Celebration of Shiv Jayanti | शिवजयंतीचा चैतन्य सोहळा
आज आपण बघणार आहोत संभाजीनगर चा शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त झालेले सर्व कार्यक्रमांची रूपरेषा. जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष ढोल पथक आणि लेझीम पथकाचे शिस्तबद्ध सादरीकरण ,शाहिरांनी सादर केलेले पोवाडे शिवबा आणि जिजाऊंच्या वेशभूषेतील शेकडो तरुण तरुणींचा अबालवृद्धांच्या अमाप उत्साहात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती(Celebration of Shiv Jayanti) साजरी झाली.
जयंतीला रविवारी मध्ये रात्रीपासूनच सुरुवात झाली होती जिल्हा शिवजयंती उत्सव समिती तरफे क्रांती चौकात मध्यरात्री फटाक्यांचे आतेशबजी करण्यात आले सोमवारी सकाळी झेंडावंदन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड माजी खासदार चंद्रकांत खैरे पृथ्वीराज पवार जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे माजी आमदार किशनचंद तनवाणी डॉक्टर कल्याण काळे बाळासाहेब थोरात यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी व हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती क्रांती चौकात रणझुंजार ढोल वाद्यपथक मराठी वादळ प्रतिष्ठानच्या ढोल पथकाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध सादरीकरण झाले
शहरात वेगवेगळ्या भागात 150 मिरवणुका शोभायात्रा
शहरातील विविध भागातून सुमारे दीडशेहून अधिक शोभायात्रा मिरवणुका काढण्यात आल्या बहुतेक मिरवणुका क्रांती चौकात आल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून परत गेल्या पारंपारिक वेशभूषेतील नागरिक सहभागी होते . या संस्थान गणपती येथील आणि गजानन महाराज मंदिर चौक येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकांचा प्रमुख समावेश आहे.
110 मोटरसायकल रॅली शहरातील विविध भागातून लहान मोठ्या सुमारे 110 दुचाकी रॅली शिवप्रेमींनी काढल्या दुचाकी ला भगवा दज बांधून आणि दुचाकीस्वार तरुण-तरुणी फेटे बांधून रॅली घेऊन शहरात फिरताना दिसले.
राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांचे व्यासपीठ
क्रांती चौकात जिल्हा शिवजन्मोत्सव समिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाचे तीन स्टेज होते सोबतच सामाजिक संस्थांचे दोन स्टेज तेथे लावण्यात आले होते प्रत्येक स्टेजवर पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसलेले होते.
अन्नदान ,पाणी बाटली वाटप
क्रांती चौकात अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांनी खिचडी शिऱ्याचे वाटप केले तसेच अनेकांनी पाण्याच्या बाटल्या मोफत वाटप केल्या दुपारी उन्हाचा चटका वाढल्यामुळे पाण्याच्या वाटल्या घेण्यासाठी अवघ्या काही वेळात नागरिकांनी गर्दी केली.
India’s biggest victory | भारताचा सर्वात मोठा विजय
160 पुतळे आणि प्रतिमांचे पूजन
शहरातील वेगवेगळ्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे-मोठे 160 पुतळे आणि प्रतिमांचे पूजन शिवप्रेमींनी करून उत्साह साजरा केला लाऊडस्पीकर लावण्यात आले होते काही ठिकाणी डीजे लावून आणि शिवगीत वाजवून शिवप्रेमींनी नृत्यही केले.
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम
जिल्हा शिवजयंती महोत्सवा समितीच्या वतीने लावण्यात आलेले स्टेजवर शिवरायांच्या आकर्षक शिल्प ठेवण्यात आले होते महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते या स्टेजवर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Laptop Yojana एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना २०२४ विषयी माहिती One Student One Laptop Yojana 2024 information in Marathi
मनपा जिजामाता शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक
शिवजयंती(Celebration of Shiv Jayanti) निमित्त क्रांती चौक येथे मनपा आणि जिजामाता शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले यावेळी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत पोलीस उपायुक्त नितीन बगाटे आणि शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
24 तासांपेक्षा अधिक वेळ पोलीस रस्त्यावर
पोलीस आयुक्त मनोज लोहिया उपायुक्त नितीन बगाटे , नवनीत कावत ,शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी मध्ये रात्री दोन वाजेपर्यंत 2000 पोलीस तैनात होते 29 पोलीस निरीक्षक 71 एपीआय उपनिरीक्षक 1578 पुरुष तर 104 महिला अंमलदारांचा सहभाग होता.