नवीन पोस्ट्स

कोचिंग इन्स्टिट्यूट व्यवसाय: coaching institute business.

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपल्याला प्रशिक्षण संस्था अर्थात कोचिंग इन्स्टिट्यूट कशी सुरू करायची याबद्दल तपशीलाने आणि संपूर्ण माहिती बघूयला मिळेल. भारतामध्ये अशा बऱ्याच कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत ज्यांची सरकार दरबारी अजूनही नोंदणी नाही. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी भारतामध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट कशी सुरू करावी, परवाने कसे मिळवावे याबाबत इत्यंभूत माहिती घेऊन आलो आहोत.

आजकाल प्रत्येकालाच रोजगार हवा आहे मात्र तात्काळ रोजगार मिळवण्यासाठी योग्य मार्ग मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालेल आहे. या कारणामुळेच अनेक लोकांनी शिकवणी वर्गातून आपले जीवन आणि रोजीरोटी यांचा बंदोबस्त केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोचिंग इन्स्टिट्यूट उघडण्याबद्दल.

एचडीएफसी पर्सनल लोन किती मिळणार येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

कोचिंग इन्स्टिट्यूट उघडण्यासाठीची प्रक्रिया Process of starting coaching institute

मित्रहो, कोचिंग सेंटर सुरू करण्याकरिता अनेक विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मुलांना निर्विघ्न प्रशिक्षण देऊ शकता. 

कोचिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा विविध पायऱ्या Steps to start a coaching institute

शिक्षण व्यवस्था समजून घेणे Understanding the education demand

मित्रहो सर्वात आधी तुम्हास ज्या भागामध्ये कोचिंग सेंटर सुरू करायचे आहे, त्या भागातील शिक्षण व्यवस्था समजून घेणे अत्यावश्यक आहे. याकरिता तुम्हाला हे माहित असणे आवश्यक ठरते की त्या भागात शालेय आणि पदवी विद्यार्थी कोणत्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. तसेच त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे आहे. यासाठी तुम्ही शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून याबाबतची माहिती मिळवू शकता.

योग्य विषयाची निवड choise of right subject

यातील दुसरी पायरी म्हणजे आपल्या स्पेशियालिटी नुसार योग्य विषय निवडणे. तुम्हाला ज्यात चांगले ज्ञान आहे असे विषय निवडावे लागतील. तुमच्या आवड क्षेत्रामध्ये ज्या विषयांचे कोचिंग दिले जात नाही तेच विषय तुम्ही शिकवू शकत असाल तर मात्र याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होऊ शकेल. परंतु असे अवघड विषय शिकवण्याकरिता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे येणे हीच फार मोठी गोष्ट आहे.

इन्स्टिट्यूट स्थापनेसाठी योग्य जागा निवडणे Finalizing the place for coaching institute

शाळा आणि कोचिंग यांच्या वेळा जुळू न शकल्याने अनेक विद्यार्थी कोचिंग लावू शकत नाहीत. तसेच काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना योग्यरीत्या शिकवत नाहीत अश्या ठिकाणी कोचिंग स्थापन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे, कोचिंग स्थापन करण्यासाठी चांगली जागा निवडणे गरजेचे आहे

खोली कशी निवडावी How to choose room for coaching

खोली किमान इतकी मोठी असावी की प्रत्येक बॅच मध्ये तुम्ही ठरवलेले विद्यार्थी खोलीमध्ये अगदी आरामात माऊ शकतील. खोलीमध्ये बसण्याकरिता तुम्ही खुर्ची, बेंच इत्यादी वापरू शकता किंवा जमिनीवरही बसण्याची व्यवस्था करू शकता.

तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित सर्व पाठ्यपुस्तके आणि संदर्भ पुस्तके तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ठेवावी लागतील. या पुस्तकांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या विद्यार्थी वर्गाला शिकवण्यासाठी खूप मदत मिळत असते, तसेच विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी उपयुक्त ठरते.

एचडीएफसी पर्सनल लोन किती मिळणार येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास लागणारा खर्च Investment required to start a coaching institute

जर तुम्ही तुमचे कोचिंग मध्यम लोकसंख्येच्या शहरात उघडले तर तुम्हाला यासाठी प्रत्येक महिन्यासाठी किमान 2000 रुपये खोलीसाठी द्यावे लागतील. तुम्ही 6 महिन्यांसाठी किंवा एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर देखील खोली घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला फळा, पंखा, संगणक सिस्टीम, बैठकीसाठी बेंचेस किंवा खुर्ची इत्यादीं गोष्टीवर खर्च करावा लागेल. अशा प्रकारे कोणतेही कोचिंग लावण्यासाठी किमान साठ ते सत्तर हजार रुपयांपर्यंत खर्च गृहीत धरला जाऊ शकतो.

कोचिंग इन्स्टिट्यूट व्यवसाय सुरू करण्याचे फायदे Advantages of starting a coaching institute business

आजकाल अनेक कोचिंग सेंटर्स चांगली कामगिरी करून चांगला नफा कमवत आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एका दिवसात किमान सहा बॅच ठरवू शकता, जर तुमच्या एका बॅचमध्ये 20 विद्यार्थी असतील, तर साधारणतः 500 रुपये फी घेतली तरीही तुम्हाला एका महिन्यात 10,000 रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही सहजपणे सुमारे 60,000 रुपये पर्यंत कमवू शकता. 

आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूट ला लोकांपर्यंत कसे पोहोचवावे? How to promote your coaching institute to people?

1.तुम्ही तुमच्या परिसरातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तुमच्या कोचिंग सेंटरच्या नावाचा प्रचार करू शकता. यामुळे अनेकानेक विद्यार्थ्यांना तुमच्या कोचिंग सेंटरबद्दल माहिती मिळू शकेल.
2 बातम्यांमध्ये जाहिरात करण्यासोबतच, तुम्ही तुमच्या कोचिंगचा एक छोटासा व्हिडिओ तयार करून स्थानिक केबल ऑपरेटरला देऊ शकता. यामुळे तुमच्या कोचिंग सेंटरची जाहिरात टीव्हीच्या माध्यमातून देखील केली जाईल.
3.तुम्ही तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूट च्या पॅम्प्लेट्स विविध शाळांमध्ये वाटू शकता. ही एक चांगली मार्केटिंग पद्धत आहे, ज्याच्या मदतीने अधिकाधिक विद्यार्थी तुमच्या कोचिंग सेंटरकडे आकर्षित होतात. या प्रकाराला अधिक परिणामकारक करण्यासाठी यावेळी तुम्ही विद्यार्थ्यांना मोफत डेमो क्लास देखील देऊ शकता.

  1. तसेच तुम्ही तुमच्या कोचिंगमध्ये सुद्धा मोफत डेमो क्लास ठेवू शकता. विविध शाळांमधील मुलांना या मोफत डेमो क्लासेसकरिता बोलावले तर तुमच्या कोचिंगचा प्रचार अगदी सहज होईल. आणि हे विद्यार्थी आपल्या अजूनही मित्रमैत्रिणींना क्लास साठी घेऊन येतील.
    5.या कामासाठी तुम्ही ऑनलाइन ट्युटोरियल रेफरल सेवेची देखील मदत घेऊ शकता. यामुळे, अधिकाधिक लोकांना तुमच्या कोचिंगबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप्प इत्यादी ठिकाणी तुमच्या कोचिंगची जाहिरात करू शकता.

एचडीएफसी बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज मिळवा फक्त 5 स्टेप मध्ये

फक्त 5 सोप्या स्टेप मध्ये करा अर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button