Moonlighting is right or wrong | मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य
मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य: आजच्या युगात जर आपल्या पाल्याला ,आपल्या जवळच्या माणसांना जर चांगले राहणीमान ,चांगले शिक्षण दयायचे असेल,चांगल्या वातावरणात त्याचे पालन पोषण करायचे असेल तर पालक वर्गाला एका नौकरी मध्ये या सर्व सुविधांचा पुरवठा करणे शक्य आहे का,असेल तर चांगलीच गोष्ट आहे.पण अशा सुविधा देणे होत नसेल तर काही पालक मूनलाईटींगचा वापर करतात..
आता तूमच्या मनात प्रश्न पडला असेल की मूनलाईटींग म्हणजे काय तर त्यासाठी तर हा लेख मी तूमच्या समोर घेउन आलो आहे..मूनलाईटींग म्हणजे आपला नियमित असलेली नौकरी सोडून इतर ठिकाणी सुध्दा नौकरी करणे..
मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य माहिती
म्हणजे तूम्ही एका ठिकाणी ९ घंन्टे नौकरी करून घरी आलात आणि या तूमच्या फावळया वेळेमध्ये जर तूम्ही एखादी दुसरी नौकरी करत असाल तर त्याला म्हणतात मूनलाइटींग करणे..
आपल्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जोडव्यवसायासारखे आपण त्याला म्हणू शकतो..
पण जोड व्यवसायामध्ये आपण दुसरा व्यवसाय करतो..पण या मूनलाईटींग मध्ये तेच काम दुसऱ्या कंपनी मध्ये काही करतात..
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अधिकचे पैसे कमवण्यासाठी काही जण रात्रीच्या वेळी अजून एखादे काम करतात..
मूनलाईटींग जर संकल्पना
जर समजली असेल तर पूढे आपण चर्चा करूया की मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य ..
ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्या ठिकाणी जर आपल्याला भरपूर पगार मिळत असेल,आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील तर त्या ठिकाणी कामगार ,कर्मचारी मूनलाईटींग नाहीत करत..
पण ज्या ठिकाणी तूटपूंजा पगार मिळतो,त्या पगारामध्ये त्या व्यक्तीचे काहीच भागत नसेल,त्याला तो पगार घर चालवण्यासाठी अपूरा पडत असेल तर तो या मूनलाईटींग चा वापर करणारच..
आणि अशेपण काही जण आहेत ,की आपल्या बुध्दीचा विकास एवढा करतात की एका कंपनीचे काम काही तासात पूर्ण करून दुसऱ्या कंपनीचे काम करायला हाती घेतात,आणि ते पण त्या दिवशी पूर्ण करतात..
मग कर्मचारी वर्गांसाठी मूनलाईटींग हे एक चांगला पर्याय आहे पण कंपनी साठी हा धोकादायक ठरू शकतो..कारण समजा माहीती तंत्रज्ञान विषयाशी निगडीत जर एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनी मधील कामगार माहीती तंत्रज्ञान विषयामधील दुसऱ्या कंपनी मध्ये काम करत असेल आणि जर त्या कर्मचाऱ्यांने माहीतीची देवाण घेवाण केली तसेच ,काही महत्वाच्या गोष्टी त्याने कंपनीच्या शेअर केलया तर त्या मध्ये कंपनीचे नुकसान होण्याचे धोके वाढतात..
मग याला पर्याय काय आहे तर जर कंपनी ने आपल्या कर्मचारी वर्गाला चांगला पगार दिला,त्यांची काळजी घेतली ,त्याच्या पगारामध्ये वेळेवर वाढ केली तर अशा गोष्टी घडणार नाहीत..
आणि दुसरी अशी गोष्ट की काही कंपनीने मूनलाईटींगला परवाणगी दयायाल पाहिजे कारण जर एखादा कर्मचारी दोन्ही ठिकाणी चांगले काम करत असेल तर कोणाचेच नुकसान होणार नाही..पण यामध्ये जर एखादया कंपनीच्या कामावर जर परिणाम होत असेल कंपनी समोर हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे..
तरीही आजच्या युगामध्ये एक नौकरी करून आपले घर भागवणे कठीण आहे,जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर आपण पण दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतो..
अशा काही कंपनी आहेत त्या फक्त १० घंटे कामगारांना अडकवून ठेवतात..काम असते कमी पण ब्रिटीशांनी आपल्या वेळेचे घातलेले बंधन अजून काही कंपन्या त्या प्रमाणेच वागतात..
मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य माहिती
तसेच काही डॉक्टर ,वकील,अधिकारी ,शिक्षक हे सर्रास मूनलाइटींगचा वापर करताना दिसत आहेत पण ते काम चूकवेगिरी ने..म्हणजे सरकारी डॉक्टराचे काम असते सिविल मध्ये सेवा देणे पण त्या ठिकाणी जास्त वेळ न राहता तो आपल्या क्लिनिक मध्ये सेवा देत आहे आणि अधिक कमाई करत आहे..तसेच शाळेमधील काही शिक्षक वर्ग शिकवणी वर्ग घेताना दिसत आहेत..
आतापर्यंत सरकारने तर या विषयावर कायदा केला नाही..याच्यावर नियंत्रण आणणे किंवा याचा वापर करू देणे हे सरकार कशा प्रकारे मूनलाईटींग भविष्यात राबवणार हे येणारा काळच आपल्याला सांगू शकेल…