मनोरंजन

गुलजार की शायरी जिंदगी | गुलजार यांचे कवितेचे जीवन

गुलजार ही व्यक्ती आयुष्यात कधी आली आता आठवतही नाही. ‘लकड़ी की काठी,’ ‘जंगल जंगल बात चली है, चड्डी पहेन के फूल खिला है’ – वगैरे पासून गुलजार (गुलजार की शायरी जिंदगी) साहेबांनी लिहिलेले शब्द बहुदा कानावर पडायला लागले असावेत. पुढे मग त्यांनी लिहायचं आणि आपल्यासाठी ते ब्रह्मवाक्य व्हायचं हे जणू पक्कंच झालं. आधी फक्त गाण्यांतून भेटलेले गुलजार नंतर ‘रावीपार’ मधल्या कथांतून भेटले. मध्येच कधी तरी त्यांच्या सिनेमांतून… पुढे पुन्हा ‘रात पश्मीने की’, ‘पुखराज’ आणि ‘त्रिवेणी’ मधुन भेटले. त्यांचं त्यावेळी धरलेलं बोट हातातून कधीही सुटलं नाही.

The Sweetness of Bengal Hemant Kumar (part-1) | बंगाली मिठाईची मिठास – हेमंत कुमार

अतीव आनंद, दुःख, नैराश्य, चिडचिड, भिती, प्रेम, हार्टब्रेक असा आपला प्रत्येक ‘मूड’ कुणाला कळत असेल, तर तो गुलजार साहेबांनाच असं कितीदा वाटलंय त्याची काही मोजदाद नाही. एखाद्या प्रसंगात ‘मला नेमकं हेच वाटतंय… हेच म्हणायचंय… this exact feeling!’ हा अनुभव गुलजार साहेबांनी आतापर्यंत असंख्यवेळा दिलाय.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गुलजार ऐकताना ‘हे आपल्यासाठीच लिहिलंय!’ हे अनेकांच्या मनावर ठसवणं त्यांना एवढं बेमालुम साधुन गेलंय की ‘गुलजार (गुलजार की शायरी जिंदगी) एक्सक्लुसिव्हली आपल्यासाठीच लिहितात!’ यावर ठाम श्रद्धा असलेले किमान दोन लाख डझन तरी लोक अगदी सहज सापडतील.

गुलजार की शायरी जिंदगी

तशातच कधीतरी निर्वासित म्हणून पाकिस्तानातूनच आलेल्या लायब्ररीवाल्यानं आपल्या पसंतीचं एक पुस्तक वाचायला देणं… त्या पुस्तकामुळे रवींद्रनाथ टागोर (टॅगौर… ॲज गुलजार साहाब कॉल्ज हिम) ही व्यक्ती आयुष्यात येणं… संपूरण सिंह कालराच्या आयुष्याला इथं टर्निंग पॉईंट मिळणं… आणि ‘गुलजार’ म्हणून तो पुढे जगभर ख्यातनाम कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणं… काय आणि किती नाट्यमय असावं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य.

पूर्वी कधी तरी हे वाचलं किंवा ऐकलं होतं गुलजार साहेबांबद्दल…

कुठे ते आता आठवतही नाही त्यामुळे संदर्भ सांगता येणार नाही. पण ते खुप खुप लहान असताना त्यांची आई गेली. त्यामुळे त्यांना तिचा चेहरा आठवत नाही. पुढे कधी तरी बरोबरच्या कुणी तरी रस्त्यावरच्या एका बाईला बघुन सांगितलं – देख, ऐसी लगती थी तेरी माँ… त्या बाईचा दात सोन्याचा होता.

पुढे त्यांनी अनेकांना विचारलं, माझ्या आईचा दात सोन्याचा होता का? आई म्हणून तिचाच चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर राहिला.

हे पहिल्यांदा वाचलं किंवा ऐकलं तेव्हा खुप आत खोलवर अस्वस्थ वाटलं होतं. आत्ता हे लिहितानाही ते वाटतं आहे…

गुलजार का आवडतात या प्रश्नाच्या उत्तरादाखल किती कारणं द्यायची?

‘तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं…’ ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी हैरान हूँ मैं…’ ‘जिनके सर हो इश्क़ की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी…’ ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं…’ असं काही काळजाला हात घालणारं लिहिणारा हा मनुष्यच ‘बिड़ी जलैले जिगर से पिया, जिगरमां बड़ी आग है’ वगैरे लिहितो तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारा माणुस निव्वळ अवाक होऊ शकतो. बाकी काही बोलायची प्राज्ञाच नसते.

