आयुष्यातील तरूण वय ,कवळे वय आम्ही या चार पूस्तकामध्ये घातले,सर्व क्षेत्राचा आम्हाला अभ्यास करावा लागतो,कोणत्याही क्षेत्रात एखादी नविन गोष्ट घडली तर आम्हाला तिचा भूतकाळ ,वर्तमान काळ ,भविष्यकाळ सर्व बाबी लक्षात ठेवावया लागतात,आजूबाजूला काय काय घडत आहे याच्यावर आमचे बारीक लक्ष असते..पण हे सर्व करत असताना आमचे तरूण पण याच्यातच जाईल असे वाटले नव्हते.
मग काय कालचीच एक गोष्ट पुण्यामधील एका विदयार्थ्याने आत्महत्या केली पण त्याची दखल घेउन सरकारला काय जाग आलेली दिसत नाही..काय करणार तो बिचारा १० वर्षे त्याने स्पर्धा परिक्षेसाठी दिले होते ,सरकार जर जागाच काढत नसेल तर तो कसा यशस्वी होणार..कसा मोठा होणार,कसा अधिकारी होणार..शेवटी त्याने जीव दयायचा ठरवला आणि आपल्याला सोडून निघून गेला…१० वर्षे पुण्यासारख्या ठिकाणी राहणे म्हणजे त्याचा खर्च किती झाला असेल तो विचार करा..आणि शेवटी हातात काहीच नाही मिळाले तर त्याने काय करावेच याचे पण उत्तर तूम्हीच दया.
किती दिवस तो घरून पैसे मागणार तरीही त्याने दहा वर्षे घरून पैशे मागण्याची हिंमत केली पण माणूस किती दिवस आपला मान सन्मान गमवून दुसऱ्याला पैशे मागणार ,शेवटी स्वत:ची च लाज वाटायला सुरूवात होते या स्पर्धा परीक्षेच्या दुनियेमध्ये आणि मग दिसायला लागतो सगळीकडे अंधार ..शेवटी आपल्या माणसांना सुध्दा पैश मागू वाटत नसल्यामुळे त्याला जगण्यासाठी दुसरा मार्ग दिसत नाही..१० वर्षे या क्षेत्रात गेल्यावर ,तो कसा सामोरे जाणार या समाजात ,लग्नाचा ताण,कमीपणा,अशा अनेक गोष्टीचा विचार करून तो शेवटी या आयुष्याला रामराम ठोकतो आणि आपले जीवन संपवतो …
पूण्यामधील आमच्या जीवावर हॉटेल वाले ,घरमालक ,क्लास वाले एवढे मोठे झाले आहेत की आता त्यांनी स्वत:चा ब्रॅन्ड तयार केला आहे..प्रचंड पैसा आमच्या जीवावर या लोकांनी कमवला.
पण आमच्या नशीबी निराशाच ….आमच्या स्वप्नामुळे बाकीचे माणसे मोठी झाली पण आम्ही मात्र १० वर्षापूर्वी जेथे होतो तेथेच…
आत्महत्या करणे हा पर्याय नाही पण आमच्या कडे सरकारने लक्ष दिलेच नाहीतर आम्ही काय करायचे …
एवढे वर्ष या क्षेत्रात दिलेले असते ,हे क्षेत्र सोडून पण जाता येत नाही,आणि सरकार जागा पण काढत नाही मग आम्ही करायच काय..विचार करण्याची क्षमता खुंटत जाते,आणि शेवटी वाटते की आता आयुष्याचा निरोप घ्यावा.
वेळेवर जर सरकारने याच्याकडे लक्ष दिले नाही तर आमच्या सारख्या तरूणांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही..
मुद्रा लोन ची व्यवस्था केली आहे तूम्ही पण आमचा एक सहकारी त्या मुद्रा लोन काढण्यासाठी गेला तर त्याच्या कडे पैशाची मागणी करण्यात आली ..मग आता व्यवसाय करायला जर भांडवल पण नसेल तर आम्ही जगायचे कसे ,तरूणांना त्यांच्या पायावर उभा करायची आता तूमची जबाबदारी आहे..जर वेळेवर जागा जर तूम्ही काढत असले असते तर ही वेळ तरूण मुलांवर आली नसती.
एक जण आमच्या जवळ आला आणि आम्हाला म्हणाला की आता समजा तुम्हाला हे क्षेत्र सोडायचे म्हंटले तर मिस्त्रीच्या हाताखाली सुध्दा तूम्हाला कोण घेणार नाही..कारण ते करायला मनगटात ताकद लागते,आणि तूमच्या कडे बघून तर वाटत नाही की तूम्हाला ते जमेल म्हणून..
आत्महत्या करणे हे पर्यांय करणे हा उपाय तर नाहीच..पण एक गोष्टी नक्की आहे ती म्हणजे अजून आपल्याला स्वत:ला सिध्द करायला ,समाजामधील मान,अपमान,काम न मिळणे,संघर्ष,कमी पगार ,लग्न न होणे,तूमच्या गरजा वर नियंत्रण ,या सर्व गोष्टी तून जावेच लागेल..फक्त खचून न जाता ,येणाऱ्या प्रत्येक क्षणांना सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे..आत्महत्या त्या लोकांनी करायला पाहिजे ज्यांनी वेळेवर जागा काढल्या नाहीत ..आपण काय चूकीचे केलेले नाही..लढणे,संघर्ष करत राहणे ,जे होईल ते होईल ,फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहणे ,आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगणे दु:ख असताना सुध्दा ..हेच आपल्या हातात आहे..अशी समजूत आम्ही स्वतः ची काढतो आणि जगत आहोत.