७० दिवस चोरला दररोज परमानंद
३० एप्रिल चा दिवस ,सगळेजण अभ्यास करत होते.कोणालाही कल्पना नव्हती की आपण येणाऱ्या दिवसात अभ्यास सोडुन दुसऱ्याविषयामध्ये लक्ष घालणार,कोणालाही कल्पना नव्हती की आपल्याला परमानंद घेता येणार,कोणाला ही कल्पना नव्हती की आपण अभ्यास करत असताना एखादा तास ताणमुक्त जगु शकू,कोणालाही कल्पना नव्हती की आपण भविष्यात अशा प्रकारे एखादी क्रिया करणार आहोत,सगळेजण परिक्षा कधी होईल,आणि मला नौकरी कधी लागेल ,आणि माझ चागलं कधी होईल,माझ लग्न कधी होईल ,आपल्याला यश भेटेल का,वय निघून जात आहे सरकार जागा काढत नाही वगैरे वगैरे अशा अनेक प्रश्नांनी आम्हाला ग्रासले होते.आम्ही फक्त् तणावयुक्त जीवन जगण्यात आमचा वेळ जायचा, परिक्षा तर होत नव्हत्या मग काय नशीबात बहुतेक या काही महिन्यात परमानंद आम्हाला मिळेल असं लिहून ठेवलं होत.
मला अजून आठवत आहे की ३० एप्रिल चा दिवस होता,दिगंबर महाराज आले आणि त्यांनी आयुष्यात कशा प्रकारे आपले ध्येय प्राप्त केले पाहिजे या बद्दल काही विचार आमच्या समोर मांडले .जर तुम्हाला आध्यात्मिक अभ्यास असो किंवा तुमचा अभ्यास असो स्पर्धा परिक्षेचा त्यासाठी तुम्ही कोणताही खेळ दररोज खेळला पाहिजे ,तसेच दररोज व्यायाम केला पाहिजे ,जेवढ तुमच शरीर चांगलं तेवढया वेगाने तुम्ही तुमचे ध्येय गाठणार. तुम्हाला ऐवढी मोठी जागा उपलब्ध् करून दिली आहे त्याचा उपयोग करून घ्या.
मग काय महाराजांचे विचार मनावरं घेतले तसेच बहिणाबाई – ताईसाहेबासारेखे व्यक्ती पाठीशी असल्यावर पैशाची कमतरता कशी जाणवेल,मग काय ताईच्या कृपेने अकाउंट वर असतात काही पैशे त्या पैशाचा वापर केला आणि आणला व्हॉलीबॉल,आणि जाळी ,आणि सूरू झाला वेळ परमानंद घ्येण्याचा.
३० एपिल पासून सूरू झालेला खेळ आज ७० दिवसपर्यंत येउन पोहचला आहे.एखादा समुह आपल्या व्यस्त् जीवनातून वेळ काढून येण्याची शक्यता कमीत असते.पण आम्ही ते करून दाखवले.नेहमी प्रमाणे ठरल्या प्रमाणे सकाळी अभ्यास करायचा ,६ वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि ६ वाजले की मैदानामध्ये १ तास ..दररोज आम्ही परमानंद चोरला..ताणयुक्त जीवनात दररोज आम्ही परमानंद चोरला.
महेश,शुभम,सुदर्शन,श्रेयस,सुहास,राहूल,अमित,शिवानंद सर,शेरकर सर,शुभम,गौरव,सुशिल,प्रमोद,अविनाश,संतोष,आकाश,विकी,प्रसाद,शिवाजी ही आमचा संघ ..व्हालीबॉल काय असतो हे सुध्दा काही जणांना माहित नव्हते ,हळू हळू सर्वमाहिती घेत आता ते आमच्या पेक्षासुध्दा चांगले खेळत आहेत.
व्हॉलीबॉल हा भारतीय खेळ नाही पण खर बघायला गेले तर कोणताही खेळ हा जास्त दिवस त्याच प्रदेशामध्ये खेळला जात नाही..कारण प्रत्येक खेळ एकदा का समजला की प्रत्येकाला खेळ खेळू वाटतो..आवड निर्माण होते..तसेच झाले आपल्या भारतात ही हा खेळ प्रत्येक खेडयामध्ये खेळला जातो.
एका टीम मध्ये ६ खेळाडू असतात..३ बॅकला आणि तीन फ्रंट ला .नियम सरळ साधा आहे की बॉल जमिनीला टेकला न पाहिजे..तर बॉल जर जमिनीला टेकला तर समोरच्या संघाला गुण दिला जातो..दुसरे नियम आहेत.त्या नियमाचे पालन करूनच हा नियम आपल्याला पालायचा असतो.
परमानंद चोरला का हे शिर्षक याच्या साठी दिले आहे की..ध्यानी मनी नसताना ही आम्हाला आनंद मिळत आहे..आमचे ध्येय काय आहे की अभ्यास करणे ,आणि सरकारी नौकरी प्राप्त करणे..पण त्याच्या शिवाय कोणत्याच गोष्टीची कल्पना आमच्या डोक्यात नव्हती..मग अशा या व्यस्त् वेळेत आम्हाला आमच्या साठी वेळ देता येत नव्हता ,सतत अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास …शरीराकडे लक्ष नाही ,वेगवेगळे आजारांची लक्षणे घेउन आम्ही अभ्यास करत होतो.. मग अशा व्यस्त् वेळेमधून आम्ही हा एक तास काढला आणि त्या एका तासामध्ये आम्ही अनुभवला जीवनातील खरा आनंद आणि तो म्हणजे परमानंद.
परमानंद म्हणजे ईश्वरांशी एकरुप होउन जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगणे..तेच तर केले आम्ही ..त्या एक तासामध्ये फक्त आणि फक्त आमचे मन त्या खेळाशी एकरूप होत होते..ना कशाची चिंता ,ना कोणाशी बांधिलकी,ना कसली जबाबदारी …फक्त आणि फक्त स्वत:साठी सुखद क्षण अनुभवले.
७० दिवस चोरला परमानंद….पण आता पाउस सुरू झाला आहे..आता हा आनंद आम्हाला घेता येणार नाही..पण सदैव हा ७० दिवस चोरलेला परमानंद आठवणीत राहील.
संकंट आले,
दु:ख जवळ आले,
मन निराश झाले,
कष्ट केले,
यश नाही आले,
मन सुन्न झाले,
महाराज आले,
विचार मांडले,
परमानंद देउन गेले…