खेळ

India’s biggest victory | भारताचा सर्वात मोठा विजय

तिसरी कसोटी इंग्लंडचा 434 गावांनी उडवला धुव्वा जडेजा ठरला अष्टपैलू.
इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या दीड सत्रामध्ये गुंडाळताना भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत आपला सर्वात मोठा विजय मिळवला. इंग्लंडचा 434 धावांनी धुव्वा उडवत भारताने(India’s biggest victory) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी महत्वपूर्ण आघाडी केली सामन्यात एक शतक आणि सात बळी घेतलेला रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.

दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या तडाकेबंद नाबाद द्विशतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव चहा पाण्याच्या सुमारे एक तास आधी 98 षटकात चार बाद 430 धावांवर घोषित करून इंग्लंडला 557 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या आव्हानाच्या ओझ्याखाली दडपून गेलेल्या इंग्लंडला 39.4 षटकात केवळ 122 धावांवर गुंडाळले इंग्लंड किमान पाचव्या दिवसापर्यंत झुंज देईल अशी अपेक्षा होती परंतु भारतीयांच्या अचूकतेपुढे त्याने सपशेल शरणागती पत्कारली. रवींद्र जडेजा ने 41 धावात पाच बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कुलदीप यादव ने दोन तर जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेत जडेजाला चांगली साथ दिली.

इंग्लंडकडून अष्टपैलू मार्क वूडने सर्वाधिक नाबाद 33 धावांची झुंज दिली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. भारतीयांनी इंग्लंडचा अर्धा संघ 50 धावांमध्ये गारद करत सामन्याचे निकाल स्पष्ट केला.

त्याआधी 2 बाद 196 धावावरून सुरुवात केलेल्या भारताकडून यशस्वी जैस्वालने रविवारचा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी शतक झळकल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला परंतु शुभमंगल शतकापासून नऊ धावांनी दूर असताना बाद झाल्यानंतर जैस्वाल पुन्हा मैदानात आणि इंग्लंडच्या गोलंदाजाचा समाचार घेतला गिलने 151 चेंडू 9 चौकार व दोन षटकारसह 91 धावांची खेळी केली यानंतर जयस्वाल ने अखेरपर्यंत नाबाद राहताना 236 चेंडू 14 चौकार आणि बारा विक्रमी षटकरांसह 214 धावांची खेळी केली.

Laptop Yojana एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना २०२४ विषयी माहिती One Student One Laptop Yojana 2024  information in Marathi

कुलदीप यादव नेही 91 चेंडू तीन चौकार आणि एक षटकारसह 27 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर जैस्वाल आणि सरफराज खान यांनी भारताला भक्कम स्थितीत आणताना सहाव्या गड्यासाठी 198 चेंडूत नाबाद 172 धावांची भागीदारी केली. सरफराज ने ७२ चेंडू सहा चौकार व तीन षटकारांसह नाबाद 68 धावांचा तडाखा दिला. यासह कसोटी पदार्पणात दोन्ही डावांमध्ये पन्नास हून अधिक धावांची खेळी करणाऱ्या सर्फराज चौथा भारतीय ठरला तसेच यशस्वीनेही कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा भारतीय विक्रमही नोंदवला(India’s biggest victory) भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवून इंग्लंडच्या बेसबॉल शैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल शुभमंगल सरफराज खान यांनी शानदार फलंदाजी केली पुढील सामन्यातही भारताकडून विजयाची अपेक्षा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button