खेळ

India’s batting lineup | रोहितच्या फलंदाजीसह मधल्या फळीची चिंता कायम

विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात युवा भारतीय संघ बेसबॉल रणनीती बोथट करण्यास सज्ज झाला आहे. गुरुवारी सुरू होत असलेल्या या सामन्यात भारताला निर्भीड आणि चाणक्य खेळण्याशिवाय मधल्या फळीतील(India’s batting lineup) उनिवा दूर सारण्याविषयी तोडगाही शोधावा लागणार आहे.

Edible Oil import | खाद्य तेलाची आयात आता बास

पाच वर्षांनंतर राजकोट शहरात कसोटीचे आयोजन होत असल्याने उत्साह शिगेला असताना पाहुण्या संघाने एक दिवस आधी अंतिम एकादशीची घोषणा करीत चेंडू यजमानांच्या कोर्टात ढकलला. इंग्लंडने हैदराबाद कसोटी जिंकून आघाडी घेतली तर भारताने विशाखापटनम मध्ये चौथ्या दिवशी विजय नोंदवून पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली. यशस्वी जयस्वाल (321 धावा) आणि जसप्रीत बुमराह (15 बळी) यांनी शानदार कामगिरी केली तरी मधल्या फळीची चिंता कायम आहे.

आता भारतीय संघाच्या विजयात योगदान देण्याची मोठी जबाबदारी युवा खेळाडूंवर असेल. आठ दिवसांच्या ब्रेक आधी रोहितचा फॉर्म चिंतेत भर घालणारा होता. बुधवारी सरावा दरम्यान गोलंदाजीची दोन वेळा कर्णधाराला बाद केल्यामुळे व्यवस्थापन आणखीच अडचणीत आले आहे. तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

राहुल ऐवजी मुंबईचा सरफराज खान कडे पदार्पणाची संधी असेल असे झाल्यास तो रजत पाटीदारच्या सोबतीने मधल्या फळीची जबाबदारी सांभाळेल. भारताच्या मधल्या फळीत असलेली अनुभवाची कमतरता इंग्लंडला माहीत असल्याने आक्रमक खेळाच्या बळावर पाहुण्यांनी अपेक्षित निकाल बाजूने वळविला होता.

एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi

श्रीकर भरत सतत अपयशी ठरत असल्याने त्याच्या जागी उत्तर प्रदेशचा 23 वर्षांचा यष्टिरक्षक- फलंदाज ध्रुव जुरेल याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जुरेल आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असून त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यात 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.बीसीसीआयने दोन भारतीय खेळाडू कसोटीत कारकिर्दीला सुरुवात करतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.

India's batting lineup
India’s batting lineup

खेळपट्टी कशी असणार ?

राजकोटची खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला अनुकूल असेल असे वाटत नाही. स्थानिक खेळाडू चेतेश्वर पुजारा निवडकर्त्यांच्या योजनेत सहभागी नाही दुसरा स्थानिक खेळाडू अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्याकडून मात्र मोठ्या अपेक्षा असतील.

पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांची स्थानिक फिरकीपटूंच्या तुलनेत सरस कामगिरी केली तरीही या मालिकेत वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी वाटत आहे दोन्ही सामन्यात जसप्रीत बुमराह ने इंग्लिश फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते.

राजकोटची खेळपट्टी पारंपारिक दृष्ट्या फलंदाजीला पूरक ठरते भारतीय संघात कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल अक्षर फलंदा जीतही उपयुक्त ठरत असल्याने त्याचे पारडे जड वाटते रविचंद्रन अश्विन चे 499 बळी असल्याने 500 च्या क्लब मध्ये सहभागी होण्याची त्याला संधी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button