सामाजिक

महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी

महात्मा फुले यांच्याविषयी आपल्या भारतातील कित्येक व्यक्तींना फक्त एवढेच माहीत आहे की महात्मा फुले हे जातीने माळी होते ते फुलांचा व्यवसाय करायचे.

अणि ते भारतातील एक थोर समाजसुधारक,शिक्षणप्रेमी तसेच स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते.त्यांनीच समाजात चुल अणि मुल यापलिकडे स्वताचे कुठलेही अस्तित्व नसलेल्या स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला.त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली.

भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते.पण महात्मा फुले यांच्याविषयी काही अशा बाबी आहेत ज्या आजही फार तुरळक व्यक्तींना माहित आहेत.

आजच्या लेखात आपण महात्मा फुले यांच्या विषयी कोणालाही माहीत नाहीये तसेच फार तुरळकच लोकांना माहिती आहे अशा अनभिज्ञ महत्त्वपुर्ण गोष्टी जाणुन घेणार आहोत.

महात्मा फुले यांच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू होते हे सर्व पैलू आपण जाणुन घेऊया.

भारतातील सर्वात मोठे श्रीमंत उद्योजक,बिल्डर

महात्मा फुले हे त्याकाळी भारतातील एक खुप मोठे उद्योजक होते.

महात्मा फुले त्याकाळी रतन टाटा यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत होते.१८६९ साली टाटा ग्रुपचा वार्षिक उलाढालीचा अजुन आकडा २० हजार रुपये इतका होता.

याचकाळात महात्मा फुले यांच्या पुणा कमर्शियल इन काॅन्ट्रिक्टिंग कंपनीची फक्त मासिक उलाढाल ही २१ हजार रुपये होती.

यावरून आपणास लक्षात येईल की महात्मा फुले त्याकाळी रतन टाटा यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत होते.पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जात असे.

त्याकाळी पुणे कमर्शियल अॅण्ड काॅन्ट्रॅक्टींग ह्या कंपनीचे महात्मा फुले हे कार्यकारी संचालक होते.ही देशातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून ओळखली जायची.

हया कंपनीने धरणे,कालवे,बोगदे,पुल,इमारती कापड गिरण्या,राजवाडे इत्यादींचे भारतात भव्य असे बांधकाम केले.

यावरून आपणास लक्षात येईल की महात्मा फुले हे त्याकाळचे एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योजक,बिल्डर होते.

महात्मा फुले यांच्या कंपनीने कात्रजचा बोगदा,येरवडयाचा पुल, खडकवासला धरणाचा कालवा, मुंबई महानगरपालिका मुख्य इमारतीचे बांधकाम इत्यादी महत्त्वपुर्ण कामे पार पाडली.

महात्मा फुले हे एक राष्टनिर्माता होते त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले तसेच सत्यशोधक समाजाचे सभासद असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रात आपली मोहर उमटवुन गेले आहेत.

मुंबई महापालिकेची मुख्य इमारत,भायखळा पुल,परळचे रेल्वे वर्क शॉप, मुंबई मधील कापड गिरण्या, जलाशय, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास राजवाडा इत्यादींचे बांधकाम सत्यशोधक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

वरील सर्व कामातुन महात्मा फुले यांनी जी काही रक्कम प्राप्त केली होती ती सामाजिक कार्य करण्यासाठी मुक्त हस्ते खर्च केली.

नामवंत शेतकरी –

महात्मा फुले हे एक नामवंत शेतकरी अणि नामवंत व्यापारी म्हणून त्याकाळी प्रसिद्ध होते.

महात्मा फुले यांच्याकडे जवळपास ५०० एकरपेक्षा जास्त शेतजमिन होती.हया शेतजमीनीत ते भाजीपाला तसेच फुले पिकवायचे.अणि हा उत्पादन केलेला माल रेल्वेने मुंबई येथे घेऊन जात अणि तिथे हा सर्व माल विकत असत.

त्यांच्याकडे असलेली ही सर्व शेतजमीन तसेच त्यांची सर्व इतर सर्व संपत्ती विकून महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा स्थापण केल्या.

थोर अर्थतज्ज्ञ तसेच शेअर मार्केटचे अभ्यासक –

महात्मा ज्योतिबा फुले हे त्याकाळचे एक थोर अर्थतज्ज्ञ तसेच शेअर मार्केटचे तज्ञ तसेच अभ्यासक देखील होते.हे आजही कित्येक व्यक्तींना माहीत नाहीये.