Hits of Gulzar

गुलजार साहेबांनी लिहिलेल्या आवडत्या गाण्यांची आठवण काढत कुठपर्यंत जायचं? माझ्या जन्माआधी ‘य’ वर्ष लिहिलेल्या, हेमंत कुमारनं गायलेल्या ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ पर्यंत मागे जायचं की अगदी अलिकडे आलेल्या ‘राझी’ मधल्या ‘दिलबरो’ पर्यंत अलिकडे यायचं?

एवढं करुन रोज ही पोस्ट एडिट करुन आवडत्या यादीत नवी भर घालता येईल एवढं या माणसानं लिहून ठेवलंय ते वेगळंच.

Gulzar Special

आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांवर त्यांनी लिहिलेली कविता असो की ‘जिंदगी क्या है जानने के लिए जिंदा रहेना जरुरी है, आज तक कोई रहा तो नहीं…’ सारखी त्रिवेणी.

काय काय आठवायचं आणि नोंदवायचं? बरं आपण कविता, गाणी लिहावीत… मोठमोठाली अवॉर्ड्स घ्यावीत आणि स्वांतसुखाय आयुष्य जगावं, तर तेही नाही…

आपल्यावर प्रेम असलेल्या माणसांची मनं जिंकत राहण्याची एक संधी म्हणून सोडत नाहीत हे सद्गृहस्थ! मागे कधी तरी त्यांनी कुसुमाग्रजांच्या मराठी कवितांचा अनुवाद केला होता.

नंतर समजलं, फक्त मराठी किंवा फक्त कुसुमाग्रज नाही, भारतातल्या ३२ भाषांमधल्या २७२ कवींच्या कविता गुलजार साहेबांनी अनुवादित केल्या आहेत. त्यांचं ‘अ पोएम ए डे’ नावाचं पुस्तकही केलंय. हे पुस्तक येण्यापूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या एका कर्टन रेझर मुलाखतीत आपल्या या प्रोजेक्ट बद्दल बोलताना ‘रिजनल लँग्वेज’ या उल्लेखाबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती.

मराठी, बंगाली, तमिळ किंवा कुठलीही भाषा

ते म्हणतात, मराठी, बंगाली, तमिळ किंवा कुठलीही भाषा ‘रिजनल लँग्वेज’ कशी? या सगळ्याच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. त्यांना ‘रिजनल’ म्हणणं म्हणजे त्यांचं अवमुल्यन करणंच.

भारतीय भाषांमधल्या कविता या भारताचा मूड दाखवणारं उत्तम माध्यम आहेत असं गुलजार (गुलजार की शायरी जिंदगी) साहेबांचं निरिक्षण…

देश कसा कसा बदलत गेला त्याचं ‘रिफ्लेक्शन’ या कवितांमध्ये असल्यामुळे त्या कालानुक्रमे लावल्या तर देशाचा प्रवास दिसेल असंही ते सांगतात. लिहिण्यासाठी ‘एक्सरसाईज’ म्हणून काय करता असं कुणी तरी विचारल्यावर ‘लिखने के लिए पढ़ना ही एक्सरसाईज है…’ हे सांगतात तेव्हा वाचनाचं महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित करतात.

गटई स्टाॅल योजनेविषयी माहीती Gatai Stall Scheme Information in Marathi

स्वतः एवढी वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहिल्यानंतरही आपल्याला काय करायचंय आणि काय महत्त्वाचं याचं किती पक्कं भान होतं, आहे या माणसाला. बहुदा त्या जयपूर लिट फेस्ट इंटरव्यूमध्येच कुणी तरी त्यांना विचारलं,

तुम्ही सिनेमा करणं का थांबवलंत, पुन्हा कधी सिनेमा करणार आहात का? ते त्याच्यावर देतात ते उत्तर केवळ साष्टांग नमस्काराला पात्र आहे… सिनेमेच बनवत बसलो असतो तर पुस्तकं वगैरे काहीच घडलं नसतं.

मैं हमेशासे किताबें लिखना चाहता था, मोहब्बत तो किताबेंही थी, ये तो बस यूँ हुआ की जा तो मस्जिद की ओर रहे थे, बीच में मयखाना आया तो इस तरफ़ मुड़ गए… लेकिन जाना मस्जिद की ओर ही था, तो मस्जिद जाने के लिए मयखानेसे वापस आए, अब फिरसे मयखाने नहीं जाना!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button