डिजिटल मार्केटिंग व्यवसाय: digital marketing business
नमस्कार मित्रांनो, 2016 17 सालानंतर संपूर्ण भारतात जिओच्या नेटवर्कने आपले स्थान निर्माण केले, आणि भारतात इंटरनेट स्वस्त झाले. परिणामी प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन्स खेळू लागले. यातून ऑनलाईन व्यवसायांना देखील चालना मिळाली, आणि नवनवीन ऑनलाइन बिजनेस आकार घेऊ लागले. यातील एक महत्त्वपूर्ण बिजनेस म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग म्हणजे केवळ ऑनलाइन एखादी वस्तू विकणे नसून याचा आवाका प्रचंड विस्तीर्ण आहे. हल्ली दिवसभरातून एकदा तरी डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपल्या कानावर पडतोच
अगरबत्ती व्यवसाय बद्दल माहिती पहाण्यासाठी
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय What is digital marketing
जेव्हा कुठल्याही वस्तू किंवा सेवेची विक्री ऑनलाइन स्वरूपात जसे इंटरनेट वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया जसे की व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि ट्विटर इत्यादी माध्यमातून केली जाते त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणून संबोधले जाते.
डिजिटल मार्केटिंग हल्लीच्या युगातील अतिशय स्वस्त आणि परिणामकारक मार्केटिंग पद्धत असून, वस्तूच्या विक्री सोबतच व्यवसायाची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यात देखील डिजिटल मार्केटिंग चा मोठा सहभाग आहे.
पारंपरिक मार्केटिंग पद्धतीवर केलेला खर्च पुन्हा प्राप्त होण्यासाठी बराच कालावधी खर्चावा लागतो, मात्र डिजिटल मार्केटिंग अतिशय स्वस्त असून देखील अतिशय थोडक्या वेळात आपल्याला रिझल्ट देते. सोबतच मार्केटिंगचे काम अगदी आठवड्याचे सातही दिवस आणि 24 तास चालू ठेवता येते त्यामुळे मार्केटिंग अधिक परिणामकारक होते.
डिजिटल मार्केटिंग चे महत्व Importance of Digital Marketing
मित्रांनो आज काल सर्वांच्या हातात स्मार्टफोन आढळून येतात. स्वस्त इंटरनेटमुळे ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणे अतिशय सोपे झाले आहे. तसेच covid-19 परिस्थितीमध्ये जेव्हा घराबाहेर निघणे देखील मुश्किल झाले होते, अशा वेळात ऑनलाईन पद्धतीच्या सर्वच गोष्टींनी जीवन सुखकर केले होते. यामुळे आजकालच्या काळात डिजिटल मार्केटिंग फारच प्रभावी साधन बनले आहे.ऑनलाइन मार्केटिंग द्वारे ऑर्डर केलेल्या वस्तू अगदी घरपोच मिळत असल्याने नोकरदार वर्ग देखील ऑनलाइन मार्केटिंग कडे आकर्षित झालेला आहे. आणि हीच संधी समजून आपण डिजिटल मार्केटिंग द्वारे चांगला नफा मिळू शकतो.
डिजिटल मार्केटिंग मधील पंचसूत्री Five key plan of Digital Marketing
- ऑनलाइन उपस्थिती
मित्रांनो डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण ऑनलाइन कुठल्या पद्धतीने उपस्थित आहात यावर आपल्या डिजिटल मार्केटिंगचे यश अवलंबून असते. आपण वेबसाईट, ब्लॉग किंवा विविध सोशल मीडिया या मार्फत आपल्या व्यवसायाची उपस्थिती ऑनलाईन घेऊन जाऊ शकता. व्यवसाय ऑनलाईन घेऊन गेल्यामुळे अनेक ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जेणेकरून आपला ग्राहक वर्ग विस्तारतो.
- ट्रॅकिंग
मित्रांनो कुठलाही व्यवसाय करताना त्याचा फॉलोअप घेणे व्यवसायाच्या वृद्धीसाठी फायदेशीर असते. डिजिटल मार्केटिंग मुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नोंदी ठेवू शकता. तसेच व्यवसाय कुठपर्यंत वाढला आहे याचे योग्य विश्लेषणही करू शकता. ज्या आकडेवारीच्या माध्यमातून तुम्हाला नफा आणि तोटा सहजतेने काढता येतो.
- सर्वकाळ खुला
मित्रांनो असे म्हटले जाते की आपण झोपले, तरीही आपल्या व्यवसायाने आपल्याला पैसा मिळवून द्यायला हवा. आणि डिजिटल मार्केटिंग हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. परंपरागत पद्धतीने मार्केटिंग करताना तुम्ही आठवड्याचे विशिष्ट दिवस आणि काहीच तास व्यवसायासाठी देऊ शकता. मात्र डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही अगदी आठवड्याचे सातही दिवस आणि 24 तास म्हणजेच 24×7 आपला बिजनेस चालवू शकता. आणि तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या प्रचंड प्रमाणात तुम्हाला ग्राहक मिळू शकतात.
मत्स्य पालन व्यवसाय कसा करायचा
डिजिटल मार्केटिंग चे फायदे Pros of digital marketing
मित्रांनो डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या टारगेट ऑडियन्स पर्यंत पोहोचतो. जेणेकरून मार्केटिंग वर होणारा अनावश्यक खर्च टाळला जाऊ शकतो. गुगल ऍडस हे डिजिटल मार्केटिंग विश्वातील सर्वात विश्वसनीय आणि मोठे प्लॅटफॉर्म आहे. इथे ग्राहकांच्या वय, छंद, पत्ता या आणि इतरही विविध मुद्द्यांच्या आधारे योग्य ग्राहक वर्ग शोधून त्यांच्यापर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती पोहोचवली जाते. जेणेकरून आपल्या मार्केटिंग वर होणाऱ्या खर्चाचा योग्य मोबदला मिळतो.
डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग चा सर्वात स्वस्त आणि चांगला रिझल्ट देणारा प्रकार आहे. आपण स्वतःचे सोशल मीडिया हँडल्स वापरून अगदी मोफत देखील आपल्या उद्योग व्यवसायाचा प्रचार प्रसार करू शकता.
डिजिटल मार्केटिंग मुळे ग्राहकांच्या मनात वस्तू आणि सेवांची एक वेगळीच छाप उमटते. जेणेकरून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणि परिणामी ऑफलाइन बाजारपेठेतही आपल्या उत्पादनाच्या ब्रँड व्हॅल्यू निर्माण होण्यास मदत होते. तसेच आपण ग्राहकांसोबत अगदी जवळचे नाते निर्माण करू शकल्याने ग्राहकांना आपल्या उत्पादनाविषयी आत्मीयता निर्माण होते.