चार पैशासाठी जीवघेना प्रवास
वाहनचालकाचे जीवन –
- काही जण कामाच्या तूलनेनुसार एखाद्याची किंमत ठरवत असतात..
- म्हणजे आराम दायी ऑफीस मध्ये काम करणारा क्लर्क, मॅनेजर तसेच अजून दुसरे कर्मचारी म्हंटले की आपल्याला वाटते की हा हुशार आहे, हा बुध्दिमान आहे.
- त्याला तुलनेने चांगला मान सन्मान काही जण देतात..पण तूम्ही कधी विचार केला आहे का ?
- की आपल्या जीवाची बाजी लावून ६०० रूपयासाठी एखादा माणूस जीवघेना प्रवास दररोज करत असेल तर मला सांगा कोणाबद्दल तूमच्या मनात आदराची भावना निर्माण होयला पाहिजे..
- मान्य आहे यांनी जास्त शिक्षणाला महत्व दिलेले नसते पण त्यांच्या धाडसाचे कौतूक होयलाच पाहिजे..
- मी बोलत आहे अवजड वाहन चालवणाऱ्या वाहनचालकाबद्दल आणि त्यांच्या रहस्यमय जीवनाबदृल ..
- जेवणाची वेळ झाली म्हणून मी घरी येण्यासाठी निघालो ,वाटेत एक वाहनचालक ट्रक चा टायर बदलत होता..
- ती ट्रक गाडी कर्नाटक पासून पूढे औरंगाबादला जाणार होती.मी त्यांना विचारलं आपल्या या कामाबद्दल मला जाणून घेण्याची ईच्छा आहे.
तूम्ही तूमच्या कामाबद्दल कसा विचार करता, यातून किती उत्पन्न येते
आणि यामध्ये तूमचे घर चालते की, का अजून तूम्ही वेगवेगळे व्यवसाय करतात का, मुलांच्या शिक्षणांचा खर्च तूम्हाला परवडतो का, शेती आहे का, जेवण्याचं काय करता ?
अशे भरपूर प्रश्न मी त्यांना विचारले …तो सुरूवातीला सांगायला तयार नव्हता मी त्यांना सांगतिले की मला या कामाबद्दल लोकांना लेख लिहून माहिती द्यायची आहे..
मग हे एकून तो थोडा हसला आणि त्यांने त्यांच्याबद्दल सांगायला सुरुवात केली..
- ज्या कंपनी मध्ये आम्ही काम करतो त्या कंपनी मध्ये आम्हाला जेवढे काम तेवढी पगार या तत्वावर नौकरी मिळाली आहे..
- म्हणजे आज कर्नाटक या ठिकाणाहून जर छत्रपती संभाजीनगर ला जायचे असेल तर कंपनी आम्हाला ६०० रूपये दिवसाला देते.
- म्हणजे साधारण दररोज हाताला काम मिळाले तर १८००० रूपये मी कमावतो असे तो म्हणाला..
- मग मी दुसरा प्रश्न त्याला विचारला , की तुम्हाला दररोज काम मिळते का ?
- तर थोडासा उदास चेहरा करून तो म्हणाला ,नाही भेटत पण मला एक एकर शेती आहे..
- त्याचा आधार मला आहे.त्यातून काही उत्पन्न येते..मग मी तिसरा प्रश्न विचारला की मुल असतील तर शिक्षणांचा खर्च किती आहे.
- तर त्यांने डोक्याला हात लावला आणि मला म्हंटला , काय सांगू सर तुम्हाला ,दोन वर्ष माझा मुलगा इंग्लिश स्कूल मध्ये होता.
- एका वर्षाचे त्याला १२००० रूपये भरावे लागायचे ,आणि परत ट्विशन फी वेगळीच ५०० रूपये महिन्याला.
- मग दोन वर्षांनी माझ्या मुलाला शाळेत घेउन गेलो आणि त्यांना विचारल की याला जर ए ,बी , सी जर काढता आली तर मी तूमच्या शाळेतून मूलांना काढणार नाही..
- मुलाला ए, बी , सी , काढता आली नाही. मग मी त्याचा प्रवेश सरकारी शाळेत केला .
- आता पैसे पण वाचत आहे..आणि मुलाला समजा नाही आले काही तर पैसे गेल्याचे दु:ख राहणार नाही..
- हे एकून मी त्यांना विचारलं, की तूम्ही वाहन चालवतांना रस्त्यावर हात करून उभारलेल्या प्रवाशांना घेउन पैसे कमवतात का, तर त्याचे उत्तर आले ,नाही..
- एकदा मी अशाच एका प्रवाशाला गाडीमध्ये बसवले ..तर त्यांने मला चाकू दाखवला आणि माझा १२००० रूपयांचा मोबाईल घेउन तो पळून गेला..तेव्हापासून मी नाही घेउन जात..
- हे ऐकल्या नंतर मी अजून एक प्रश्न विचारला की , तूमच्या जेवणांचे काय करता..
- तर म्हणाला की आम्ही करूनच खातो,छोटासा गॅस आहे ..
- कारण बाहेरचे खाउन ,वेगवेगळया ठिकाणी खाउन माझी पचन संस्था आता नीट काम करत नाही.त्यामुळे आम्ही बनवूनच खातो..
अजून खूप विषयावर बोलणे झाले,थोडा शारीरीक गरजेच्या विषयावर पण बोलणे झाले..
सांगण्याचे तात्पर्य की आज एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी व्यापार चालत आहे तो अशाच लोकांच्या त्यागामुळे..
काही जणांना दोन ते तीन दिवस सतत प्रवास करावा लागतो..रात्रभर आपण झोपत असता तेव्हा हे त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात..
पण ६०० रूपये पगार आणि तो पण जर काम मिळाले तर हे जरा न पटणारे आहे..त्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचां विचार केला तर मनाला वेदना होतात.
एकीकडे भारत हा असा जगतोय आणि एकीकडे इंडिया मधील आपले लोक स्वप्न बघतात ,पूर्ण करतात आणि निवांत जीवन जगत आहेत..
काही चार पैशासाठी जीवाचे परवा न करता लोक काम करत आहेत,आणि एकीकडे निवांत ऑफीस मध्ये बसून ,चांगल्या पगारी उचलून आपले जीवन जगत आहेत..
एकीकडे चांगला पगार असणाऱ्या मुलांचा मुलगा त्याच्या करिअर साठी त्याचे आईवडील भरपूर पैसे खर्च करायला तयार आहेत..
आणि एकीकडे ईच्छा असताना सुध्दा पैशाची कमतरता असल्यामुळे शिक्षणांपासून वंचित राहत आहेत.
लेखक : राम ढेकणे