नवीन पोस्ट्स

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी.

परीक्षा १ महिन्यावर आली असल्यामुळे मी सकाळी पहाटे उठायला चालू केले ,पहाटे २० ते २५ मिनिटांमध्ये मी तयार होतो आणि लगेच आश्रम मध्ये जाउन मनन करत बसतो..पण हे मनन चिंतन करत असताना काही तासामध्येच पोटामध्ये कावळे ओरडायला चालू होता म्हणजेच माझे शरीर मला काहीतरी खाण्यासाठी आग्रह करते मग एवढया सकाळी घरी नाष्टा बनायला मी घरी सांगत नाही आणि भूक तर लागलेली असते ,काही दिवस मी फक्त मी चहा आणि बिस्किट खाउन जात होतो पण तरीही भूक काय संपेना आणि अभ्यासात मन पण लागत नव्हते मग काय असेच एकदिवस घरापासून आश्रम कडे जाताना एक गाडा दिसला आणि तो गाडा होता निलंगा राईस सेंटर..

मग काय सकाळ सकाळ आपली भूख भागवण्यासाठी याच्यासारखा दुसरा पर्याय मला दिसला नाही आमच्या चौकामध्ये ,आणि काही ठिकाणी दुसऱ्या गोष्टी होत्या पण त्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला परवडाऱ्या नसल्यामुळे मी सकाळी निलंगा राईस खायचे ठरवले ….

आणि एका प्लेट मध्ये हा निलंगा राईस भेटतो ,आणि त्या प्लेटची किंमत फक्त आहे दहा रूपये .

मग मी काही दिवस झालो हा निलंगा राईस खात आहे,चवीला काय सांगायचे तूम्हाला ,एकतर एवढया सकाळी नाष्टयाची सोय होती आणि चव तूम्ही विचारूच नका ,एकदा खाल तर खातच रहाल अशी चव आहे निलंगा राईस ची.

Read More : Must have plugins for WordPress

निलंगा राईस खात असताना मी जरा निरीक्षण केले की हा निलंगा राईस कोण कोण खात आहे..

तर मला असे जाणवले की या दहा रूपयामध्ये मिळणाऱ्या राईस चा लाभ त्या चौकातून प्रत्येक व्यक्ती घेताना दिसत आहे..मग तो गरीब असो या श्रीमंत असो..

पण या निलंगा राईस चा जास्त फायदा जर कुणाला होत असेल ते म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना..

काही दिवस झाले मी पाहत आहे की एक व्यक्ती आपल्या मुलाला शाळेत सोडायला दररोज जातो आणि जात असताना तो निलंगा राईस सेंटर येथे येतो आणि आणि मुलाकडील रिकामा डब्बा काढतो आणि त्यामध्ये तो निलंगा राईस घेउन जातो..शाळेत भात मिळत असताना हे आई वडील आपल्या मुलांना निलंगा राईस डब्ब्यामध्ये देताना दिसले..कारण त्यांचा घरामध्ये एवढया लवकर उठून काहीतरी बनवून दयायला वेळ लागत असेल आणि शाळेला उशीर होत असेल त्या मुळे त्यांनी हा पर्याय निवडला असेल..

दुसरा वर्ग असा पण निलंगा राईस खायला येत आहे तो म्हणजे कामगार वर्ग..काही कामगार अशे आहेत की त्यांना सकाळी त्यांच्या गावाकडून ,तसेच आजूबाजूच्या भागामधून शहरात लवकर यावे लागते नंतर बस वगैरे नसतात किंवा उशीर होउ शकतो मग अशा लोकांना हा दहा रूपयांचा निलंगा राईस त्यांची भूक पण घालवतो आणि कमी पैसामध्ये नाष्टा मिळतो यांचे त्याच्या चेहऱ्यावर समाधान पण दिसते..

तिसरा वर्ग असा एक आहे की ते कामानिमित्त शहरामध्ये राहिला आले आहेत,पण त्यांनी मेस लावली पण त्या मध्ये नाष्टयाची सोय नाही असा पण एक वर्ग या दहा रूपयांमध्ये नाष्टा करायला येतो.

Join Marathi Udyojak WhatsApp groups

शेवटी गरीबांसाठी ,सामान्य माणसांसाठी निलंगा राईस हा एक सकाळी नाष्टा करण्यासाठी चांगला पर्याय आहे.कारण कमी पैशामध्ये पोटभरून खाता येते .

निलंगा राईस खरा उगम याचा लातूर मध्ये झाला असे म्हणतात तर काही जण खरा याचा उगम दक्षिण राज्यामध्ये झाला आहे असे म्हणतात.असो कोणी का याचा शोध घेतला असेल पण आमच्यासाठी हा आता आवडीची न्याहरी होउन बसली आहे..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button