नवीन पोस्ट्स

कल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत

कल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत अर्थात असे कि मी माझ्या मित्रपरिवारबरोबर चर्चा करत होतो की, अरे सरकारने अशी काय योजना आणली पाहिजे की पूर्ण देशाचे दर्शन घडवून आणणे आणि ते पण मोफत. भारतामध्ये ज्यांने आपले पूर्ण आयुष्य घालवले, पूर्ण जीवन देशाची अप्रत्यक्षपणे सेवा केली, खूप कष्ट केले.

पण या महागाईच्या दुनियेमध्ये तो काही रक्कम बाजूला काढून ठेवू शकला नाही..किंवा आपल्या परिवाराची काळजी घेत त्याला हे जमले नाही.

शेवटी आयुष्य संपण्याच्या वाटेवर येउन पोहचते आणि आता कुठे स्वत: साठी वेळ मिळतो. पण खिशात पैशे नसल्यामुळे तो काय घराच्या बाहेर पडत नाही. कारण एकीकडे औषधांचा खर्च वाढलेला असतो आणि त्यात फिरायला जाणे, पर्यटन स्थळांना भेटी देणे, देव-देव करायला निघणे शक्यतो सामान्य माणूस टाळतो आणि आपल्या राहत्या घरीच आयुष्याचा शेवटचा श्वास घेतो..

काळचा आपल्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मनापासून आवडला आहे..त्यासाठी त्यांचे खूप मनापासून आभार.

ज्यांचे वय ७५ वर्ष पूर्ण झाले आहे अशा लोकांसाठी आता बिनामूल्य आपल्या राज्यात फिरता येणार.मोफत प्रवासाची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली..

या निर्णयांचा खेडयातील, शहरातील, किंवा मेट्रो शहरातील सामान्य परिवारमधील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.

काही व्यक्तींच्या मुलींचे घर त्या व्यक्तींच्या घरापासून दूरच्या अंतरावर असते..

  • पैशामुळे तो मुलींना भेटायला कधी तर जात असतात, पण आता प्रवास मोफत असल्यामुळे आता मुलीकडे जाउन चार गोष्टी बोलायला मिळणार,
  • मुलीकडे राहता येणार, किंवा काही जणांचे मुले नौकरी निमित्त आपल्या आई-वडीलांपासून लांब राहत असतात.अशा मुलांचे आई-वडील आता या निर्णयांमुळे ते मूलाकडे पहिल्यापेक्षा आता काही दिवसाआड जाउ शकतात.
  • तिथे काही दिवस राहून परत आपल्या गावी येउ शकतात..आणि आपल्या नातवांचा तसेच आपल्या परिवारांबरोबर अजून काही क्षण आनंदाने घालवू शकतील.
  • अशे पण काही व्यक्ती आपल्या बाजूला असतात जे मजूरी करून जगत असतात..
  • आलेला पैसा ते तिन वेळेच्या जेवणासाठी आणि बाकीच्या मूलभूत गोष्टीसाठी खर्च करत असतात..
  • अशा लोकांसाठी राहून गेलेला आपल्या आयुष्यातील प्रवास या योजनेमुळे ते परत आयुष्यातील प्रवासाचा आनंद घेउ शकतात आणि वेगवेगळया पर्यटन स्थळांना भेट देउ शकतात..
  • संसार करत असताना काही नवरा बायको क्वचितच कुठे तर फिरायला गेलेले असतात..
  • मग अशा नवरा बायकोंसाठी ज्यांचे वय ७५ वर्ष झाले आहे त्यांच्यासाठी खूप फायदा होणार आहे या योजनेचा.
  • किराणा, मुल,वीज, घरपट्टी, शिक्षण, दवाखाना या गोष्टीला थोडेसे बाजूला सारून मोकळा श्वास घ्यायला नक्कीच काही जणांना मिळणार आहे..
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा जो निर्णय घेतला आहे की ज्यांचे वय ७५ वर्षाहून अधिक असलेल्या व्यक्तींना एसटी प्रवास मोफत होणार आहे हा खरच अभूतपूर्व असा निर्णय आहे..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button