपणे जर एखाद्या शेतकऱ्याने कुकूटपालन केले तर कोंबड्यांच्या खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था करावी लागत नाही .तुमच्या उत्पादित केलेल्या धान्यापैकी काही भाग तुम्ही कुक्कुटपालनासाठी राखून ठेवू शकता.सध्या मांसाहारी हॉटेल्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जेथे मोठ्या प्रमाणात मांसाची मागणी असते, जर तुम्ही धष्टपुष्ट व निरोगी कोंबड्या पाळल्या तर तुमच्या कोंबड्यांना नक्कीच बाजारात मागणी उपलब्ध होईल व उत्पन्न देखील वाढेल .

कुक्कुटपालनापासून उत्पन्न Income from poultry farming
सर्व शेतकरी बांधवांना कुक्कुटपालन सुरू करताना एक विनंती आहे की त्यांनी कुक्कुटपालन हे एका दिवसाच्या पिल्ला पासून सुरू करावे. जर एका दिवसाचे पिल्लू पाळण्यास तुम्ही सुरुवात केली तर ते पिल्लू अंड्यावर येईपर्यंत त्याला सुमारे 150 रुपये इतका खर्च येतो. जर तुमच्या 100 कोंबड्यांपैकी 60 ते 70 कोंबड्या या मादी असतील तर तुम्हाला रोज 40 ते 45 अंडे रोज मिळू शकतात .
सध्या बाजारात पहावयाचे झाल्यास एक अंडे हे 7 ते 8 रुपयाला मिळते त्यामुळे अंड्यांपासून रोज तुम्हाला 320 रुपये इतके उत्पन्न मिळू शकते. सर्वसाधारणपणे कुक्कुटपालन करताना 72 आठवड्यांपर्यंत कोंबडी पाळली जाते त्यानंतर तिचा उपयोग मांसासाठी केला जातो .

जर तुमच्या व्यवसायात तुम्ही काटेकोरपणे पिल्लांसाठी योग्य आहार ,स्वच्छ पाणी व त्यांच्या लसीकरणाची योग्य काळजी घेतली तर एक अत्यंत उत्तम कुक्कुटपालन व्यवसाय तुम्ही उभारू शकता

अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती पहाण्यासाठी

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button