स्वकष्टार्जित संपत्तीत केले समाजकार्य-

आपल्यातील खुप जणांना असे वाटत असेल की महात्मा फुले यांनी लोकांकडून वर्गणी गोळा करून त्यावेळी समाजकार्य केले पण असे नाहीये.

महात्मा फुले यांनी आतापर्यंत जे काही सामाजिक शैक्षणिक कार्य केली ती त्यांनी स्वताच्या पैशाने केली होती कारण महात्मा फुले यांच्या काळात वर्गणी गोळा करून समाजकार्य करण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती.

अणि महात्मा फुले हे स्वताच खुप मोठे श्रीमंत उद्योजक असल्याने त्यांना कुठलेही समाजकार्य शैक्षणिक कार्य करण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची आवश्यकता देखील नव्हती.

महात्मा फुले यांनी आतापर्यंत जे काही समाजकार्य केले ते त्यांनी आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीत पार पाडले.

नेल्सन मंडेला बराक ओबामा यांना गुलामगिरी ग्रंथांचा इंग्रजी अनुवाद भेट दिला –

महात्मा फुले हे एक समाजसुधारक उद्योजक तर होतेच तसेच ते एक उत्कृष्ट लेखक देखील होते.

महात्मा फुले यांनी गुलामगिरी,शेतकरयाचा आसुड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म असे अनेक महत्वाचे ग्रंथ लिहिले.त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे लिहिले म्हणून त्यांना शिवशाहीर म्हणून देखील ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली समाधी शोधुन काढण्याचे श्रेय महात्मा फुले यांनाच जाते.

नेल्सन मंडेला अणि बराक ओबामा हे दोघेही ह्या गोष्टीने भारावून गेले होते.महात्मा फुले यांनी आपले हे पुस्तक निग्रो मुक्तीच्या चळवळीसाठी अपर्ण केले आहे.

महात्मा फुले हे संपुर्ण आशिया खंडातील एकमेव असे विचारवंत होते ज्यांनी दीडशे वर्षापुर्वी विचारांचे जागतिकीकरण घडवून आणले.

दलितोदधारक

महात्मा फुले हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी दलितोदधाराची चळवळ त्याकाळी सुरू केली त्यांनी दलितांसाठी आपल्या घरासमोरील पाण्याचा हौद खुला केला अणि समाजातील अस्पृशयता निवारणाचे कार्य केले.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी अस्पृश्य जातीतील लोकांचे हाल होत होते म्हणून महात्मा फुले यांनी त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वताच्या घरासमोरील पाण्याची विहीर अस्पृश्य जातीतील लोकांसाठी खुली केली.

त्याकाळी दलितांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी तळमळीने झटणारे महात्मा फुले हे पहिले व्यक्ती होते.

त्यांच्या ह्याच महान कार्यामुळे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरू मानले होते.महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच बाबासाहेबांनी दलितोदधाराची चळवळ सुरू केली होती.

सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे तसेच विकण्याची एजन्सी –

महात्मा फुले यांच्याकडे सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे तसेच ते विकण्याची एजन्सी देखील महात्मा फुले यांच्याकडे त्याकाळी होती.संपुर्ण भारताची होलसेल एजन्सी महात्मा फुले यांच्याकडे होती.

ही कंपनी भाजीपाला विक्री अणि पुरवठा इत्यादी कामे देखील करत असत.

पुस्तक प्रकाशन कंपनी –

महात्मा फुले यांनी त्याकाळी स्वताची एक पुस्तक प्रकाशन कंपनी देखील स्थापित केली होती.हया कंपनीद्वारे महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक पुस्तकांचे प्रकाशन केले.

१८७३ ते १८८० पर्यंत पुण्याचे आयुक्त –

महात्मा फुले हे १८७३ ते १८८० ह्या कालावधी दरम्यान पुणे येथील आयुक्त देखील होते.

टिळकांना जामीन-

एकदा आगरकर अणि टिळक यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.ही केस मुंबई उच्च न्यायालयात सुरू होती तेव्हा लोकमान्य टिळक यांच्याकडे जामीनासाठी पैसे नव्हते.

तेव्हा महात्मा फुले यांनी लोकमान्य टिळक यांना जामीनासाठी अर्ज करायला १० हजार रुपये दिले होते.त्यावेळी १० हजाराला खुप महत्व होते.त्याकाळी १० रूपये तोळे इतके सोने होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button