नवीन पोस्ट्सराजकारणसामाजिक

एक पक्षीय पध्दतीकडे वाटचाल धोक्याची A move towards a one-party system is dangerous.

जगामध्ये वेगवेगळया विचार असणारे राजकीय पक्ष  झाले आहेत. मग पक्षाच्या वर्गीकरणांचा विचार केला तर त्यामध्ये उदारमतवादी पक्ष असेल, प्रतिगामी पक्ष असेल, रॅडिकल पक्ष असेल, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष असेल, हे सर्व त्या त्या विचाराला धरून राजकारण करत असतात..आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.

पण सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर भारत हा एक पक्षीय पध्दतीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

आता सध्या भारत हा बहूपक्षीय आहे पण येणाऱ्या काळामध्ये भारत हा एक पक्षीय पध्दतीकडे वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे.. कारण ज्या प्रकारे या घडीला राजकारण चालू आहे की प्रादेशिक पक्ष नाहीसे करायचे आणि पूर्ण भारतात एकाच विचारावर चलणारे पक्ष निर्माण करायचा.. हे भारतासाठी धोकादायक बनू शकते..

राज्यघटनेचा अभ्यास करताना एक व्याख्या मला वाचण्यात आली ती म्हणजे जोसेफ शुंपीटर यांनी असे म्हंटले आहे की “राजकीय पक्षाचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे सत्ता संपादन करून ती टिकवून ठेवण्यासाठी इतरांवर प्रभूत्व निर्माण करणे” या विचाराचा काही जण चालत आहेत की आपलाच विचार लोकांवर इतका बिंबवायचा मग तो सरळ मार्गाने असो की तो इतर वेगळया मार्गाने असो, शेवटी काहीही करून जिकांयचेच..

या विचारामुळे वैचारिक मतभैद काही वर्षांनी नाहीसे होतील आणि एक पक्षीय पध्दत भारतात अस्तित्वात येईल.. पैशाचे जोरावर काही आधिकाऱ्याच्या जोरावर जर विचारात बदल होत असेल, तर प्रादेशिक पक्षच राहणार नाही, एकाच विचाराचे वारे सगळीकडे जर वाहत असेल तर मग काय भारत हा धोक्याच्या वळणावर येउन पोहचला आहे असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही..

१९५१ चा विचार केला तर आपल्या कडे १४ च्या आसपास राष्ट्रीय पक्ष होते आणि आजच्या घडीला फक्त सात राष्ट्रीय पक्ष आहेत. राज्य पक्षांचा विचार केला तर ४० वरून ५९ वर राज्य पक्षांची संख्या गेली आहे.. ही वाढ झाली असली तरी प्रमुख प्रादेशिक पक्षातून फूटून हे नविन पक्ष तयार झाले आहेत..

संख्या जरी तूम्हाला वाढलेली असली तरी प्रमुख राजकीय पक्षाची ताकद कमी करून नविन छोटा गट तयार होत आहेत..असे होत राहिले तर एकदिवस प्रोदशिक पक्ष फक्त नावाला उरतील आणि एकपक्षीय पध्दतीकडे आपली वाटचाल आपण करत असो.

जरी आपल्याला ७ राष्ट्रीय पक्ष दिसत असले तरी त्यांची ताकद बघितली तर खूपच कमी झालेली आहे.

  • कॉग्रेस आणि भाजप सोडले तर कोणताही पक्ष राष्ट्रीय स्थरावर चांगले कार्य करू शकला नाही.
  • बाकीचे ५ राष्ट्रीय पक्ष हे नावालाच राष्ट्रीय पक्ष आहेत. कारण त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकष पूर्ण केला आहे म्हणून त्यांना राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे.. पण त्यांच्या ताकदीचा विचार केला तर ती फक्त काही राज्यांपूर्तीच मर्यादीत आहे.
  • तृणमूल कॉग्रेस, बहूजन समाज पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, सीपीआय,सीपीआय एम, यांची ताकद फक्त दोन तीन राज्यापर्यंतच आहे.
  • आम आदमी पार्टी सारखे काही राजकीय पार्टीला यश प्राप्त होत आहे. पण अजून तिला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी वेळ आहे. एक पक्षीय पध्दतीकडे वाटचाल रोखण्यासाठी भाजपला पर्यांय म्हणून कोणत्यातरी पक्षाला समोर यावे लागेलच. नाहीतर एकदा एक पक्षीय पध्दतीकडे आपण वाटचाल केली की समजायचे आपले स्वातंत्र्य, आपले हक्क, तसेच आपल्या राजघटनेतील आपल्या सर्व सुविधा धोकयामध्ये आहे.

कारण विरोध करण्यासाठी जर विरोधी पक्षच नसेल तर सर्व जागांवर भाजपचीच सत्ता आली तर आपल्या वर एकपक्षीय पध्दतीच्या माध्यमातून हूकमशाही येउ शकते..

माझे मत तर असे ठाम मत आहे की भाजपच्या हातात सत्ता दया.

  • पण त्यांना मित्र पक्षाची गरज पडावी अशा प्रकारे सर्व राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता आपण दयावी.. येणा-या २०२४च्या निवडणूकेमध्ये सुध्दा भाजपच्या हातात बहूमत न देता बहूमतापेक्षा थोडया जागा कमी आणि त्यांना मित्रपक्षांची गरज पडावी अशा प्रकारे मतदान आपण केले पाहिजे..
  • भाजपलाच का म्हणतोय कारण आतातरी आपल्या देशात त्यांच्याशी मुकाबला करेल असा कोणताही राजकीय पक्ष सक्षम मला तरी दिसत नाही..आम आदमी पक्ष आहेच,तसेच कॉग्रेस आहेच पण त्यांची ताकद पाहता या निवडणूकीमध्ये तर मला कोणताही सक्षम पक्ष दिसत नाही..
  • तरीही आपण लोकशाही वाचवण्यासाठी आपण बहूमत भाजप ला न देता त्यांना मित्रपक्षाची गरज पडावी अशा पध्दतीने मतदान करावे..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button