एक तुमचे मत (Vote) तुमचे भविष्य बदलू शकते
येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणूकेला सामोरे आपल्याला जावे लागेल . नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो..आपल्या भागाचा विकास आपल्या हातात असेल..आपण कुणाला निवडून देणार त्याच्या वर आपल भविष्य असेल..एक तुमचे मत (Vote) तुमचे भविष्य बदलू शकते.
भविष्य आहे तुमच्या हातात..
आपल्या शहरातील रस्ते ,आपल्या शहरातील नाल्या ,आपल्या शहरातील बाग ,आपल्या शहरातील दिवे, आपल्या शहरातील शाळा,आपल्या शहरातील ग्रंथालय ,आपल्या शहरातील पाणी,आपल्या शहरातील वेगवेगळया योजना ,आपल्या शहरातील बसस्थानक ,आपल्या शहरातील झाडे ,आपल्या शहरातील आरोग्य सुविधा.
आपल्या शहरातील विविध विकासकामे यासर्वांचे भविष्य आहे तुमच्या हातात..
एक तुमचे मत पूर्ण शहराचा नकाशा बदलू शकते..
एक पक्षीय पध्दतीकडे वाटचाल धोक्याची A move towards a one-party system is dangerous.
तुमचे मत आपल्या पिढीला चांगले वातावरण देउ शकते. एक तुमचे मत तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करू शकते..
प्रत्येक उमेदवारांचा बारकाईने विचार करा.त्याचे शिक्षण बघा,त्याचा स्वभाव बघा,त्याचा मित्रपरिवार बघा,त्याच्या सवयी बघा,त्याचा समाजाकडे बघण्याचा द्दष्टीकोन बघा ,पैशाला बळी पडू नका..
तूमची किंमत फक्त ५०० रूपये आहे का
एक दिवसाच्या हॉटेल मध्ये जेवणासाठी आणि ५०० रूपयांसाठी स्वत:ला आणि समाजाच्या विकासाला असे विकू नका..तूमची किंमत फक्त ५०० रूपये आहे का ?
आज जर तुम्ही या राजकारणात स्वत:ला विकलात तर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही…
चार पैसे कमी कमवले तरी चालेल पण येणाऱ्या पिढी ला चांगल्या वातावरणात तसेच चांगल्या शाळेत तसेच चांगल्या विकसित शहरात राहण्यासाठी.
तुम्हाला आज स्वत:ला फक्त एक मत चांगल्या उमेदवाराला दयायचे आहे.
प्रत्येक राजकारणी तुमच्या दारात येतील तुम्हाला आश्वासन देतील त्या आश्वासनाला बळी न पडता त्याने आतापर्यंत काय काय केले याची माहिती घेउन त्याला मतदान करा.
गावातील रस्ते शहराला जोडले पण सुविधा फक्त नावाला आहे याचा विचार करून मतदान करा.
नविन माणसाला संधी दया ,तरूणांच्या हाताला रोजगार नाही,जे तरूण शिक्षित आहेत त्या तरूणांना एक संधी देउन बघा, ज्याच्या कडे पैसा भरपूर आहे अशा लोकांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा अशा लोकांना निवडून आणले पाहिजे.
ज्याला खरच समाज कार्य करण्याची ईच्छा आहे, तो समाज कार्य करत आलेला आहे.
लोकशाही चा विजय तेव्हाच होईल जेव्हा एखादा उमेदवार एक ही रूपया न खर्च करता निवडून येईल तेव्हा..
आधीच्या लोकांनी स्वत:चे जे जाळे करून ठेवलेले आहे त्याला कुठेतरी आता भेद करण्याची गरज निर्माण झाली आहे. किती दिवस जून्याच लोकांना निवडून देणार..
ना त्याला आपली चिंता ना त्याला शहरांची चिंता ना त्याला विकासाची चिंता..एक तुमचे मत (Vote) तुमचे भविष्य बदलू शकते
आज कितीतरी पदव्या घेउन तरूण घरीच बसले आहेत याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या शहरात उदयोगाची कमतरता ..जर उदयोग असते तर आज प्रत्येकाच्या हाताला कात मिळाले असते..
जर आपल्या शहरात नविन नविन उद्योग पाहिजे असतील तर चांगलया लोकांना निवडून दया..
तूमच्या लेकरांना जर तूमच्याच शहरात नौकरी पाहिजे असेल तर चांगल्या लोकांना निवडून दया.
सरास पक्षांचे कार्यकर्ते पैसे वाटताना दिसतात..पण त्यांना कळत नाही.
आज जरी ते आपल्या नेत्यासाठी काम करत असतील.
पण उदया त्यांच्या मुलांना येथेच राहिचे आहे तेव्हा त्याला कोणत्या परिसरामध्ये तुम्ही वाढवणार आहात..
नगरसेवक कसा असावा ?
- असे काय नगरसेवक आहेत ते कधी त्या वार्डामध्ये फिरकले सुध्दा नाहीत..
- नगरसेवक कसा असावा प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवणारा असावा,
- प्रत्येक नागरिकांना वेळ देणारा असावा,
- आपल्या वार्ड मध्ये काय नाही काय आहे ,
- काय करायला पाहिजे ,कोण कोणते कामे आपलयाला करता येतील ,
- कोण कोणत्या योजना आपल्या लोकांच्या कामाच्या आहेत,
- याबद्दल सतत आढावा घेणारा असावा,
- त्याच्या मनात सतत समाजकार्याचाच विचार असावा,पैसे कमवण्याचे लालच त्याच्या मनात नसावे..
Electric Scooters In India 2024 : 190 KM रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च, Bounce Infinity E1 Scooter पाहून मुली झाल्या वेड्या…
नाहीतर आताच्या नगरसेवक एकदा निवडून आले की तोंड सुध्दा दाखवत नाहीत..येतात ते डायरेक्ट कार मध्ये ,नगरसेवक होण्याच्या अगोदर यांच्याकडे कारसुध्दा नव्हती पण नगरसेवक झाल्या वर कार घेउन गल्ली मध्ये फिरतात.
याचा अर्थ ते स्वत:च सांगत आहेत की मी तुमच्या साठी आलेला निधी स्वत:साठी वापरला आहे.
तरी ही आपण यांना परत निवडून देत असो तर आपण आपले भविष्य स्वत: खड्डयात घालत आहोत..
अजून एकदा सांगत आहे की ५०० रूपयांमध्ये तुम्ही तूमच्या मुलांचं भविष्य विकू नका…
लेखक : राम ढेकणे