Who runs India and what is it based on: भारत कोण चालवते आणि त्याला आधार कशाचा आहे
ज्यांना भारताबदद्ल काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा लेख आहे.आपला भारत कोण चालवतो आणि एका व्यक्ती च्या मनानुसार देश चालतो का ,आपल्या भारतात जे निर्णय घेतले जातात ते कशाच्या आधारावर घेतले जातात.अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत.
भारताला स्वातंत्र्य मिळाले १९४७ ला आणि भारत सार्वभौम देश बनला..सार्वभौम म्हणजे आपले निर्णय आपण घ्येण्याचा आधिकार तसेच आपल्यावर कोणत्याही देशाचा प्रभाव नसणे.आपल्या लोकांसाठी आपण स्वत: आपण कायदे बनवणे ,वेगवेगळे निर्णय घेणे,पूर्णपणे स्वातंत्र्य असणे म्हणजे सार्वभौम.मग जेव्हा आपल्याला हा अधिकार भेटला तेव्हा आपल्या माणसांनी एकत्र बसून ,एकत्र विचार करून ,सर्व देशांच्या कायद्याचा अभ्यास करून,जे जे चांगल्या गोष्टी दुसऱ्या देशात आहेत त्या गोष्टीचा विचार करून,सर्व समाजाचा विचार करून,वंचितांचा विचार करून,गोर -गरीबांचा विचार करून ,राज्य कारभार चालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा विचार करून,आपला भारत अखंड कसा राहील ,सर्वांना समान न्याय कसा भेटेल याचा विचार करून काही नियम तसेच काही अनूसूचीचा समावेश असणारे पूस्तक तयार केले .त्या नुसार आपण आपला भारत चालावायचा हे ठरवले गेले.आणि त्या पुस्तकालाच आपण म्हणतो भारतीय संविधान / भारतीय राज्यघटना.
भारतीय राज्यघटनेनुसार भारताचा कारभार चालवला जातो तीन मुख्य घटकांच्या मदतीने भारतीय कायदे मंडळ भारतीय कायदेमंडळाचा जर विचार केला तर केंद्र स्तरावर राष्ट्रपती आणि संसद यांचा समावेश असतो.संसदेचे मुख्य घटक दोन आहेत.एक राज्यसभा आणि दुसरी लोकसभा. भारतामध्ये जर एखादा जर कायदा करायचा असेल ,जुन्या कायदयामध्ये बदल करायचा असेल तर संसदेचा वापर करून आपण बदल करू शकतो.संसदे मध्ये जे सदस्य असतात त्यांना आपण खासदार म्हणतो.खासदार आणि राष्ट्रपती कायदे बनवण्याचे काम करत असतातभारतीय कार्यकारी मंडळ
भारतीय न्यायमंडळ