नवीन पोस्ट्स

आयकर म्हणजे काय ( Income Tax )

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सरकार हे नेहमीच जनसामान्याच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवत असते.

अगदी वार्षिक बजेटमध्ये देखील आपण ऐकत असतो की अमुक एका क्षेत्रासाठी इतकी कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. किंवा या योजनेच्या राबवणुकीसाठी अमुक एक रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मात्र हा पैसा येतो कुठून??

 तर याचे उत्तर म्हणजे समाजातील विशिष्ट उत्पन्न मर्यादा पलीकडील उत्पन्न असणाऱ्या जनतेकडून विविध प्रकारचा आयकर वसूल केला जातो. आणि त्याचा वापर सरकार आपला सार्वजनिक खर्च भागविण्यासाठी करत असते. आजच्या या लेखांमध्ये आपण इन्कम टॅक्स अर्थातच आयकर किंवा प्राप्तिकर याबद्दल माहिती पाहणार आहोत.

आयकर म्हणजे काय? ( What is Income Tax?)

 मित्रांनो आयकर किंवा प्राप्तिकर म्हणजेच विशिष्ट व्यक्तीच्या किंवा एखाद्या संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावरील नफ्यावर लावला जाणारा कर होय.

अगदी ब्रिटिश काळापासूनच हा कर आकारण्यास सुरुवात झालेली पहावयास मिळते.

 आयकर हा व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नफ्यावर लादला जातो त्यामुळे त्याला करप्रात्र उत्पन्न असे देखील म्हटले जाते.

आयकर ही संकल्पना खरंतर प्रत्यक्ष कर यामध्येच मोडते. हा कर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर लादला जातो. ज्या व्यक्तीवर हा कर लागू होतो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो. करदात्याला कराचा भार इतरांवर हस्तांतरित करता येत नाही ,त्यामुळे इन्कम टॅक्स मध्ये कराचा कराघात (अर्थातच कर लादला जाणे) व कराभार (अर्थातच कर वसूल केला जाणे) हा एकाच व्यक्तीवर असतो असे म्हटले जाते.

आयकराची वैशिष्ट्ये (Features of income tax)

आकाराची वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत.

१. या कराचा कराघात ज्या व्यक्ती किंवा कंपनीवर होतो त्याच व्यक्तीला किंवा कंपनीला हा कर भरावा लागतो.

२. हा कर संक्रमित होत नाही म्हणजेच हा कर हस्तांतरित करता येत नाही .

३. आयकर हा एक प्रगतिशील प्रकारचा कर आहे (म्हणजेच व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दरही वाढत असतात तेव्हा त्यास प्रगतिशील कर असे म्हणतात).

 भारतात अशी प्रगतिशील कर रचना प्रचलित आहे

४.या करास प्रमाणशीर कर असे देखील म्हणतात. (व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारणी केली जाते तेव्हा त्यास प्रमाणशीर कर असे म्हणतात).

५.  आयकर हा प्रतिगामी कर म्हणून देखील ओळखला जातो. म्हणजे यात जसजसे उत्पन्न वाढते तसतसे कराचे दर वाढत जातात.

६.या कराचा मुख्य उद्देश असा की यामध्ये श्रीमंत लोकांकडील अधिकचे उत्पन्न सरकार आपल्या सरकारी तिजोरीत गोळा करून त्या पैशांचा वापर गरिबांकरिता कल्याणकारी योजना बनवण्यासाठी करत असत. त्यामुळे यास प्रगतिशील कर असे देखील म्हणतात.

७.हा कर समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचे कार्य देखील करत असतो.

1961 च्या प्राप्तिकर कायद्याअंतर्गत या कराची वसुली करण्यास सरकारकडून सुरुवात झाली.

आयकर आकारण्यामागील कारण  (Reason Behind Income Tax)

 इंग्रजीतील एक म्हणी प्रमाणे “Nations are made when taxes are paid” याचाच मराठीत अर्थ असा होतो की जेव्हा जनता कर भरते तेव्हाच देश घडला जातो.

