वेबसाईट काय आता व्हीआयपी नंबर होत आहेत हॅक
वेबसाईट मोबाईल हॅक करून लाखो रुपये हडप करण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांच्या जगताप सामान्य झाले .आता हॅकर्स कडून हौशी लोकांकडे व्हॅनिटी किंवा व्हीआयपी मोबाईल नंबर हॅक(वेबसाईट काय आता व्हीआयपी नंबर होत आहेत हॅक) केले जात असल्याच्या धक्कादाय घटना समोर येत आहेत.
लाखो रुपये किमतीचे हे क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर स्पोर्ट आउट केले जात आहेत विशेष म्हणजे त्यानंतर ते क्रमांक थेट पर राज्यात सुरू होत आहे शहरासह राज्यातील इतरही शहरात अशा घटना निदर्शनास आल्या आहेत.
संभाजीनगर येथील उस्मानपुरातील 43 वर्षीय कापड व्यवसायिकाकडे बीएसएनएल कंपनीचा एक व्हीआयपी क्रमांक होता गेल्या बारा वर्षापासून तो क्रमांक वापरत होते फार वापर नसला तरी ते क्रमांक सुरू ठेवण्यासाठी रक्कम भरत होते काही दिवसांपूर्वी तो क्रमांक अचानक बंद पडल्याचे त्यांचे निदर्शनास आले कंपनीकडे विचारपूस केल्यावर त्यांना धक्काच बसला व्हीआयपी क्रमांक परस्पर जिओ कंपनीत पोर्ट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले तो क्रमांक सिनखेडराजाच्या ग्राहक सेवा केंद्रातून पोर्ट आऊट करण्यात आला व्यवसायिकाने त्यासाठी कुठलीही प्रक्रिया पार पाडली नव्हती त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली बँक.
व्यवहारासाठी देखील वापर
पीएम श्री योजना सरकारी शाळा़ंचा विकास Pm Shree School Scheme Information in Marathi
हॅकर्स फिशिंग द्वारे क्रमांक धारकाची बँक खात्याच्या माहितीद्वारे मोबाईल क्रमांक मिळवतात. त्यानंतर मूळ सिम ब्लॉक करण्यासाठी बनावट कागदाम कागदपत्रांसह मोबाईल ऑपरेटरच्या रिटेल आउटलेट मध्ये अर्ज करतात. पडताळणी नंतर मूळ कार्ड धारकाचे सिम कार्ड निष्क्रिय केले जाते परिणामी तक्रारदार व्यक्तीला नवीन सिम कार्ड प्राप्त होते अनेकदा बँक खात्यातील व्यवहारांसाठी देखील हे नवीन सिम वापरले जाते.
ठराविक नेटवर्क कंपनीबाबत हे प्रकार होत आहे सिम बंद आढळल्यास गैरवापराची शक्यता असते सिम कार्ड लॉक झाल्यास नोव्हेलेड संदेश आल्यास तत्काळ सर्विस प्रोव्हायडरकडे संपर्क साधा व्हीआयपी क्रमांक असल्यास त्याचा सातत्याने वापर सुरू ठेवा असे सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल सातोतकर यांनी सांगितले.
डेबिट क्रेडिट कार्ड वापरता? वीस मागे पाच जणांची फसगत
बीडच्या डॉक्टर सोबत प्रकार
बीडच्या दोन डॉक्टरांसोबत असाच प्रकार घडला दोघांकडे व्हीआयपी मोबाईल क्रमांक होता मात्र दीड महिन्यापूर्वी सिम नेटवर्क चालले गेले तांत्रिक कारण असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले मात्र 48 तास उलटल्यानंतरही नेटवर्क न आल्याने त्यांनी कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांचा क्रमांक त्यांचा राहिलाच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना सांगण्यात आली.
क्रमांकाची हाऊस लाखोंची किंमत
व्हीआयपी व चॉइस नंबर साठी अनेक जण लाखो रुपये मोजण्यास तयार असतात व्हीआयपी क्रमांक (वेबसाईट काय आता व्हीआयपी नंबर होत आहेत हॅक)विकणाऱ्या अनेक वेबसाईट देखील उपलब्ध आहेत शिवाय टेलिकॉप कंपन्यांकडून ठराविक कालावधीनंतर व्हीआयपी क्रमांकाचा लिलाव देखील होतो.
नेमके कसे होते हॅक
१. सिम कार्ड स्वाइपिंग क्लोनिंगच्या मदतीने एखादी व्यक्ती तुमच्या सिम कार्डचा ॲक्सेस मिळू शकते.
२. या सिम कार्ड स्कॅन मुळे तुमची खाजगी माहिती देखील त्यांच्या हाती लागते.
३. सायबर गुन्हेगार व्हीआयपी क्रमांकाची यादी मिळवतात तो सुरू आहे की नाही याची खात्री करतात
४. क्रमांकाचा फार वापर नसल्यास ग्रामीण भागात तोच क्रमांक हरवल्याची तक्रार करतात बनावट आधार कार्डचा वापर करून त्याच क्रमांकाच्या नव्या सिम कार्ड साठी अर्ज करतात.
५. सिम कार्ड प्राप्त होतात तात्काळ पोर्ट आऊट ची प्रक्रिया पार पाडून तो दुसऱ्या राज्यात लाखो रुपयांना विकतात