पानाडी : पाणी पाहणारा
काही गोष्टीला कारण नसेल तर विश्वास बसत नाही..पण आपल्या आजूबाजूचे काही जण म्हणत असतील आपल्या विश्वास ठेवतो..अशीच एक बाब म्हणजे पानाडीच्या बाबतीत.
एक २० च्या आसपास वय असलेला तरूण सांगत होता की मला पाणी पाहता येतो..कोणत्या ठिकाणी जमिनीच्या खाली पाणी आहे हे मला कळते..ते कसे कळते ते मी नाही सांगू शकत पण मला पाणी कोणत्या ठिकाणी असेल हे मी सांगू शकतो..हे एकून माझा विश्वास बसत नव्हता.
मग मी विचारले आता पर्यंत तू किती ठिकाणी पाणी पाहिले आहे..आणि त्याचे उत्तर एकून मी थोडा सा सौम्य धक्का बसला..आता पर्यंत १००० च्या पूढे ,त्याच्या आसपास मी पाणी पाहिले आहे असा तो म्हणत होता.
आणि प्रत्येक ठिकाणी पाणी लागलेच असा पण तो म्हणाला.
तूलाच कस काय कळते ,तर त्याला ते सांगता आले नाही..पण त्याने असे सांगितले की मी पायाळू आहे..म्हणजे जन्मताना माझे डोके अगोदर बाहेर न येता,माझे पाय अगोदर बाहेर आले. बहूतेक त्या मुळे मला पाणी दिसत असेल असे त्याचे म्हणणे होते..मला हे ऐकून अजून एक सौम्य धक्का बसला.
आणि जेव्हा त्या तरूणाने अजून एक खूप मोलाची गोष्ट सांगितली ती ऐकून तर मला त्याला काय बोलावे ते कळेना.. त्याचे असे म्हणणे आहे की त्याला एखादया ठिकाणी सोने,चांदी आहे का नाही हे पण कळते.
हे ऐकून मी त्याला म्हंटले मग चल मला दाखव सोने कुठे आहेत,मला खूप गरज आहे सोन्याची .
मग याच्यावर त्याचे उत्तर ऐकून मला त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया करावी कळेना..त्याचे असे म्हणणे आले की जर मी सोने कुठे आहे ते दाखवले तर आणि जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला तर ज्याने प्रयत्न केला सोने काढण्याचा त्याच्या घरातील एखादया व्यक्तीची बळी जातो किंवा त्या व्यक्तीला स्वप्नात ज्याचे ते सोने आहे त्या व्यक्ती त्रास देतात,त्याचे जीवन पूर्णपणे त्रासदायक होउन जाते,आणि त्याला झोपे वगैरे घाम फूटतो.
किंवा काही प्रसंगातर ज्याने सोने दाखवले त्या व्यक्तीला सुध्दा त्रास होतो किंवा त्याचा सुध्दा जीव जाउ शकतो.
मी काही ठिकाणी सोने असल्याचे काही जणांना सांगितले तर त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना विचित्र काय पण दिसू लागले आणि त्यांचे जीवन त्रासदायक बनले. त्या व्यकतीने त्या जागेवरील सोने घेण्याचा प्रयत्न केलाच नाही.कारण त्याला भयानक स्वप्न पडू लागले.
जे पायाळू असतात त्यांनाच पाणी आणि सोने जमिनीमध्ये कुठे आहे ते समजते .
मग मी म्हंटले की तू सरकार कडे जा आणि त्यांना सांग ,आणि आपल्या भारताची गरीबी दूर कर.
तर त्याचे असे उत्तर होते की सोने काढायला गेल्यावर माझ्या पण जीवाला त्या सोन्या जवळ असलेल्या किंवा ज्यांनी हे सोने पूरले आहे किंवा ज्यांचे हे सोने आहे त्याच्या पासून धोका होउ शकतो आणि माझा जीव पण जाउ शकतो.
आणि उलट सरकार मला विचारेल की हे सोने तूच लपवले नाहीस,म्हणून मलाच कैदी बनवेल..मला आरोपी ठरवेल.
म्हणजे त्याला असे म्हणायचे होते की आत्मा किंवा एक उर्जा त्या ठिकाणी असते मी माणसांच्या पाठीमागे लागते…जर सोने काढण्याचा प्रयत्न केला तर.
त्याला सोने कुठे आहे हे दिसते यावर तूमचे मत काय आहे हे मला सांगा,आणि अशा गोष्टी खऱ्या आहेत का,तूम्हाला अनुभव आला असेल तर ते पण सांगा,
बर याच्या जोडीला माझा अजून एक मित्र म्हणाला आमच्या एका ठिकाणी पण बहूतेक सोने आहे पण त्याच्यावर केस चालू आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाहीत..आता कोणती जागा आहे ते विचारू नका..त्याने चेष्टेत म्हंटले होते.
या सर्व गोष्टी काल्पनिक असू शकतात याच्यावर विश्वास किती ठेवायचा ते तूम्ही तूमच्या बुध्दीचा वापर करून ठरवा..मी फक्त आमच्यात झालेला संवाद तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक : राम ढेकणे