सामाजिकजागतिकमनोरंजन

The Bucket List

आजकाल विदेशी चित्रपट पाहण्याचा योग येतोय विशेष करून भरपूर प्रमाणात वेळ भेटत असल्यामुळं आणि सोबतच विविध पुस्तकांच वाचनसुध्दा. समजत नाही नेमकं विषयाला कसा हात घालू कारण विषय हा काही नव्याने उद्भवलेला नाही जसा आजकालची मीडिया वेगवेगळ्या प्रकरणांना वेगवेगळ्या अँगलने आपल्यासमोर पुढं करतात, माहीत नाही त्यांना कसा रिऍक्ट करावं? कारण त्यांना काय सांगायचं हेच मुळात समजत नाही ते फक्त प्रवाहसोबत वाहत जातात. वाहता वाहता कधी आपला रस्ता बदलतात तर कधी दुसऱ्या प्रवाहांना आपल्यात ओढतात तर कधी चक्क आपला प्रवाहच नाहीसा करून टाकतात. यात त्यांचं नुकसान बिलकुल होत नाही, नुकसान होत तर आपल्यासारख्या डोळे बंद करून प्रवाहात उतरणाऱ्यांचं.

एक्साम्पल्स भरपूर आहेत पण मी ते मुद्दाम मांडणार नाही कारण अगदी सोप्प आहे आपल्या सर्वांना कंक्लुजनपेक्षा स्टोरीच महत्वाची असते. तर विषय आहे भारताच्या प्रगत आणि मागासलेपणाविषयी. पूर्वीपासूनच भारत संपूर्ण जगात क्रीटीसायीज होत आलेला आहे मुख्यत्वे जातीय व्यवस्थेबद्दल आणि गरिबी बद्दल. सध्या या दोन विषयांनाच हात घालणार आहे. बाकीच्या(कला,शिक्षण,विज्ञान आणि तंत्रज्ञाना) विषयांबद्दल सविस्तरपणे वयक्तिक विचार मांडणार आहे.

परवाच “द बकेट लिस्ट” हा सिनेमा पाहण्यात आला. त्यात असा दाखवला आहे की कॅन्सर झालेले दोन व्यक्ती एकाच रूम मध्ये भरती झालेले आणि साहजिकच त्यांची एकमेकांशी ओळख होते. त्यातला एक गोरा, प्रचंड पैसा असणारा व्यक्ती आणि दुसरा कृष्णवर्णीय जो एज अ मेकॅनिक म्हणून काम करणारा, परिस्थितीने गरीब (इथं मला मुळातला भेदभाव दिसतो), ज्याची मोजकी अशी बकेट लिस्ट असते म्हणजे अशा गोष्टी ज्या आयुष्यात एकदा तरी पूर्ण करण्याचा तेही मरणाच्या आधी. आपल्यात प्रत्येकाच्या अशा गोष्टी असतात ज्या आयुष्यात एका वेळेसाठी का असेनात त्या करायच्या असतात. काहींना हिमालयात, काहींना समुद्रात, काहींना कुठल्या तरी धार्मिक स्थळांना भेट द्यायचा असतं,काहींना कुठल्या मोठ्या आदर्श व्यक्तीला भेटायचं असतं, काहींना स्काय डायव्हिंग, काहींना मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचं असतो, वगैरे वगैरे…. तर सिनेमामध्ये त्या गरीब व्यक्तीलासुद्धा चीनच्या भिंतीवर गाडी चालवायची असते, पिरॅमिड बघायचा असतो, एवरेस्ट बघायचा असतो, ताजमहाल बघायचा असतो, टांझानियामधल्या जंगलात सफारी करायची असते. पण अचानक कॅन्सर दिटेक्ट झाल्यामुळे त्याला ह्या गोष्टी करता येणार नव्हत्या. राहिलेल्या ह्या एका वर्षात आता काही होणार नसल्याने तो टिपून ठेवलेली बकेट लिस्ट फाडून टाकून कचराकुंडीत टाकून देतो. ओबवियस्ली हे सर्व बाजूला बसलेला होता माणूस बघतो आणि ती फाडलेली लिस्ट जुळवून त्याला सांगतो की आपण ह्या लिहलेल्या गोष्टी एका वर्षाच्या आत करायच्या.

