जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून)
बाय डिफॉल्ट ह्या परीक्षांमध्ये बहुतेकजण फेल होणार हे आधीच ठरलेलं असतं. म्हणजे बघा, साधारण दहा लाख परीक्षार्थी यूपीएससीचे फॉर्म भरतात, मेन्सला दहा हजाराच्या आसपास जातात, इंटरव्ह्यूला अडीच एक हजार आणि फायनल रिझल्ट येतो सातशे ते आठशे जणांचा! कारण जागाच तेवढ्या असतात, त्यातले साधारण 180 आईएएस, तितकेच आयपीएस आणि बाकीचे मग फेमलेस पोस्ट घेऊन आयुष्यभर कुढत बसतात. त्यात परत केडर सिस्टीममुळे एकदा एका राज्यात पोस्टिंग झाली, की आयुष्यभर त्याच राज्यात जॉब करावा लागतो. म्हणजे एकदा तुम्ही कश्मीर किंवा नॉर्थ-ईस्ट ला जॉईन झाले, तर आयुष्यभर तिथेच सर्विस करावी लागते, तिथेच राहावं लागतं. फार्फार तर शेवटी दिल्लीला मंत्रालयात सेक्रेटरी वगैरे होत येतं. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचं देखील असंच गणित आहे.
दुसरी एक चिऊताईगिरी म्हणजे जी यूपीएससी आणि एमपीएससी दोन्हीने करून ठेवलीय. ती म्हणजे मोक्कार वयं वाढवली. यूपीएससीने 38 पर्यंत आणि एमपीएससीने पार 43 पर्यंत! म्हणजे पोरांनी आयुष्य ह्यातच घालावं, पण सरकारला प्रश्न विचारू नये, हा सरकारचा चुध्द्द (पक्षी: शुद्ध) हेतु. या फालतूपणामुळे पोरं वर्षानुवर्ष पोस्ट नंतरच्या जीवनाचं स्वप्नरंजन करत, आशेवर जगतात मग त्यातले 99.99% बाय डिफॉल्ट घरी जातात, किंबहुना जावंच लागतं त्यांना. असो. भरपूर मोदीअवलोकन (पक्षी: सिंहावलोकन) झालं. तर मुद्दा असा आहे की कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही वृषण पाणावनार्या कथा सांगितल्या, क्लास वाल्यांनी कितीही स्वप्नांचा बाजार मांडला किंवा मोटिवेशनल स्पिकर वाल्यांनी कितीही ‘नेव्हर गिव्ह अप’ चे तारे तोडले, तरी उगाच मेंढरांगत पोरांनी या क्षेत्राकडे येऊन स्वतःची आणि घरच्यांची वाट लावू नये. त्यापेक्षा खाजगी क्षेत्रात नोकरी, स्वतःचा एखादा उद्योग-धंदा किंवा शेती व निगडीत क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे. कला-काम-क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी आहेतच. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट तयार करून कुठल्याही आयएएस अधिकार्यापेक्षा जास्त फेमस होता येतं आणि समाजावर प्रभाव टाकता येतो.
मी आत्ताच “पीटर थील’ ह्या लेखकाचं एक ‘झिरो-टू-वन” नावाचं एक पुस्तक वाचलं. त्यात लेखकाचं म्हणणं आहे की माणसाने झिरो-टू-एन काम करावं. म्हणजे माणसाने असं काम निवडावं ज्यात तुम्ही फेल जरी झाले तरी झिरो व्हायला नको. जसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत होतं. एक तर हिरो नाहीतर डायरेक्ट झिरो. समजा तुम्ही एखादा उद्योग सुरू केला आणि त्यात तुम्ही ठरवलं, की एका वर्षात मी दहा लाख रुपये कमावणार. आणि जर तुम्ही ते टार्गेट अचिव्ह करण्यात फेल झाले आणि तुम्ही 10% टार्गेट जरी अचिव्ह केलं, तरी तुम्ही एक लाख कमावणार. म्हणजे झिरो पेक्षा चांगल्या स्थितीत राहणार. त्याच ठिकाणी तुमची पोस्ट निघाली नाही तर तुम्ही झिरो होणार.
तर मुद्दा असा आहे काहीतरी प्रॉडक्टीव क्षेत्र निवडा. उगाच भाकाळ लोकांची, भाकाळ भाषणं ऐकूण आपल्या स्वप्नांची दिशा ठरवू नका. कसं आहे, माणूस एकदा यशस्वी झाला की, त्याने काही फेकलं तरी समाज ते खरं मानतो. विस्टन चर्चिल म्हणतातच “Nothing Succeed like success” यशासारखे यश नसते! देशाला चांगल्या उद्योजकांची, कलाकारांची, तंत्रज्ञांची, शेतकऱ्यांची गरज आहे. म्हणून आपल्या आवडी-निवडी नुसार क्षेत्र निवडा. आणि आपल्या आवडीनिवडी का निर्माण झाल्या ते सुद्धा तपासून बघा. त्या खरंच आपल्या आवडी आहे की, कुठल्यातरी सामाजिक प्रेशर मुळे म्हणा किंवा स्टेटस मुळे म्हणा त्या तुमच्या आवडी झाल्या आहेत ते बघा. मी पण बघतोय. तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या जमतात, ज्या गोष्टीत आनंद देतात; अशा गोष्टी केल्या तर चांगलं यशस्वी होता येतं. उगाच लोकं इज्जत देताय म्हणून अधिकारी व्हायच्या मागे लागू नका. “लोकं आधी घोडीवर बसवतात, आणि मग घोडा लावतात”! आयुष्य खूप छोटं आहे. त्यात आयुष्याची एवढी वर्ष एका गोष्टीच्या मागे घालवण्यात काही अर्थ नाही. उठा, जागे व्हा आणि सरकार किंवा सरकारी व्यवस्थांच्या नादी लागू नका. लोकशाही सरकार ही मुळातच एक अनप्रॉडक्टीव आणि इनइफीसीएंट सिस्टीम आहे. विल्सन नावाचा एक लोकशाही समर्थक ब्रिटिश विचारवंत सुद्धा म्हणला होता की “We accepted democracy only because, it is a relief from autocratic rule, it is not a perfect system”! तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही चांगले बदल घडत आहेत ते खाजगी क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे, त्यातल्या मुक्तपनामुळे. सरकार ही व्यवस्था मुक्त पणाला अडथळा असतो. तिचा कंट्रोल हा कमी-कमी होत गेला पाहिजे. असो. म्हणून खाजगी घुसा क्षेत्रात पण. ओल्ड-राजेंद्रनगर व पेठेतल्या आधीच माजलेल्या लोकांचे घरं भरणं बंद करा. एवढे बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो!
जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून)
जय स्वर्गीय कारण!