मनोरंजन

The Sweetness of Bengal Hemant Kumar (part-2) | बंगाली मिठाईची मिठास – हेमंत कुमार

फिल्मिस्तानच्या पहिल्या दोन सिनेमात हेमंत कुमारना(The Sweetness of Bengal Hemant Kumar ) यश मिळालं. पण ते घवघवीत यश नव्हतं. त्यात त्यांना मुंबई मानवेना. त्यांनी कलकत्त्याला परत जायचं ठरवलं. शशधर मुखर्जी त्यांना म्हणाले ” तू मला एक मोठा हिट दे. मग कलकत्त्याला जा. नियतीने तथास्तु म्हटलं.

त्यांना हेमंतकुमारने नागिन हा सुपर डुपर हिट सिनेमा दिला. खरंतर त्या सिनेमात हेमंतदादांच संगीत आणि आमची लाडकी वैजू म्हणजे वैजयंतीमाला सोडून काय होते?
नागिन या विषयावर पुढे अनेक सिनेमा आले. पण 1954 च्या नागिन च्या गुडघ्याएवढं यश सुद्धा त्यांना कधी मिळालं नाही. नागीनची गाणी सतत दोन वर्ष चार्ट टॉपर होती. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं अवॉर्ड त्यांना मिळालं. लतादीदी म्हणतात “नागिन नंतर मला माझी खरी व्यावसायिक किंमत कळली. त्याचं संगीत गाजण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यातली ती नागिनची बिन. नागिण आली म्हणजे पुंगी आली. हेमंतदादांनी आधी खऱ्याखुऱ्या पुंगीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून फक्त तीन-चार सूर निघत. त्यामुळे मग त्यांनी क्ले व्हाॅयलिन चा उपयोग केला. ते वाजवलं होतं कल्याणजीनी. आणि त्यात रवीने तबला मिक्स केला. आणि मग फक्त नागच नाही तर माणसं सुद्धा “मन डोले मेरा तन डोले” या गाण्यावर डोलायला लागली.

बंगाली मिठाईची मिठास – हेमंत कुमार

खरं तर नागिन मधल्या प्रत्येक गाण्यावर लोकं डोलली. शशधर मुखर्जीने हेमंत दादांना सांगितलं होतं काहीतरी वेगळं कर. आजच्या संगीतातील तोच तोच पणा संपवून टाक. हेमंतदानी क्ले व्हाॅयलीन चा वापर केला. त्यावेळी हेमंत कुमार आणि कल्याणजी हे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करत. एकदा नागपूरच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली. लोकांनी डिमांड केली बिन हवी आहे. कल्याणजीने क्ले व्हाॅयलिन वाजवायला सुरुवात केली. लोकं चिडले. हेमंत दादांना कळेना अचानक लोकांना काय झालं. त्यावर लोकांनी सांगितलं बिन तोंडाने वाजवतात हा बोटाने का वाजवतो? कारण लोकांना वाटत होतं की ती पुंगीच आहे. नागिन हा सिनेमा हेमंत दादांच्या कारकिर्दीचा कांचनगंगा शिखर ठरला.

हेमंतदा(The Sweetness of Bengal Hemant Kumar ) यांच्या नागिन नंतर कल्याणजी संगीतकार बनले.
रवी सुद्धा आधी हेमंतकुमारांचे सहाय्यक होते. तेही स्वतंत्रपणे नंतर संगीत द्यायला लागले. कल्याणजी आणि हेमंतदा यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे होते. हेमंत दा नेहमी म्हणत “कल्याणजीना बरोबर घेऊन प्रवास करणं हा धमाल अनुभव असे. त्यांच्याकडचा जोक्सचा साठा अर्जुनाच्या अक्षय भात्यासारखा होता. अतिशय आनंदी असं ते व्यक्तिमत्त्व.तो कधी काम करत आहे असं वाटायचं नाही. तो धमाल करतोय असंच वाटायचं. पण धमाल करता करता त्यांनी काही उत्कृष्ट गाणी दिली.

त्यातलं हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांच’ ओ निंद न मुझको आये’ हे गाणं कोण विसरेल? पोस्ट बॉक्स नंबर ९९९ या सिनेमात ते सुनील दत्त आणि शकीलाने अभिनित केलं होतं.

हेमंत कुमार यांना सी रामचंद्र यांनी सुद्धा काही चांगली गाणी दिली उदाहरणार्थ जाग दर्दे इश्क जागं किंवा जिंदगी प्यार की दो चार घडी होती है .

हेमंत कुमार सी रामचंद्र यांना प्रचंड मानत फार मोठी गुणवत्ता असलेला संगीतकार असं त्यांचं अण्णांबद्दल मत होतं.

