अंतराळात जाणार हे चौघे भारतीय
चार अंतराळवीर(अंतराळात जाणार हे चौघे भारतीय) म्हणजे चार प्रकारच्या शक्ती आहेत त्यांच्यामध्ये भारतातील 140 कोटी नागरिकांच्या आकांक्षा सामावलेल्या आहेत. गगन यान मोहिमेत रॉकेट काउंट डाऊन व अवकाश यान अंतराळवीर हे सर्व भारताचे असतील या मोहिमेसाठी वापरली जाणारी उपकरणे व अन्य घटकांपैकी बहुतांश गोष्टी या भारतात बनवलेल्या आलेले आहे.
महिलांचा सहभागही महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे चंद्रयान गगनयान या मोहिमा महिला संशोधकांच्या सहभाग व योगदान शिवाय(अंतराळात जाणार हे चौघे भारतीय) यशस्वी होऊ शकणार नाही. त्याचे प्रत्यंतर चंद्रयान निमित्ताने आले आहे.
शिव चालीसा – हर हर महादेव
अमृतकाळामध्ये चंद्रावर पाऊल
पंतप्रधान म्हणाले की अमृत काळामध्ये भारतीय अंतराळवीर(अंतराळात जाणार हे चौघे भारतीय) स्वतःच्या देशाच्या अंतराळ यानातून चंद्रावर दाखल होतील. भारताच्या युवा पिढीत विज्ञानाची आवड वाढीला लागणार आहे. त्याचबरोबर 21व्या शतकात भारत विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व करणार आहे.
अवकाश संशोधनात होणार प्रगत
मंगळापर्यंत पहिल्या प्रयत्नात पोहोचणाऱ्या देशात भारताचा समावेश आहे एकाच वेळी शंभरहून अधिक उपग्रहांचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान यशस्वीरित्या उतरवण्यात भारत यशस्वी झाला आहे आदित्य एल वन हा उपग्रह आता सूर्याचे निरीक्षण करत आहे.
गगन यान मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या हवाई दलाच्या चार वैमानिकांना 2000 ते 3000 तासांच्या उड्डाणाचा मोठा अनुभव आहे आणि त्यापैकी दोघांचा प्रतिष्ठित स्कॉर्ड ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे. गगन यान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांमध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर अंगद प्रताप अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे.
ताडपत्री अनुदान योजना २०२४ विषयी माहिती
ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायर
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर यांचा जन्म केरळ मधील तिरुपती येथे 26 ऑगस्ट 1976 रोजी झाला . पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना एअर फोर्स अकॅडमी त्यांना मानाची तलवार स्कोर ऑफ ओनर प्राप्त झाली होती ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत 19 डिसेंबर 1998 रोजी दाखल झाले ते अ श्रेणीचे विमान प्रशिक्षक व विमान चालक असून त्यांना आतापर्यंत 3000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे त्यांनी एस यु ३०, एम के आय, मिग -२१,मिग -२९, एन -३२ अशी विविध प्रकारची विमाने चालवलेली आहे. युनायटेड स्टेट्स स्टाफ कॉलेजचेही हे माजी विद्यार्थी असून त्यांनी प्रीमियर फाइटर एस यु ३० नेतृत्व केले आहे.
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
ग्रुप कॅप्टन अंगत प्रताप यांचा जन्म प्रयागराज येथे 1982 मध्ये झाला ते एनडीएचे माजी विद्यार्थी असून 2004 मध्ये ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत रुजू झाले. ते विमान प्रशिक्षक तसेच कुशल पायलट असून त्यांच्याकडे 2000 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे.
विंग कमांडर शुभांशू शुक्ला
विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे १० ऑक्टोबर 1985 रोजी झाला. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत 17 जून 2006 रोजी दाखल झाले. ते फायटर कॉम्बॅट लीडर व कुशल पायलट आहे. त्यांच्याकडे दोन हजार तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी आजवर एसयू -३०, एम के आय, मिग -२१, मिग -२९ आदी प्रकारची विमाने चालवली आहेत.
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णा यांचा जन्म तमिळनाडूतील चेन्नई येथे 1982 साली झाला .ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी एअर फोर्स अकॅडमी मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व मानाची तलवार हे सन्मान मिळाले होते. ते हवाई दलाच्या सेवेत 21 जून 2003 रोजी रुजू झाले. त्यांनी एस यु -३०, एम के आय, मिग -२१, मिग -२९ आधी विमाने चालवलेली आहेत.