सुई ते मोटरसायकल – बुलेटची कथा
भारतात बुलेट ट्रेन आता सुरु होणार ,यात वादच नाही.
बुलेट ट्रेन सुरु होई पर्यंत आपण बुलेट मोटारसायकलची कथा पाहुयात.
१८५१ साली इंग्लंडमधे जाँर्ज टाऊनसेंड नामक ईसमाने सुई बनवण्याचा कारखाना सुरु केला. पुढे १८८२ साली त्याने सायकलचे स्पेयरपार्ट्स बनवायला सुरुवात करुन १८८६ साली संपुर्ण सायकल बनवायला सुरुवात केली.
त्या वेळी कंपनीचे नाव होते ‘दि एनफिल्ड सायकल कंपनी’ .
१९०१ साली कंपनीचे नाव बदलुन ‘राँयल एनफिल्ड ‘ केले व मोटारसायकलचे ऊत्पादन सुरु केले. १९०२ साली कार ऊत्पादनही सुरु केले ,पण प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने १९०६ साली कार ऊत्पादन थांबवण्यात आले.
मोटारसायकल ची मजबुत बांधणी असल्याने अल्पावधीत लोकप्रिय झाली.
प्रथम व द्वितीय विश्वयुद्धात सैन्यात याचा भरपुर वापर झाला. कच्चे रस्ते ,खाचखळगे यातुन ती व्यवस्थित जात होती. सामान, ओझे वाहणे , हत्यारे न्यायला चांगली गाडी होती. कंपनी विवीध माँडेल बनवत होती. काही सैन्या साठी तर काही सामान्य नागरिकांसाठी होत्या.
ब्रिटीश कालीन भारतात ब्रिटीश अधिकारी राँयल एनफिल्डलाच प्राधान्य द्यायचे. १९३१ साली कंपनीने ‘बुलेट’ हे माँडेल बाजारात आणले. हे ३५० सी सी होते व विश्वप्रसिद्ध झाले. आज पर्यंत दिर्घकाळ चालणारे हे एकमेव माँडेल आहे. ब्रिटीश सरकारने बुलेट आपले सैन्य व पोलिसांसाठी विकत घ्यायला सुरुवात केली.
नुसत्या राँयल एयरफोर्सच्या सैनिकांना ३००० मोटारसायकल दिल्या. यावरुनच या वाहनाची ऊपयुक्ता लक्षात येते.
देश स्वतंत्र झाल्यावर भारतातील सर्वसामान्यांना बुलेट विकायला सुरुवात केली.
हळुहळू विक्री वाढत गेली. पण या गाड्या ईतर कंपन्यांच्या मानाने महाग होत्या. मग राँयल एनफिल्डने ‘मद्रास मोटर्स ‘ या कंपनी सोबत करार केला , व बुलेट भारतात तयार व्हाय लागली. तेव्हा बरेचसे स्पेयरपार्ट्स इंग्लंडहुनच येत होते. १९६० पर्यंत १००% बुलेट भारतात तयार व्हाय लागली. १९६० साली ३५० सी सी सोबतच ५०० सी सी माँडेल रस्त्यावर आणले.
या ही वेळेस भारत सरकारच बुलेटचा सर्वांत मोठा ग्राहक होता. भारतीय सैन्याला ते द्यायचे.
१९९० नंतर मात्र विक्री कमी होत गेली. भारतातील बरेचसे प्लांट बंद करावे लागले. फक्त मद्रास (चेन्नैई ) ईथलाच प्लांट सुरु होता.
२०१३ साली कंपनीच्या R & D ने युवकांना डोळ्या समोर ठेऊन आवश्यक ते फेरबदल केले व काही नवीन माँडेलसह कंपनी नव्या जोमाने मार्केट मधे ऊतरली.
पुन्हा बुलेटची क्रेझ वाढायला लागली .
बुलेट क्लासीक , थंडरबर्ड , हिमालयन, डेजर्टस्ट्रोम अशी काही माँडेल्स तरुणांना भुरळ घालत आहे .
बाँलीवुडनेही बुलेटला चांगलच ऊचलुन धरलय.
२६ जानेवारी २०१५ च्या राजपथावरील संचालनाचे प्रमुख अतिथी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सैन्यदलाचे बुलेट वरील कसरती पाहुन सैनिकांचे कौतुक केलेच , त्याच बरोबर वापरल्या गेलेल्या मोटारसायकलीचेही कौतुक करुन माहिती घेतली.
लवकरच कंपनी ७५० सी सी मोटारसायकल बाजारात आणत आहे.