नवीन पोस्ट्ससामाजिक

तारूण्य, तंबाखू आणि अर्थव्यवस्था 

आयूष्यात काहीतरी करूण दाखवायच्या धडपडीला आणि त्या करण्याला जर काही अडचणी येत असतील तर तारूण्य, तंबाखू आणि अर्थव्यवस्था या गोष्टी येतात. आपण काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन नसल्यामुळे आपल्या भारतातील तरूण ताणयुक्त जीवन जगत आहेत. एखादे ध्येय ठरवले आणि ते जर प्राप्त होत नसेल दूसरा मार्ग जर सापडत नसेल .ते कार्य सोडून पण देता येत नसेल ,वय वाढत आहेत ,कर्तव्य् पार पडण्यात अपयश येत असेल ,स्वत:च्या गरजा भागवण्यात कमी पडत असतील ,आयुष्यात प्रगती होत नसेल तर सर्व बाजूने ताण असेल तर बहुतेक तरूण व्यसनी बनत आहेत.

E Rickshaw Subsidy 2024 : ई रिक्षावर 50,000 हजार रुपये सबसिडी मिळणार, येथे ऑनलाईन अर्ज करा !

तरूण व्यसनी बनत आहेत.

 1. हे माझ ठाम मत आहे. ताण आयुष्यात येत असेल तर त्याला दुसरे अनेक पर्याय आहेत.
 2. पण काय करणार आपला भारतीय तरूण अमली पदार्थ सेवन करण्यास प्राधान्य् देताना दिसत आहे.
 3. याला जबाबदार आहे आजूबाजूला चौका चौकात उपलब्ध्‍ असलेल्या टपरी आणि त्या मध्ये मिळत असलेले पदार्थ.
 4. थोडा आयुष्यात ताण आला की आजूबाजूला अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत की चांगल्या मार्गाने ताण कमी होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर या गोष्टी पटकन मिळतात.
 5. आणि त्या सेवन केल्यावर काही सेकंदासाठी व्यक्तीला ताणमुक्त्‍ वाटते पण हळू हळू याची सवय होउन जाते.
 6. आणि याची ही सवय त्याच्यासुध्दा हाताबाहेर जाते .आणि तो त्या गोष्टीचा गूलाम होतो.त्याच्या  शिवाय आता त्याला कशातच मन लागत नाही. 
 7. काही गोष्टी परकीयांनी आपल्यासाठी किंवा आपल्या देशातील पदार्थ, मसाले ,अन्य् वस्तू त्यांच्या देशात जास्त वेगाने निर्यात करण्यासाठी काही सुविधा केल्या.
 8. पण त्यांनी अशा काही वस्तू आपल्या देशात आणल्या त्यामधील काही पदार्थ म्हणजे तंबाखू ,बिअर ,अमली पदार्थ ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले.

महिलांना घरबसल्या करता येतील असे 12 व्यवसाय | Home Business Ideas for Women in Marathi

जबाबदार सरकार

 1. एका ठिकाणी अभ्यासिके मध्ये एक तरूण येत होता तो पहिल्यापासूनच तंबाखू ,मावाचे सेवन करायचा.
 2. एक दिवस त्याने म्हंटले की मला तंबाखू खाणे बंद करायची आहे हे ऐकून एका मित्राने ही जबाबदारी घेतली की मी व्यसनमुक्त तूला करतो.
 3. काही दिवसांनी बघतो तर काय ते दोघेही एका झाडाखाली बसून तंबाखूचे सेवन करत होते.
 4. कारण जबाबदारी घेणारा व्यक्तीच ताणतणावाचे जीवन जगत होता.
 5. त्याच्याच आयुष्यात खूप अडचणी असल्यामुळे तो पण तंबाखूचे सेवन करू लागला.
 6. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहेच पण तंबाखू सेवन करणे हे त्याच्यावर उपाय असू शकत नाही.
 7. यामध्ये मी जबाबदार धरेल आपल्या सरकारला. कारण सरकारला या पदार्थातील उत्पन्नातून मिळणारा कर खूपच जास्त् असल्यामूळे यांच्यावर कडक कारवाई सरकार करताना दिसत नाही. 

अर्थव्यवस्था 

 1. या गोष्टीचा अर्थव्यवस्थेला फायदा होतो म्हणून जर आपण याच्या वर कारवाई करत नसाल तर हे आपल्या तरूण पिढी साठी खूप घातक आहे.
 2. तंबाखू सेवन करणांऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस जर वाढत असेल तर याच्या वर लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे.
 3. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करणे गरजेचे आहे पण जर त्यांचे स्वप्न पूर्ण होत नसतील सरकार जागा काढत नसेल.
 4. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सरकार मुळे ताण निर्माण होत असेल,समाजातील काही व्यापाऱ्यांच्या फायदयासाठी.
 5. आणि अर्थव्यस्थेला फायदा होत असेल म्हणून जर सरकार योग्य पाउले उचलत नसतील.
 6. तर येणारी प्रत्येक पिढी व्यसनी होण्याच्या मार्गावर असेल. याला जबाबदार फक्त्‍ आणिफक्त सरकार असेल.
 7. जर खरच जर सरकारला काळजी असेल तर सरकारने तारूण्य  ,तंबाखू आणि अर्थव्यस्था या गोष्टी वर जर जास्त लक्ष दयावे.

लेखक : राम ढेकणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button