पैसा
पैसा हा असा शस्त्र आहे की त्याच्या कमी जास्त असल्याने मानवात भेद निर्माण झाले आहेत..आणि हे भेद किंवा ही दरी न कळत पडलेली आहे .आणि या पैशाच्या जोरावर मानवाची किंमत आज ठरवली जात आहे..असा एक काळ होउन गेला की कितीही मोठया पदावर माणूस असला तरी तो साधी राहणी सोडत नसे..किती ही पैसा आला तरीही तो विचारांने चलत असे.पण आज थोडा पैसा माणसांकडे आला तर माणूस आपल्या तत्वांना विसरून आपल्या मर्जीप्रमाणे जगत आहे..तत्वामध्ये बदल करून माणूस जगताना मी पाहिला आहे..
ज्याच्याकडे पैसा म्हणजे ज्याच्या कडे भांडवल जास्त तो आज आपल्या मनावर ,आपल्या विचारावर आपल्या जीवनावर परिणाम करत आहे..
पहिले कसे मिळून मिसळून सगळेजण राहत असे..पण आज पैशामुळे राहिणामान सर्वांचे बदलत चाललेले आहे..
पहिले फक्त पैसा हे देवाण घेवाण करण्याचे एक माध्यम होते..आज पैशाकडे बघून माणसांची किंमत ठरत आहे..त्याने आता पर्यंत किती कमवले आणि तो कसा जगत आहे याच्या वरून आज समाजातील मान ठरत आहे..
त्या व्यक्ती कडे समजा नसतील विचार चांगले,पण तो पैशाने ताकतवान असेल तर आजच्या जगा मध्ये बाकीच्या गोष्टी नगण्य समजून त्याला मान सन्मान मिळत आहे..
पैसा आला की माणूस आज प्रतिष्ठित जीवन जगताना दिसत आहे..
तूमच्या विचाराला तेव्हाच महत्व प्राप्त होईल जेव्हा तूम्ही पैसे जास्त प्रमाणात कमवणार..
तूम्हाला किती ज्ञान आहे ,तूम्ही किती चांगले आहे हे कोणाही पाहणार नाही..तूम्ही कशाप्रकारे पैसा कमवू शकतात त्याच्यावर तूमची किंमत आजच्या युगात ठरणार आहे..
पैशाने सर्व काही मान सन्मान भेटेल ,पण एक दिवस पैसा गेला की तूमचा मान सन्मान पण संपून जाणार .कारण तो मान सन्मान तूम्हाला नव्हताच तूमच्या कडे असलेल्या पैशाला होता..एक दिवस परत तूमच्या कडे पैसा आला तर परत हा मान सन्मान तूम्हाल मिळेल.
पैसा नसेल तरीही लोकांनी तूम्हाला चार शब्द तूमच्या कडे येवून बोलावे ,चार शब्द त्याच्या मनातील तूम्हाला सांगावे वाटत असेल तर एकमेव मार्ग म्हणजे आपला स्वभावात बदल करून आपण या गोष्टी मिळवू शकतो..
आपण या जीवनात पैसा कमवताना आपला स्वभाव खूप परिणाम करून जातो.
आपल्या जीवाभावाची माणसं जोडायची असतील तर एकमेव मार्ग म्हणजे आपण दुसऱ्याचा आदर करणे खूप महत्वाचे आहे,दुसऱ्याशी प्रेमाणे वागणे खूप महत्वाचे आहे,आपण लोकांना वेळ देणे महत्वाचे आहे,आपण लोकांशी हसत खेळत राहणे महत्वाचे आहे,आपण लोकांच्या मदतीला येणे खूप महत्वाचे आहे ,आपण एकमेकांची काळजी घेणे खूप महत्चाचे आहे.आपण आपला अहंकार बाजूला ठेवणे खूप महत्वाचे आहे..आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे..
आपण कोणाचा द्वेष न करणे गरजेचे आहे,आपण आपल्या माणसांचे पाय खेचणे बंद करून त्याला कशी मदत करता येईल ते पाहणे गरजेचे आहे.
अशा अनेक गोष्टी जर तूम्ही आयुष्यभर केल्या तरच तूम्हाला पैसा नसेल असेल कधी एकटे पण वगैरे वाटणार नाही..सतत तूमचे काळजी घेणारी माणसे तूमच्या आसपास असतील.
Also Read : ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या
आजूबाजूची माणसे पण पैशाच्या मागे धावणारी असतील आणि त्यांना अशा तत्वाचे काहीही घेणेदेणे नसेल तर मग तूम्हाला अशा माणसांची साथ सोडावी लागेल नाहीतर ते पण तूम्हाला एक दिवस त्यांच्या सारखे बनवतील..
पैसा नसताना ही ज्याच्या आवती भोवती चार माणसे फिरत असतात तो खरा जीवन जगत आहे असे आपण म्हणू शकतो..
पैसा तर सर्वजण कमवतात पण लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे सोपे नाही आणि ते जर आपण केले तर आपल्या जीवनात सु:ख दु:ख वाटून घेणारे तयार होतील.
पैशाकडे बघून ,तूमच्या राहणीमानाकडे बघून जर काही जण तार्त्पूत्या काळातच सोबत राहतात..पण जे तूमच्या विचाराशी एक होउन तूमच्या कडे आले असतील ते सतत तूमच्या बरोबर असतील.. हे माझे मत आहे याच्याशी कोणी सहमत असावे असे नाही..हे सर्वांनाच लागू होईल असे पण नाही..