The Sweetness of Bengal Hemant Kumar (part-1) | बंगाली मिठाईची मिठास – हेमंत कुमार

अण्णा एका मिनिटात अचानक एखादी चाल बनवत, ती सुद्धा हसत हसत, विनोद करत, असं हेमंत कुमार म्हणत. अनारकलीची चालही त्यांना अशीच पटकन सुचली. हेमंत कुमार यांना अण्णांच ‘ शिंन शिनाकी बूबुला बु सिनेमातल ‘ तुम क्या जानो तुम्हारी यादमे हम कितना रोये ‘ हे गाणं एव्हढं आवडलं की त्यांनी ती चाल बंगाली गाण्यात वापरली. तो चित्रपट होता ‘सूर्य तोरण’ आणि गाणं होतं ‘ तुमी तो जानो ना ‘ हेमंतकुमारना नौशाद , रोशन,आणि शंकर जयकिशनने सुद्धा काही गाणी दिली. पतीता मधलं एक नितांत सुंदर प्रेमगीत आठवतं?
” याद किया दिलने कहां हो तुम” बर्मन दादां प्रमाणे शंकर जयकिशन यांना सुद्धा देव आनंदला हेमंत कुमारचा आवाज द्यावा असं वाटलं.
रोशन ने सुद्धा हेमंत कुमार यांना एक अप्रतिम गाणं ममता चित्रपटात दिलं.
” छुपालू यू दिलमें प्यार तेरा ” पण सिनेमात ते गाणं अर्धवट आहे का ठाऊक आहे?
कारण दिग्दर्शकाला वाटलं ते अर्ध गाणंच चांगलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या गाण्यांची माती केली आहे. त्यातलं हे एक.

स्नेहल भाटकर ह्या मराठी संगीतकाराने छबिली सिनेमात एक सुंदर गाणं हेमंत कुमार यांना दिलं.
” लहरों पे लहर उलफत है जवाॅ”
भाटकर स्वतः कबूल करतात की त्या गाण्याची चाल डीन मार्टींनच्या एका इंग्लिश गाण्यावरून घेतली आहे.
गुरुदत्त याचा साहब बीबी और गुलाम हा बंगाली पार्श्वभूमीवरचा

आणि जमीनदारीवरचा सिनेमा खरंतर एस .डी बर्मन यांच्या पारड्यात जायचा होता. पण तो हेमंतदांकडे गेला. आणि गुरुदत्तची निवड योग्य ठरली. त्यातली सगळीच गाणी ग्रेट होती .

मग आशाने लाडिकपणे गायलेलं, ” भवरा बडा नादान है असो किंवा गीता दत्तच, ” न जाओ संय्या चुराके बय्या “

महिला उदयोगिनी योजनेविषयी माहीती Mahila Udyogini Scheme Information In Marathi

सिनेमात गुरुदत्त याला जमीनदाराची छोटी बहु म्हणजे गुलामांच्या मिठीत दाखवायची होती. त्याने तो शॉट शूट केला. पण सेन्सॉरने सांगितलं, ” जमीनदाराची बायको गुलामांच्या मिठीत दाखवता येणार नाही”
त्या शॉट बरोबर एक गाणं होतं. गुरुदत्तने ते रद्द केलं. ती ट्यून त्याने अनुपमा मध्ये वापरली. ते गाणं धर्मेंद्र पेश करतो तेंव्हा अंगावर येतं. ते गाणं होतं.
” या दिलकी सुनो दूनियावालो “
तसंच त्यांचं एक गाणं एखाद्या विषण्ण मूड मध्ये दिवे मंद करून ऐकावसं वाटत. ते आहे बादबान चित्रपटातलं
” कैसे कोई जिये. जहर है जिंदगी “ऊठा तुफान हो”

हेमंत कुमार निर्माता लेखक सुद्धा होते. त्यांना हॉरर सिनेमाची आवड होती. म्हणून त्यांनी, बिस साल बाद, कोहरा सारखे सिनेमा काढले. आणि यशस्वी झाले.
लतादीदी यांनी त्यांची गूढ गीतं अजरामर केली
उदा.” कही दीप जले कही दिलं
लता मंगेशकर आणि त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. कही दीप जले गाण्याच्या वेळी विष बाधा झाल्याने पुन्हा गाता येईल की नाही ह्या भीतीने दिदीचा आत्मविश्वास गेला होता. हेमंतदानी त्यांना धीर देऊन हे गाणं गाऊन घेतलं .
हेमंतकुमार यांच्या चाली सोप्या असत.ऑर्केस्ट्रा सुद्धा कधी जड नसे . मेलडी हा त्यांच्या संगीताचा आत्मा होता. धीरे धीरे मचल, हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण.
त्यांनी आमचे कान तृप्त केले. त्यांच्या आवाजाने, संगीताने आणि १९८८ साली ते अमर संगीत पृथ्वी वर सोडून निघून गेले.
पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी गुणगुणत राहिली आणि पुढेही राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button