खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ?
काही तासापूर्वी निवडणूक आयोगाचा तात्पूरता निर्णय आला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे.
म्हणजे आता शिवसेनेला उध्दवजी ठाकरेंना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही तसेच शिंदे गटालापण वापरता येणार नाही..
ज्याच्या वडीलांनी आपले पूर्ण आयुष्य ज्या पक्षाला अर्पण केले ,तो पक्ष मोठा केला.
त्याच्या मूलाना तो पक्ष माझाच आहे हे सिध्द करण्याची वेळ त्यावर येत असेल आणि असेही नाही की तो त्या पक्षाचा सदस्य वगैरे नाही.
जो माणूस आपल्या राज्याचा मूख्यमंत्री राहिला आहे, त्या पक्षाचा तो पक्षप्रमूख आहे आणि अशा व्यक्तीवर ही वेळ येणे खूप वेदनादायी आहे..
जरी पक्षप्रमूख असताना त्यांनी काही माणसांना आपल्या निर्णयात जागा दिली नसेल, काही जणांच्या मदतीने ते निर्णय घेत असतील.
आणि काही निर्णय चूकले असतील पण आपल्याचा बापाने उभा केलेला पक्ष दुसराच एखादा व्यक्ती आमचाच पक्ष आहे हे सांगणे त्याहून क्लेशदायक आहे..
शिवसेना १९ जून १९६६ रोजी जन्मलेली
- मराठी माणसांसाठी ,मराठी भाषेसाठी तसेच मूंबई मध्ये मराठी टक्का कसा कमी होत आहे.
- अशा अनेक सामाजिक मूद्दे घेवून तिने भरपूर चढउतार पाहिले.
- पण तिच्यावर ही वेळ येईल असे वाटलेच नव्हते..
- माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाला एका वेगळयाच उंचीवर आणून ठेवले होते आणि आज काही जणांच्या अंकांक्षा पोठी तिचे हाल असे होत आहे..
- एखादा पक्ष कोणाचा आहे ,अशा महत्वाच्या विषयावर् तात्काळ निर्णय घेणे गरजेचे असले तरीही आपले न्यायालय तसेच आपले निवडणूक आयोग निर्णय देतान दिसत नाहीत..
- लोकशाही ला घातक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे.
- तरीही आपण शांत आहोत, माननीय उध्दवजी यांचे खरेच आभार मानायला पाहिजे की एवढे होउन ही यांनी कोणताही आदेश दिलेला नाही की ज्या मूळे समाजामध्ये भांडण होतील..
- जरी त्यांनी अंतर्गत पक्षामध्ये काही जणांवर भेदभाव केला असेल पण आज तरी उध्दवजी लोकशाहीला धरून सर्व गोष्टी करताना दिसत आहेत..
बाळासाहेबांचे म्हणणे होते की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी पार्टी म्हणजे शिवसेना ..
- शिवसेनेच्याच काही जणांनी १०० टक्के राजकारण करून हा पक्षच संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे..
- जरी शिवसेने हिंदूत्व सौम्य केले असले तरीही हिंदूत्व या विषयावर भाष्य करणारे हेच होते याला बाजूला सारून नाही जमणार..
- आज शिवसेनेमूळे कितीतरी सामान्य माणसे मोठे झाले आहेत..
- शिवसेना असा पक्ष होता की तो तिकिट देताना सामान्य माणसांचा विचार करून तिकिट देणार पक्ष होता..
- कित्येक अशे व्यक्ती आहेत त्यांना पक्षाने तिकिट देउन आमदार खासदार बनवले आहे…
- आज खऱ्या शिवसेनेला आपल्या सारख्या सामान्य माणसांची गरज आहे.. येणाऱ्या निवडवणूक मध्ये एक उध्दवजींच्या खऱ्या पक्षाला जास्त मत देण्याची गरज आहे..
- कारण अशे केले नाही तर ज्याच्या कडे जास्त पैसा तो आपल्यावर राज्य करेल..काही जण पक्षाच्या बळावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत…
- आणि पैशाचा जास्त वापर जर होत राहिला हे देशाच्या राजकीय घडामोडी साठी चांगले नाही…
- आपली लोकशाही धोकयाच्या उंबरठयावर आहे असे आपल्याला मनावे लागेल..
- मग मला अशा सर्व गोष्टी बघितल्यावर असा प्रश्न पडतो की अशा महत्वाच्या विषयावर आपले न्यायालय वेळ का घेत आहे..
- अशा घटनेचा निर्णय काही काही दिवसामध्ये देउन ,न्यायालयाने लोकशाही जीवंत आहे हे दाखवून दयायला पाहिजे ..पण तसे होतान दिसत नाही..
- खरेच आपल्या न्यायालयाने डोळयांना पटटी बांधली आहे ..हे यातून दर्शविते..
ऑपरेशन लोटस नावाचा प्रकार मी ऐकलेला आहे..
- पक्षामध्ये फूट पाडायची आणि न्यायालयात धाव घ्यायची आणि न्यायालयात १ ते २ वर्ष केस चलणार तोपर्यंत सत्ता आपल्या हातात घ्यायची..
- अशा गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत..याच्या मध्ये जर सत्य असेल ..तर आपण आपले प्रादशिक पक्ष टिकवले पाहिजे..
- शिवसेना हा आपला प्रादेशिक पक्ष आहे आणि तो टिकवणे ही आपली जबाबदारी आहे..
- तो कसा टिकेल येणाऱ्या निवडणूकामध्ये उदध्वजी बाळासाहेब ठाकरे यांना मत देउन ..
लेखक : राम ढेकणे