 या म्हणीवरून करांचे महत्त्व आपल्या नक्कीच ध्यानात आले असेल. सार्वजनिक खर्चासाठी व सरकारच्या विविध कामकाजासाठी जनतेकडून म्हणजेच जनतेच्या उत्पन्नावरील नफ्यावर कर आकारणी गरजेची  असते.

आयकर किती आणि कशावर भरावा लागतो? How much and on what Income Tax has to be paid?

 जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे उत्पन्न सरकारद्वारे निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा वाढते तेव्हा  त्या उत्पन्नावर सरकारला कर द्यावा लागतो.

 हा कर करदात्याच्या क्षमतेनुसार म्हणजेच उत्पन्न मर्यादेनुसार आकारला जातो. म्हणजेच क्षमता असेल तेव्हा आणि क्षमतेच्या प्रमाणात कर आकारला जातो.

 वैयक्तिक उत्पन्न कर अर्थातच आयकर हा पुढील बाबींवर आकारला जात असतो.

१. वेतन

२.घर भाडे

३.भांडवली नफा

४. व्यवसाय

५.इतर स्त्रोत

मित्रांनो जरी आयकर हा “आयकर कायदा 1961” अंतर्गत आकारला जात असला तरी आयकरा बाबतचे नियम बनवण्याचे काम हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मार्फत केले जाते.

आयकर रिटर्न्स कसा भरावा? How to file Income Tax Returns?

मित्रांनो आयकर कसा भरावा याची बऱ्याच लोकांना माहिती नसते.

 आयकर भरण्यासाठी सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन आपला आयडी व पासवर्ड टाकावा आणि लॉगिन करावे. पुढे त्यावरील ई फाइलिंग या टॅब वर क्लिक करून तेथे तुमचे आर्थिक वर्ष निवडा यामध्ये तुम्हास ऑनलाईन व वैयक्तिक असे दोन पर्याय उपलब्ध असतील .पुढे गेल्यानंतर या दोन्ही मध्येही तुम्हाला आयटीआर एक (ITR -1 ) आणि आयटीआर चार (ITR -4) असे दोन ऑप्शन्स दिसतील. यापैकी पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर एक (ITR-1) व इतरांसाठी आयटीआर चार(ITR-4) असेल. पुढे गेल्यावर आलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा. ज्यामध्ये तुम्हाला बँक खात्या संदर्भातील माहिती देखील विचारली जाईल. सर्व डिटेल्स व्यवस्थित भरल्यानंतर फॉर्म सेव करावा. पुढे तुम्हाला ऑफलाइन आणि ऑनलाईन असे दोन पर्याय उपलब्ध होतील. यातील ऑफलाइनचा पर्याय निवडल्यास आपण सदर फॉर्म डाऊनलोड करून घेऊ शकतो. आणि अशा रीतीने आपला आयकर भरला जाऊ शकतो.

मित्रांनो अनेक लोकांना आयकर हे जाचक बंधन जरी वाटत असले तरी राष्ट्र निर्मितीसाठी ते आवश्यकच असते. आयकर म्हणजे आपण देशाच्या प्रती काहीतरी देणे लागतो या भावनेतून केलेली परतफेडच असते .

बहुतेक लोकांना आयकर बुडविण्याच्या पद्धती जाणून घेण्यात रस असतो. मात्र समाजातील अगदी थोडेच लोक कर भरण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेताना दिसतात .मित्रांनो राष्ट्राकडून काहीतरी अपेक्षा करण्यापूर्वी आपणही राष्ट्रास आपल्या परीने कर रूपाने का होईना सहाय्य करावयास हवे .प्रत्येकाने कर बुडविण्यापेक्षा कर भरण्यावर भर द्यायला हवा.

मित्रांनो आजची ही आयकर वरील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळविण्यास विसरू नका. तसेच करपात्र असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांनाही ही माहिती नक्की शेअर करा.

 धन्यवाद!!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button