नवीन पोस्ट्स

Jio Free Recharge Offer : वर्षभराचा रिचार्ज मोफत ! Jio नं आणली ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर, करा फक्त ‘हे’ काम ……….!

Jio Free Recharge Offer : कंपनी Jio AirFiber कनेक्शन सोबत 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन मोफत देत आहे. या प्रीपेड रिचार्जवर एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळत आहे. परंतु जिओ एअरफायबरच्या कनेक्‍शन घेतल्यावर रिचार्ज जिंकावा लागेल.

पशुसंवर्धनासाठी सरकार 5 लाख रुपयांचे

तात्काळ कर्ज देत आहे ……..!

काही दिवसांपूर्वी खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi नं आपले सर्व मोबाइल रिचार्ज प्लॅन्स महाग केले होते. त्यामुळे जिओचा एक वर्षाचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 3599 रुपयांचा झाला आहे. परंतु आता भाग्यवान विजेत्यांना हा रिचार्ज मोफत मिळवता येईल. एका रिपोर्टनुसार, कंपनी Jio AirFiber कनेक्शन सोबत 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन मोफत मध्ये देत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जिओण या ऑफरची माहिती शेअर केली नाही. फक्त हे सांगितलं आहे की 50 रुपयांचे पेमेंट करून नवीन एअरफायबर कनेक्शन बुक करणाऱ्या युजर्सना 3599 रुपयांचा वार्षिक प्लॅन जिंकण्याची संधी आहे. म्हणजे जिओ एअरफायबरचं कनेक्‍शन घेणाऱ्या प्रत्येक नवीन युजरला हा फ्री रिचार्ज मिळणार नाही तर काही भाग्यवान ग्राहकांना मोफत रिचार्ज मिळेल.

BSNL ने वारंवार रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर केले आहे,

या स्वस्त प्लानमध्ये सिम 395 दिवस ॲक्टिव्ह राहील.

वर्षभर चालणारा 3599 रुपयांच्या रिचार्ज

जिओच्या 3599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा वार्षिक प्लॅन आहे, त्यामुळे यात एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनसह युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100 एसएमएस मोफत मिळतात. परंतु सर्वात मोठा फायदा म्हणजे यात रोज 2.5 जीबी डेटा मिळतो. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्‍लाउडची सुविधा दिली जात आहे. युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळतो. थोडक्यात या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा वापरता येईल. तर जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमामुळे युजर्सना करमणुकीची कमतरता भासणार नाही.

जिओ एअरफायबर Jio Free Recharge Offer

जिओ एअरफायबर कंपनीची नवीन सर्व्हिस आहे ज्यात फिक्स्ड-वायरलेस अ‍ॅक्सेस 5जी सर्व्हिस पुरवली जाते. जिथे जिओ फायबर इंटरनेट पोहचत नाही तिथे ही सेवा दिली जाते. या सर्व्हिसच्या नवीन कनेक्‍शनच्या खरेदीवर कंपनी 3599 रुपयांचा रिचार्ज जिंकण्याची संधी देत आहे. रिपोर्टनुसार फक्त 50 रुपयांमध्ये जिओ एअरफायबर कनेक्‍शन बुक करता येतं. विशेष म्हणजे ही बुकिंग अमाऊंट रिफंडबेल आहे, बुकिंग नंतर कनेक्शन न घेतल्यास कंपनी पैसे परत देते. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनं ही नवीन ऑफर सादर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button