उदया ११ जूलै आहे ..११ जूलै जागतिक लोकसंख्या दिन असतो. या दिवशी जगातील लोकसंख्या नियत्रंण याच्या वर चर्चा करता आणि आवश्यक असेल तर लगेच धोरण पण निश्चित करतात. भारताने लोकसख्या धोरण १९७६ ला तसेच २००० ला आखले होते.
पण त्याचा जेवढा म्हणेल तेवढा परिणाम झाला नाही .लोकसख्या वाढायची ती वाढलेलीच आहे..१४० करोड च्या आसपास आपली लोकसंख्या पोहचली आहे.
मग या लोकसख्यांचा फायदा भारताला होत आहे की नाही, लोकसंख्या कमी करायची असेल तर कुंटुब नियोजन राबवायचे की नाही.
छोटे कुंटुब महत्वाचे की मोठे कुंटुब महत्वाचे ?
- अगोदर चर्चा करूया की लोकसंख्येचा भारताला फायदा होत आहे का ..
- तर याचे उत्तर माझ्या मते होय आहे कारण जगातील मोठमोठया कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत.
- कारण भारताची बाजारपेठ आणि त्या बाजारपेठ मध्ये असलेल्या लोकसंख्येकडे बघून कंपन्या व्यापार करायला तयार होत आहेत.
- जेवढी जास्त लोकसंख्या जेवढा त्या कंपनीला फायदा जास्त होणार आणि तेवढाच फायदा भारतालाही होणार कराच्या स्वरूपात..
- प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राहकाची कमी असणार नाही जर लोकसंख्या जास्त असेल तर ..जेवढी लोकसंख्या जास्त त्याच प्रमाणे देवाण घेवाण भारतातील वाढणार.
- प्रत्येकाच्या हाताला काम जर पाहिजे असेल तर लोकसंख्या बाजारपेठ मोठी असली पाहिजे, कधी बाजारपेठ मोठी होईल जेव्हा ग्राहक संख्या वाढेल तेव्हा…
- दुसरी महत्वाची बाब म्हणजे लोकसंख्या नियत्रंण करायचे म्हणजे कुटुंब लहान करावे लागेल…काही जण भारतीय संस्कती चा विचार करताना दिसत नाहीत..
- आपल्या संस्कृती मध्ये मामा, बहीण, भाउ, काका, मावशी, आत्या, काकी, मामी, मेहूणा, दीर, जावा, मामेभाउ, या सर्व नात्यांना आपल्याला मुकावे लागणार..
- कारण प्रत्येकाने ठरवले की एकच अपत्य होउ देणार, एकालाच मी व्यवस्थित संभाळणार आणि त्याचे भविष्य सुरक्षित करणार..ते गोष्ट चांगलीच आहे पण त्याला जो जगताना एकटे पणा वाटेल त्याचे काय..?
- त्याला त्याच्या वयाचे किंवा तूम्ही नसल्यावर त्याची काळजी घेणारे कुणी नको का ?
- आपल्या भारतीय संस्कृती मध्ये मिळून मिसळून एकमेकांना साथ देत राहण्याची पध्दत आहे.. तो पूढील आयुष्यात एकटा पढणार नाही का…?
- त्याने कोणाला मामा म्हणायच, त्याने कोणाला काका म्हणायच, त्याने कोणाला ताई म्हणायच, त्याने कोणाला आत्या म्हणायच …लोकसंख्येच्या नियंत्रणाच्या नावावर आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल…
- जे भारतीय सण आहेत त्याला धोका लागू शकतो, रक्षाबंधन, दिवाळी सारख्या सणांना महत्व राहणार नाही…
लोकसंख्येचा वापर ताकद म्हणून करायला हवा,याच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे..
- दुसरी बाजू अशी आहे की लोकसंख्या वाढली तर याच्या प्रत्येकाला काम कसे मिळणार..
- एवढया सगळयांना काम दयायचे म्हणजे त्या पटीने उदयोग उभा राहिले पाहिजे ..आपल्या भारतात जास्तीत जास्त उदयोग उभा राहिले पाहिजे ..आपली निर्यात किती तर पटीने वाढली पाहिजे आयातीपेक्षा..
- भारतीय अर्थव्यस्थेवर ताण येणार …हो खरे आहे
- प्रदुर्षण वाढणार …हो हे ही खरे आहे
- शेताचे अजून तूकडे होणार .. हे ही खरे आहे
- लोकांकडे कमी जमीन राहणार ..हे ही खरे आहे
- प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागणार . हे ही खरे आहे
पण याचा अर्थ आपली संस्कृती मध्ये बदल करणे हा उपाय असू शकत नाहीत..याच्या वर विचार करण्याची गरज आहे..
आपली नाती आपण टिकवलीच पाहिजे..एकलकोंडा राहून जगण्यात काय अर्थ आहे..असेल तुमची आर्थिक बाजू ताकदवान.
पण जर तूमच्या मुलाना भाउ नाही, तुमच्या मुलाना मामा नाही, तुमच्या मुलाला आत्या नाही, तुमच्या मुलाला मावशी नाही,तुमच्या मुलाना काका नाहीत,तुमच्या मुलाना पुतण्या नाही, तुमच्या मुलाला भाउजी नाही.
तुमच्या मुलाला घरात त्याच्या वयाचा कोणी नाही तर अशा एकलकोंडया अवस्थेत तुम्ही तुमच्या मुलांना वाढवणार आहात का..
लोकसंख्या वाढीचे तोटे असतील प्रचंड, येत असेल अर्थव्यवस्थेवर ताण पण भारतीय संस्कृती जपूनच निर्णय घेण्यात यावा…
कारण कधी कधी अर्थव्यवस्थेपेक्षा आपली ओळख आपण जपली पाहिजे…लोकसंख्येमुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देत त्यावर मात कशा प्रकारे आपण करू शकतो.
तो मार्ग आपण शोधून काढला पाहिजे …पूढे चालून आपण दोघे आणि आपले एक अपत्य असल्या योजना आपल्या भारतात येउ शकतात ..पण हे भारतीय संस्कृती साठी चांगले नाही..
काही वर्षापूर्वी काही देशांनी अशीच योजना आणली आज त्या देशाची अवस्था अशी आहे की तेथे फक्त म्हताऱ्यांची संख्या जास्त आहे…
आपल्यावर अशी वेळ येउ शकते. माझ्या मते या पूर्ण लेखाचा सार सांगायचा तर मोठे कुंटुंब असण्यावर भर सर्वांनी दिला पाहिजे..
लेखक – राम ढेकणे..