महाराष्ट्राच्या आशीर्वादाने अब की बार चार सो पार

यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मी यवतमाळ मध्ये आलो होतो आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा यवतमाळकरांच्या भेटीला आलो आहे. मागील दहा वर्षात देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी झालं त्याच पुण्याईच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला तुम्ही 400 पेक्षा अधिक जागा द्याल(महाराष्ट्राच्या आशीर्वादाने अब की बार चार सो पार). अबकी बार चारसो पार अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यावधींच्या विकासाचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरणही पार पडले.
यवतमाळ मधील नागपूर रोडवरील डोरली येथे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वे सह इतर विविध योजनांचा श्री गणेशा करण्यात आला तसेच नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आला. शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाली आहेत. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज स्वस्त बसले नाहीत त्यांनी स्वराज्याला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न केले. आम्हीही शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.
PM Shrestha : पीएम श्रेष्ठ योजनेविषयी माहीती
23 मिनिटे 54 सेकंदांच्या भाषणाने जिंकली सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर सहा वाजून दोन वाजता आगमन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयं सहायता गटाने बनवलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर विकासाच्या कामांचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली 23 मिनिटे 54 सेकंदाच्या भाषणात विकासाच्या उत्सवांमध्ये सामील होण्यासाठी आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सभा(महाराष्ट्राच्या आशीर्वादाने अब की बार चार सो पार) जिंकली.
राज्यात सर्वाधिक योजना पूर्ण
पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या शंभर सिंचन योजना बासनात गुंडाळल्या होत्या त्यातील साठ योजना आम्ही पूर्ण केल्या त्यातही महाराष्ट्रातील योजना सर्वाधिक आहेत.
या योजना रखडल्याने विद्यार्थी विकासापासून वंचित राहिले त्यांच्या पापाची शिक्षा या पिढीला भोगावे लागली.
आता मात्र असे होणार नाही गेल्या दहा वर्षांपासून भाजप सरकारने गोरगरीब शेतकरी तरुण आणि महिला या घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी दिशा दाखवली असल्याचे मोदी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय मुंडे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर खासदार भावना गवळी खासदार हेमंत पाटील आमदार मदन येरावार आमदार अशोक उईके आमदार संजीवरेड्डी बोटकुरवार आमदार संदीप धुर्वे आमदार इंद्रनील नाईक आमदार आदींची उपस्थिती होती.
अंतराळात जाणार हे चौघे भारतीय
एक रुपया पैकी 15 पैसेच पोहोचत
मोदी म्हणाले पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते विशेष म्हणजे कृषिमंत्री महाराष्ट्र असूनही केंद्रातून मंजूर एक रुपयांपैकी केवळ पंधरा पैसे लाभार्थ्यांना पोहोचत असे म्हणजे मी 21000 करोड रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात टाकले आहेत.
पूर्वीचे सरकार असते तर यातील अठरा हजार कोटी रुपयांची मध्येच लूट झाली असती अशी घनाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली.
विद्यमान सरकार लाभार्थ्यांना पूर्ण हक्क देणारे असून हीच मोदींची गॅरंटी आहे अशी पुष्टी त्यांनी जोडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत खास शैलीत करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना बंजारा समाजाचे मानाचे स्थान असलेला फेटा घालण्यात आला त्यानंतर खास कशिदा असलेल्या बंजारा समाज संस्कृतीतील शेला मोदींच्या गळ्यात टाकला.
नारीशक्तीच्या मदतीने राज्याचा विकास: देवेंद्र फडणवीस
माता सीतेचे देशातील एकमेव मंदिर यवतमाळ जिल्ह्यात आहे याच ठिकाणाहून पंतप्रधानांनी नारी शक्ती वंदन कार्यक्रमाची घोषणा केली आहे आज चतुर्थीचा दिवस असून वर्धाहून कळमच्या चिंतामणी मंदिरापर्यंत धावणाऱ्या रेल्वेचे लोक कार्बन केले आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा रथ वेगाने धावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून लेक लाडकी योजनेसह परिवहन मंडळाच्या गाड्यांमध्ये महिलांना सवलत दिली आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी समूहातील 10 लाख कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा निर्धार असून या घरावर पुरुषासोबत महिलेचे नाव राहील असे ते म्हणाले.