नवीन पोस्ट्सखेळ

IPL will be played in India | आयपीएल भारतामध्येच रंगणार

यंदा देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे मात्र तरी यंदाची आयपीएल भारताचा रंगणार(IPL will be played in India) असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या सत्राला सुरुवात करण्याची योजना आहे असे धुमल यांनी सांगितले लोकसभा निवडणुका एप्रिल मे महिन्यात होण्याची शक्यता आहे यामुळेच अद्याप आगामी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

धुमाल यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की सुरुवातीला आयपीएलच्या (IPL will be played in India)यंदाच्या सत्रातील पहिल्या पंधरा दिवसांचे वेळापत्रक जाहीर होईल उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांच्या तारखा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Maratha community got reservation । मराठा समाजाला मिळालं आरक्षण

धुमाल यांनी माहिती दिली की आम्ही यंदाच्या आयपीएल सतराचे आयोजन बावीस मार्चपासून करण्याची योजना आखत आहोत यासाठी आम्ही सरकारी संस्थानसोबत काम करत असून आधी आयपीएलच्या सुरुवातीच्या वेळापत्रक जाहीर करू संपूर्ण स्पर्धा भारतातच रंगेल. यादी 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल चे पूर्ण सत्र दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात आले होते तसेच 2014 च्या निवडणुका दरम्यान आयपीएलचे सुरुवातीचे अर्धे सत्र मध्ये रंगले होते 2019 सालच्या निवडणुका दरम्यान मात्र आयपीएलचे पूर्ण सत्र भारतातच रंगले होते.

जून मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी होऊ शकतो भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाच जूनला आपला सलामीचा सामना न्यूयॉर्क येथे आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे एक जून पासून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला अमेरिका कॅनडा लढती सुरू होणार आहे साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना गत विजेता आणि गत उपविजेता संघांमध्ये खेळविला जातो यानुसार सलामी लढत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात आयटम्स यांच्यामध्ये रंगण्याची शक्यता आहे.

IPL 2024 Auction

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राला 23 फेब्रुवारी पासून बंगळुरू येथून सुरुवात होईल पाच संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एकूण 22 सामने रंगतील गेल्या वर्षात केवळ मुंबई सामने पार पडल्यानंतर यंदाची स्पर्धा बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे खेळण्यात येतील स्पर्धेच्या सलामीचा सामना गत विजेत्या मुंबई इंडियन्स आणि गत विजय उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यामध्ये रंगेल 23 फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान स्पर्धेचे सामने बंगळुरू येथे होणार असून यानंतर नवी दिल्लीमध्ये सामने रंगतील डब्ल्यू पी एल सामन्यांना संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात होईल तसेच यंदा डब्ल्यू पी एल चा उद्घाटन सोहळा ही रंगणार असून यामध्ये बॉलीवूड धमाका होईल अभिनेता कार्तिक आर्यन शानदार सादरीकरण करणार असून त्याच्यासोबत अनेक बॉलीवूड स्टार्स यावेळी दिसतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button