आमच्या बरोबर चेंगट आणि प्रियसी वर हजारो रूपये खर्च करणारे मित्र

प्रत्येकाच्या आयुष्यात अशे काही मित्र असतात की त्यांना कधी पण विचारल की चल चहा प्यायला,आज तू दे पैसे .त्याचे एकच उत्तर असते ,अरे नाहीत की माझ्या कडे पैसे ..बघ माझा बॅलन्स ,काहीच नाहीत खात्यावर पैसे..पण अशे पण काय मित्र असतात की ते स्वत:हून म्हणतात चला आज मी चहा पाजतो तूम्हाला..
आणि अशे पण काही मित्र असतात ते न कळत आपल्याला चहा तसेच खाउ घालत असतात..
आज आपल्याला अशा मित्राबरोबर बोलायचे आहे की ते फक्त आव आणतात की माझ्याकडे पैसे नाहीत..पण त्यांच्या कडे पैसे असतात .फक्त त्यांची ईच्छा नसते चहा पाजण्याची .
मग माझ्या आवती भोवती पण अशेच मित्र आहेत की ते नेहमी म्हणतात की अरे माझ्याकडे खरेच पैसे नाहीत..पण ही त्यांची सत्यता नाही..ते सर्रास खोटे बोलत असतात..त्यांची फक्त इच्छा नसते चहा पाजण्याची ..बर आज माझ्या कडे पैसे नाहीत म्हणतात आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या पूढच्या दिवशी ऑनलाईन खरेदी करतात आणि स्वत:वर खर्च करतात..एक वेळेस हे पण ठिक आहे की ते स्वत:वर खर्च करतात..पण ते आम्हाला चहा प्यायला पैसे नाही म्हणतात आणि त्याच दिवशी त्याच्या प्रियसीने भेटायला बोलावले की काय चमत्कार होतो ते माहीत नाही पण लगेच त्या प्रियसीला हो म्हणतात आणि मग तिला जेवायला घेउन जाणे,तिला कॅफे वर घेउन जाणे ,तिला भेटवस्तू देणे,तिचा रिचार्ज करणे ..याच्यासाठी त्याच्या खात्यावर लगेच पैसे येतात..हा चमत्कार कसा होतो ..हे त्यांनाच माहीत..पण आम्ही त्याच मित्राला त्या दिवशी चहा पाज म्हंटले तर माझ्याकडे पैसे नाहीत..हे उत्तर ऐकून आम्हाल रडावे का हसावे ते कळत नाही.
अशा मित्राला काय म्हणावे आम्हाला कळत नाही..उलटे अशा मित्राच म्हणणं असत की माझा आता खूप खर्च झाला आहे आता तूम्ही मला चहा पाजा..
म्हणजे हा कमीत कमीत एका भेटी मध्ये ५०० रूपये खर्च करून येणार..कधी कधी त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करून येणार आणि हे साध आम्हाला चहा पाजाला कुर कूर करतात..काय बोलावे अशा मित्राला..
म्हणजे इतके दिवस आमच्या बरोबर राहणारे अचानक प्रियसी भेटली की आम्हाल साध चहा पाजत नाहीत आणि तिच्यावर पैशाचा वर्षाव करतात..हे सहन होणारे नाही.
आयुष्यात काय अडचण आली तर आम्ही यांच्यासाठी एका पायावर तयार रहायचे आणि हे एका मूलीसाठी असा आमच्यावर भेदभाव करतात हे जरा न पटणारे आहे…
आयुष्यात आसपासच्या व्यक्ती पैकी एकाच व्यकतीला महत्व देणे बाकी व्यक्ती कडे दुर्लक्ष करणे हे न पटणारे आहे..
जरी ती प्रियसी असली तरीही आमची आणि तिची तूलना केली तर आम्ही तिच्या वरचड कामाला येतो..ठिक आहे आम्ही तिच्यासारखे गुळु गुळु बोलू शकत नाही.पण आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आम्हीच त्या मित्राल साथ देणार आहोत..जरी ते त्या व्यक्ती चे प्रेम असले तरी त्या मित्राने आमच्या सारख्यावर अन्याय करणे योग्य नाही..
अशा मित्रामुळे मनाला त्रास होतो..आम्ही एका पायावर कधी पण कुठे पण यायला याच्यासाठी तयार असतो आणि हा मात्र आमच्या कडे दुर्लक्ष करतो ..
तूम्हीच सांगा अशा मित्रांना काय शिक्षा दयायची …अशा मित्राला कशा प्रकारे वागवायचे..असा भेदभाव तूम्हाला पटतो का, काय करावे अशा मित्राबरोबर..
आम्हाला वाईट वाटते की एका प्रियसी साठी हा आमच्या बरोबर असा वागतो.
प्रेमात पडले की आधीच्या माणसांना अशी वागणूक देणे योग्य आहे का..
लेखक : राम ढेकणे