भ्रमंती

लातुर जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे

लातुर जिल्हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध अणि सुंदर शहर म्हणून ओळखला जातो.लातुर जिल्हयात अनेक पाहण्यासारखी ऐतिहासिक मंदीरे तसेच सुंदर पार्क देखील आहेत.

आजच्या लेखात आपण लातुर जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

गंजगोलाई –

गंजगोलाई हे लातुर मधील देवी जगदंबेचे मंदिर आहे जे फयाजुददीन यांनी डिझाईन केले आहे.गंजगोलाई हे लातुर शहरा मधील सर्वात ऐतिहासिक बांधकाम म्हणून ओळखले जाते.

गंजगोलाई ही दोन ते तीन मजली इमारत आहे जिच्या मध्यभागी मुख्य देवतेचे मंदिर दिसुन येते.शहराच्या मध्यभागी स्थित असलेल्या मंदिरात भाविकांना सोळा वेगवेगळ्या मार्गाने दर्शनासाठी जाता येते.

वडवाल नागनाथ बेट –

लातुर शहरापासून ४० किलोमीटर इतक्या अंतरावर वडवाल नागनाथ बेट आहे.हे लातुर मधील अत्यंत लोकप्रिय बेट आहे.

ह्या ठिकाणी पर्यटकांना नयनरम्य वातावरणाचा अनुभव घेता येईल तसेच आयुवेर्दात वापरल्या जात असलेल्या वनस्पती तसेच आजुबाजुला असलेल्या हिरवळ इत्यादींचा आनंद घेता येईल.

बालाजी मंदिर –

बालाजी मंदिर हे लातुर जिल्हयामधील अवसा शहराजवळ आहे.हे मंदीर डोंगर परिसरात असलेले आपणास दिसून येते.

दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ह्या मंदिरात महाप्रसाद वाटप केला जातो.हिवाळयात आॅक्टोंबर ते जानेवारी महिन्यात अनेक पर्यटक ह्या मंदिराला भेट देण्यासाठी इथे येतात.

हजरत सुरतशाली दर्गा –

हजरत सुरतशाली दर्गा मध्ये संत सैफुल्ला शहा यांची दर्गा आहे.

ही दर्गा चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या अत्यंत नजीक आहे.जुन जुलै महिन्यात ह्या दर्गाच्या उरूसात हिंदू मुस्लीम भक्त मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करताना दिसुन येतात.

नाना नानी पार्क –

लातुरमधील नाना नानी पार्कला विलासराव देशमुख उद्यान ह्या नावाने देखील ओळखले जाते.

लातुर मधील हे एक सुंदर अणि शांत पार्क आहे जिथे आपण आपल्या मित्रांसोबत तसेच कुटुंबासोबत भेट देण्यासाठी जाऊ शकतो.

लातुर जिल्ह्यातील अनेक पर्यटक ह्या नानी नाही पार्कला भेट देण्यासाठी इथे येतात.

उदगीर किल्ला –

लातुर मधील उदगीर किल्ला बाराव्या शतकाच्या इतिहासातील दोन मुख्य घटनांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

सदाशिवराव अणि निजाम यांच्या अधिपत्याखाली मराठयांमध्ये झालेली लढाई,अणि लढाईनंतर उदगीर करारावर सही करण्यास आली होती.

उदगीर किल्ल्याचे नाव उदयगिरी महाराज यांच्या नावावरून उदगीर असे ठेवण्यात आले आहे.

वृंदावन पार्क –

वृंदावन पार्क हे ठिकाण लातुर शहरापासून ३५ किलोमीटर इतक्या अंतरावर लातुर नांदेड महामार्गावर साकोर येथे स्थित वाॅटर पार्क आहे.

वृंदावन पार्क मध्ये पर्यटकांना करमणुकीची अनेक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.इथे पर्यटकांना बोटींग देखील करता येईल.

महाराष्ट्र राज्यातील अनेक पर्यटक लातुर मध्ये आल्यावर आवर्जुन ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.

खरोसा लेणी-

खरोसा लेणी-ही लातुर जवळील एक अत्यंत लोकप्रिय लेणी आहे.

खरोसा गावाजवळ असलेली खरोसा लेणी लातुर मधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जाते.पर्यटन अणि इतिहास प्रेमींसाठी ही लेणी खुप आकर्षक मानली जाते.

खरोसा लेणी ह्या ठिकाणी आपल्याला एकुण बारा लेण्यांचा समूह पाहायला मिळतो.येथील भिंतींवर भगवान बुद्ध यांचे चित्र देखील आहे.

लातुर शहरापासून ४५ किलोमीटर इतक्या अंतरावर खरोसा लेणी आहे.

हत्ती बेट देवदर्जन –

हत्ती बेट देवदर्जन हे लातुर मधील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.लातुर मधील उदगीर शहराजवळ एक किलोमीटर इतक्या अंतरावर हे पर्यटन स्थळ आढळून येते.

ह्या ठिकाणी पर्यटकांना प्राचीन मंदिरे,लेण्या,शिल्पकला कोरीव काम इत्यादीचा अनुभव घेता येतो.लातुर मध्ये भेट देण्यासाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.

हत्ती बेट देवदर्जन वर गंगाराम महाराज यांची समाधी देखील आपणास पाहावयास मिळते.

औसा किल्ला –

औसा किल्ला लातुर मधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो.

चौरस आकारात बांधण्यात आलेला हा किल्ला बहामणी काळानंतर प्रसिद्ध झाला होता.मग नंतर हा किल्ला मलिक अंबर याने त्याच्या ताब्यात घेतला होता.

जवळपास १२० फुट खोल खंदकांनी ह्या किल्ल्याची बांधणी करण्यात आली आहे.

विराट हनुमान मंदिर –

विराट हनुमान मंदिर मध्ये २५ फुट उंचीची हनुमानाची मूर्ती दिसुन येते.मुर्ती आकाराने मोठी आहे अणि लाल रंगाच्या सेंद्रिय रंगात ही हनुमानाची मूर्ती रंगवण्यात आली आहे.

मंदीरात असलेली हनुमानाची मूर्ती अत्यंत स्थित अणि शांत दिसून येते.मुर्तीने एकीकडे गदा धारण केला आहे अणि कमरेवर हात देखील आहे.

काॅक्रेटमुळे बांधण्यात आलेले दोन मोठे कृत्रिम दिवे याठिकाणी आहे.मंदिराच्या परिसरातील सर्व वातावरण अतिशय आनंददायी स्वरुपाचे आहे.

सिद्धेश्वर अणि रधेश्वर मंदिर –

सिद्धेश्वर अणि रधेश्वर मंदिर हे लातुर शहरापासून फक्त दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

रामलिंगेश्वर, केशवराज,राम दत्तात्रय मंदिर इत्यादी सर्व मंदिरे आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरात दिसुन येतात.

लातुर शहरातील प्राचीन संस्कृती परंपरेस हे मंदिर जोडण्याचे काम करते.हे मंदिर सोलापूर येथील भगवान सिद्धेश्वर स्वामी सिद्धराम यांना समर्पित करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button