त्यात त्या काळ्या सॉरी कृष्णवर्णीय माणसाला सांगतो की पैश्याची काळजी करू नकोस, माझ्याकडे रग्गड पैसा आहे. ठरल्याप्रमाणे ते निघतात, इजिप्त-नेपाळ करून ताजमहाल बघण्यासाठी भारतात येतात. आल्यास भारताबद्दल असा दाखवलं की मार्केटमध्ये हे सो कॉल्ड ही मोठी लोक (फॉरेनर) चालत आहेत आणि त्यांना बघून आपल्या भारतीय मुलांनी पैसे मागण्यासाठी त्यांच्या भोवती घोळका केला आहे, त्यांना भिक मागत आहेत हे बघून ही अमेरिकन ब्लॅक अँड व्हाईट लोकं चिल्लर नाणी त्या मुलांवर उधळतात. जसा मोठ्या मनाने डान्सबारमध्ये पांढऱ्या पैशांची लोकं नाचणाऱ्या मुलींवर फेकतात तसाच प्रकारे सिनेमात दाखवलं आहे. सहाजिकच एज या भारतीय म्हणून मला खूपच खराब वाटलं. मुद्दामहून आपल्या लोकांची अशी बाहेरील जगात बदनामी केली जाते. जी सो कॉल्ड प्रगत देश गरिबीवर बोलतात, काही बदलू पाहण्याचा विचार करतात, सो कॉल्ड पुरस्कार जाहीर करतात, सो कॉल्ड NGO काढतात, मोठमोठे डेज जाहीर करतात(हंग्री डे,फूड डे, एनवायरमेंट डे,हेल्थ रिलेटेड डेज ज्यात लोकांबद्दल त्यांच्याकडून सहानभूती, जगाबद्दल काळजी दाखवली जाते). खरतर मला हा सगळा भामटेपणा वाटतो कारण खरच जर त्यांना प्रदूषण, पृथ्वीबद्दल काळजी असती तर सगळ्यात जास्त एनर्जीचा(अबाउट40%), अन्नाचा, जंगलांचा वापर केलाच नसता.

ज्या देशात प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये, सिनेमामध्ये किमान एखादा तरी ब्लॅक माणूस असायलाच हवा असा कायदा आहे, अशा देशातली लोकं आपल्याच देशात येऊन भेदभावाबद्दल उपदेश करतात. मान्य आहे आपल्यात आधीपासनच लोकं दोन वेळेच्या जेवणाला वंचित आहेत, थोडीफार जातीय व्यवस्था होती आणि काही ठिकाणी आताही असेल पण ज्या देशाने शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मान्य करून, त्यांचे विचार रुजवून त्या प्रकारे कडक कायदे करून आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करून केवळ साठ सत्तर वर्षांत आमूलाग्र बदल घडवून घेतला आहे जी माझ्या मते मोठी क्रांती आहे. सोबतच ह्या अमेरिकेचाअसलेला 150 वर्षांचा लहानपणी वाचलेला इतिहास आठवून गेला. 1870 च्या सिविल क्रांतीनंतर लोकशाही स्विकारलेल्या (अब्राहम लिंकन यांना आजही इतकं महत्व देऊनही) देशाची मागच्या 150 वर्षांत केलेली प्रगती शून्यताच मोजावी लागेल, कारण आजही त्यांना काळ्या सॉरी कृष्णवर्णीय लोकांविषयी समानतेसाठी, एम्पल्यामेंटसाठी, सामाजिक व्यवस्थेत त्यांना स्थान देण्यासाठी कायदे करायची गरज भासते आहे. तुम्ही म्हणाल भारतात पण आजही भेदभाव, जाती व्यवस्था आहे तर शेवटी एकच सांगतो माझ्या आजोबांच्या शेतात ज्या माणसाने आयुष्यभर काम केले एज अ सालगडी म्हणून त्याच माणसाच्या मुलाने आमच्या आजोबांचं शेत विकत घेतला तोही विधानसभेचा आमदार होउन.

धन्यवाद

लेखक : गौरवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button