नवीन पोस्ट्स

Rahul is not Playing | राहुल तिसरा कसोटीतूनही आऊट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 फेब्रुवारी पासून खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला अनुभवी फलंदाज लोकेश राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील (Rahul is not Playing) खेळताना दिसणार नाही. त्याच्या उजव्या मांडीत दुखणे कायम असून अद्यापही तंदुरुस्त झालेला नाही.

बीसीसीआयने तीन कसोटी सामन्यांची घोषणा करताना अट घातली होती की राहुल आणि जडेजा तंदुरुस्त असतील तरच खेळतील दोघांच्या सामन्याच्या आधी फिट घोषित व्हावे लागेल वृत्तानुसार राहुल अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

राहुल (Rahul is not Playing)पहिल्या कसोटीत जखमी झाला होता त्याने पहिल्या डावात 86 तर दुसरा डावात 22 धावांचे योगदान दिले होते सामना दरम्यान राहून ने उजव्या मांडीत दुखत असल्याची तक्रार केली होती यानंतर तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आता तिसऱ्या कसोटीतही खेळणार नाही.

राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापती नंतर पुनरा गमन करत असल्याचे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते पण त्यांना फिटनेस सिद्ध करावा लागेल तरच ते सामना खेळू शकतील. चौथी कसोटी तो खेळू शकेल अशी अपेक्षा आहे राहुल तिसरा कसोटी सामन्यासाठी सोमवारी राजकोटला पोहोचला त्याने सरावाला सुरुवात केली पण फिटनेस चाचणी उत्तीर्ण होऊ शकला नाही.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने निवड करताना सांगितले आहे की राहुलला किमान आठवडाभर निरीक्षणाखाली राहावे लागेल त्यानंतरच तो चौथ्या कसोटीत खेळू शकेल की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.

Citizenship Amendment Act | लोकसभेपूर्वी देशात सीएए लागू होणार

यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुळेल हा इंडिया विरुद्ध 15 फेब्रुवारीपासून राजकोट मध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात पदार्पण करू शकतो. वृत्तानुसार भारतीय संघ व्यवस्थापन सध्याच्या यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतच्या कामगिरीवर नाराज आहे.

उत्तर प्रदेशाच्या23 वर्षांच्या जुरेलला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंधरा सदस्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात मात्र तो राखीव बाकावर बसून राहिला त्याने उत्तर प्रदेश सह भारतात तसेच आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून दमदार कामगिरी केली.

केस भरतची अपयशी

ईशान किशन संघाबाहेर झाल्यानंतर केएस भरतचे कसोटी संघात पुनरागमन झाले. त्याने सुरुवातीच्या दोन कसोटीत सरासरीने 92 धावा केल्या कारकीर्दीत सात महिन्यात त 221 धावा काढणाऱ्या भरतचे एकही अर्धशतक नाही 15 प्रथम श्रेणी सामन्यात 790 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत.

बुमराहला चौथ्या कसोटीत ब्रेक

Bumrah
Bumrah

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला तिसरा कसोटीनंतर विश्रांती मिळू शकते. रांचीतील चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाईल असे सूत्रांनी सांगितले त्यानंतर तो धर्मशाला येथे पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी ताजा तवांना होऊन उपलब्ध राहील.

निवड समितीने राहुलच्या जागी कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडीक्कल याला संधी दिली. 23 वर्षांच्या देवदत्त ने रणजी करंडकात नुकत्याच 151 धावा केल्या त्यावेळी मुख्य निवड करते अजित आगरकर यांनी त्याची संपूर्ण खेळी पाहिली होती.

पडीक्कलने पहिल्या रणजी लढतीत पंजाब विरुद्ध 193 आणि गोव्याविरुद्ध 103 धावा केल्या होत्या भारत कडून इंग्लंड लायन्स विरुद्ध त्याने अनौपचारिक कसोटीत तीन डावांमध्ये 105 ,65 आणि 21 धावा ठोकल्या.

व्यावसायिक प्रशिक्षण योजना २०२४ विषयी माहिती

इंग्लंड संघ दाखल

दरम्यान इंग्लंड संघाची अबुधाबी येथून सोमवारी राजकोट मध्ये आगमन झाले. दुसऱ्या कसोटी नंतर पाहुणा संघ गोल खेळण्यासाठी आणि विश्रांतीसाठी 5 फेब्रुवारी रोजी रवाना झाला होता. मंगळवारी दुपारी इंग्लंड संघ सराव करणार आहे. मुख्य गोलंदाज जॅकलीन हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे सांगा बाहेर पडला. अबुधाबी येथे संघाने भारतीय फिरकीपटूंना खेळण्याचा भरपूर सराव देखील केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button